[03/12, 3:55 PM] साखरे काका: 💐 जय गुरुदेव 💐
🌹 परिक्रमा 🌹
🌻 आपण परिक्रमा ह्या शब्दांपासून सुरवात करु
परिक्रमा अनेक आहेत उदा. नर्मदा परिक्रमा, गिरनार परिक्रमा, वृंदावन, गोवर्धन, बरसाना,अशा अनेक परिक्रमा आहेत
परिक्रमा म्हणजे नुसते त्या देवतेभोवती फिरणे नाही तर परिक्रमा म्हणजे त्या देवतेची साधना तपस्या उपासना हा मुख्य उद्देश
आता नर्मदा परिक्रमा म्हणजे काय हे बघु
भारतात एवढ्या नद्या असताना नर्मदेलाच परिक्रमा का असा प्रश्न पडतो
तर त्याचे उत्तर दोन प्रकारचे आहे
१) सर्व नद्या कुठे न कुठे गुप्त आहेत त्यामुळे गुप्त ठिकाणावर परिक्रमा होत नाही
पण नर्मदा कोठडी गुप्त नाही तिचा पुर्ण स्रोत दिसतो म्हणून तिला परिक्रमा करतात
२) नर्मदेच्या किनार्यावर अनेक साधु , संन्यासी , देव, पशु ,पक्षी, ह्यांनी सर्वांनी तपस्या केली व ती भुमी तप्त केली अश्या तप्त भुमितुन आध्यात्मिक लहरी आपल्या साधनेद्वारा आत्मसात करण्यासाठी परिक्रमा
करतात
परिक्रमेत साधु तत्व अवलंबून त्याग वृत्तीने राहून फक्त जप व साधना करणे हे खरे परिक्रमेचे उद्दिष्ट होय
क्रमश:
उद्या आपण नर्मदा मातेच्या उगमा विषयी व परिक्रमा व परिभ्रमण ह्याचा फरकाविषयी बघु
आपण प्रथम हे सर्व समजुन घेऊ व नंतर परिक्रमेस सुरवात करू
[04/12, 8:13 AM] साखरे काका: 💐 जय गुरुदेव 💐
🌹नर्मदा परिक्रमेत आज आपण नर्मदा उगमाविषयी बघु
🌻 नर्मदा ही शिवकन्या व कुमारिका आहे ती जलरुप कशी झाली ते बघा
नर्मदेचा विवाह शोणमुढाशी ठरला होत व राजा शोणमुढा मेकल पर्वतावर आला होता
इकडे नर्मदेस शोण दिसतो कसा याची उत्सुकता आली
म्हणून तिने आपली दासी जलहरी हीस सांगितले कि तु बघून ये शोण कसा दिसतो व मला वर्णन कर पण जलहरी ने सांगितले की मी दासी आहे माझ्या जवळ चांगले वस्रालंकर नाहीत मला तिथे कोण प्रवेश देईल तेव्हा नर्मदेने आपले भरजरी वस्रालंकर तिला दिले व बघण्यास पाठविले जलहरी मुळात दिसण्यास सुंदर होती वस्रालंकाराने ती अतिशय रुपवान दिसु लागली
बराच अवधी निघून गेला तरी जलहरी परत आली नाही म्हणुन अस्वस्थ झालेली नर्मदा तिकडेजाण्यासाठी निघाली
इकडे जलहरीने शोणला बघितल्यावर ती त्याचाकड़े आकर्षित झाली व शोणसुध्दा तिचे रुप पाहुन मोहीत झाला व तिलाच नर्मदा समजून विवाविधी सुरु केले व त्यांचे पाणीग्रहण चालु असताना नर्मदा तेथे आली
हे सर्व बघून नर्मदा प्रचंड क्रोधित झाली तिने जलहरीस जोरात धक्का दिला जलहरी जलरुपाने मेकल पर्वताच्या दक्षिणेकडून उत्तरेकड़े ज्वालानदी नावाने प्रवाहीत झाली
शोण लज्जित होउन जलरुपाने मेकल पर्वताच्या पश्चिमेला प्रवाहीत झाला म्हणून तो नदी न होता नद म्हणून प्रसिद्ध झाला सृष्टीवर तो एकच नद आहे
तरीही नर्मदेचा क्रोध शांत झाला नाही व ती स्वत: क्रोधाने सर्वस्वाचा त्याग करुन जलरुपाने पुर्वैकड़ुन पश्चिमेकडे प्रवाहीत झाली
पुढे काय झाले ते उद्या बघु
क्रमश:
[05/12, 10:57 AM] साखरे काका: 💐 जय गुरुदेव 💐
क्रमश:--- भाग ३
नर्मदा व परिक्रमा विषयी
🌻 काल आपण बघितल नर्मदा मैय्या त्वेषाने मेकल पर्वतावरुन पूर्वेकडून पश्चिमेकड़े जलरुपात प्रवाहीत झाली
तिचा सुरवातीचा ओघ प्रचंड़ होता सुरवातीला ती सात धारेतुन वाहात होती तिला देवतांनी आठवण्याचा व समजावण्याचा खुप प्रयत्न केला पण ती क्रोधाने बेफाम झाली होती
मेकल पर्वताचा खाली काही अंतरावर भिमाने गदेने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला ते स्थान म्हणजे भिमकुंड़ी होय तिथे तिच्या सहा धारा आड़विल्या गेल्या तरी ती एका धारेने पुढे आली म विचार करा एका धारेचे तिचे हे रुप आहे तर सात धारेचे काय असेल असो
तिचा राग शांत करण्यासाठी अनेक देवतांनी पशु पक्षी ऋषी मुनींनी तिच्या तिरावर अनुष्ठान करण्यास सुरुवात केली मैय्या मध्यप्रदेश मार्गे गुजरात कटपुर येथे पोहचली तिचा थोडा राग शांत झाला व ति तेथे गुप्त होणार होती पण समस्त देवता व ८४ लक्ष साधु व संन्यासी यांनी तिला सागरात विलिन होण्यास सांगितले पण ती ऐकेना म्हणून उत्तर दक्षिण जात असलेला रत्नासागर विमलेश्वर पासून सात कि.मि.पुर्वेस वळाला व सागर मैय्यात विलीन झाला
बघा सर्व नद्या सागरास मिळतात पण येथे सागर मैय्यास मिळाला
अजुन हिचे वैशिष्ट्य बघा
प्रत्येक नदीचे वैशिष्ट्य आहे गंगेच्या किनारी विद्वान दिसतात यमुनेच्या किनारी भक्ती दिसते ताप्ती किनारी समृद्धी दिसते सिंधू किनारी क्रौर्य दिसते मैय्या किनारी तुम्हाला फक्त त्याग बघायला मिळेल पुढे परिक्रमा करताना आपल्याला अनुभव येईलच
क्रमश:
उद्या आपण परिक्रमा नियम व परिभ्रमण म्हणजे काय व ते का करायच पहीली परिक्रमा कोणी केली सविस्तर बघु
[06/12, 9:30 AM] साखरे काका: 💐 जय गुरुदेव 💐
💐 जय गुरुदेव 💐
क्रमश:--- भाग ४
🌹 आज आपण परिक्रमा, परिभ्रमण पहीली परिक्रमा कोणी केली सविस्तर बघु
मुळात परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा ज्या देवतेला, नदीला, वृक्षाला, सद्गुरूंना,मातापिता किंवा व्यक्तीस प्रदक्षिणा करायची आहे तिस आपल्या उजव्या हातास ठेवून तिच्या भोवती फिरणे म्हणजे प्रदक्षिणा होय प्रत्येक प्रदक्षिणेस नियम आहे
आता नर्मदा परिक्रमेविषयी बघु
मी आता जे सांगतोय ते निट समजून घ्या कारण हे वाचुन तुम्हाला आश्चर्य वाटेल आज पर्यंत कोणीही परिक्रमा केली नाही फक्त मार्कंडेय ऋषी ह्यांनीच परिक्रमा केली म सगळे व मी सुद्धा जे केले त्याला परिभ्रमण म्हणतात
आता हे कस ते पाहू मी मगाशीच सांगितले प्रत्येक परिक्रमेचे नियम असतात नर्मदा परिक्रमेचे सुद्धा नियम आहेत त्याला नर्मदा कल्पावली म्हणतात ह्या कल्पावलीत छोटे मोठे असे एकंटर ९९ नियम आहेत ह्या सर्व नियमानुसार केले तर ती परिक्रमा होते अन्यथा ते परिभ्रमण होते
आता ह्यातील बरेच नियम पाळणे शक्यच नाही मी काही प्रमुख नियम सांगतो ते बघा म्हणजे तूमच्या लक्षात येईल
१) परिक्रमा करीत असताना पाण्याचा ओहळ सुद्धा ओलांडायचा नाही म्हणजे त्याला ही प्रदक्षिणा करायची आता नर्मदेला एकुण ९९९ नद्या मिळाल्या आहेत म्हणजे ह्यांना सुद्धा प्रदक्षिणा करायची
आणि अश्या प्रकारची परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी केली व त्यांना तब्बल २४ वर्षे लागली
२) परिक्रमेत मागे वळून सुद्धा बघायचे नाही अन्यथा परिक्रमा खंडित होते अशी परिक्रमा दुर्वास ऋषींची गुप्त गोदावरी पाशी खंडित झाली
३) परिक्रमेत कोणत्याही आश्रमात किंवा कोणाचेही अन्न न स्विकारता भिक्षूक वृत्तीने पाच घरी शुष्क भिक्षा घेऊन मैय्या किनारी पाकसिध्दी करणे व त्याचे तीन भाग करून एक भाग मैय्यास व एक भाग गोमातेस देऊन एक भाग आपण भक्षण करावा
असे अनेक नियम आहेत जे पाळण कठीण आहे असो
म प्रश्न असा येईल कि परिक्रमा होत नाही तर म परिभ्रमण का करायचे हे आपण उद्या बघु
क्रमश:
उद्या आपण परिभ्रमण व चमत्कार ह्या विषयी बघु
काळजी करु नका ह्या सगळ्या गोष्टींची पुर्ण माहिती झाल्यावर मी पुर्ण परिभ्रमणाचे पण वर्णन निश्चित करीन पण वरील सर्व गोष्टींचे ज्ञान असावे म्हणून मी सगळ व्यवस्थित मुद्देसूद सांगतोय चालेल ना?
[8/12/2016, 12:34 PM] साखरे काका: 💐 जय गुरुदेव 💐
क्रमश:---भाग ५
काल आपण परिक्रमा व परिभ्रमण या अनुषंगाने परिक्रमेचे नियम व एकमेव परिक्रमा कोणी केली हे पाहीले
आता आपण पुढे बघु
नर्मदा परिक्रमा होत नाही परिभ्रमण होते म प्रश्न निर्माण होतो कि परिभ्रमण का करायचे तर आता त्याविषयी बघु
नर्मदा मैय्या क्रोधाने निघाली तिला आडवण्याचा सर्व देवतांनी प्रयत्न केला पण तिचा क्रोध शांत होईना तेव्हा सर्व देवानी तिच्या किनार्यावर तपस्यास सुरवात केली देवतांच्या साधनेने तेथील भुमि आध्यात्मिक दृष्टीने तप्त झाली आहे व अश्या तप्त भुमीस वंदन करून तेथे आध्यात्मिक साधना करुन त्या भुमीतुन आध्यात्मिक लहरी आत्मसात करण्यासाठी परिभ्रमण करायचे
🌹 चमत्कार 🌹
आता नर्मदा परिक्रमा करतांना नाना तर्हेचे चमत्कार होतात असे ऐकिवात येते खरे खोटे मैय्या जाणे म माझ्या दृष्टीने एक विचार येतो
बघा प्रत्येकाने स्वत:ला प्रश्न विचारा खरोखर आपली योग्यता आहे का ? की परमेश्वराने आपणास दर्शन द्यावे
आता बघा जे कोणी परिक्रमेस जातात बहुतांशी ते साधारण ४५ ते ५० वयाचा पुढचे म विचार करा ४५ वर्षापर्यंत संसार करतांना अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडतात आणि एक परिक्रमा तिहि बरेच नियम ड़ावलुन केली व परमेश्वर दर्शन देतो हे पटते का ?
असो आता आणखी एक सांगतो प.पु. रंगावधुत महाराजांनी बर्याच परिक्रमा केल्या त्यांनी तर १०८ दिवसात फक्त फक्त रोज एक भांड़े नारळाच्या पाणी पिऊन केली पण त्यांच्या कुठल्याही चरित्रात
असा कुठलाही चमत्कार नाही यावरून विचार करा
आता प्रश्न असा कि चमत्कार होतच नाहीत का ?तर उत्तर होतात बघा चमत्कार मुळात तीन प्रकारचे असतात
१) मानसिक २) शारीरिक ३)आत्मिक
क्रमश:--
आपण उद्या याचे विश्लेषण बघु व या व्यतिरिक्त नर्मदा परिक्रमेत होणाऱ्या चमत्काराविषयी बघु
[9/12/2016, 1:46 PM] साखरे काका: 💐 जय गुरुदेव 💐
🌹 क्रमाश:--- भाग ६
काल आपण तीन प्रकारचे चमत्कार असतात असे बघितले ते कसे आपण सविस्तर बघूV
१) मानसिक चमत्कार --- हा चमत्कार आपण एखादी साधना करतांना जर पूर्ण एकाग्र होऊन ती साधना केली म्हणजे जप पारायण किंवा पूजा काहीही करतांना आपण एकाग्र झालो तर मन खुप शांत होत मानसिक बदल होतो ह्यालाच मानसिक चमत्कार म्हणतात
२) शारीरिक चमत्कार --- जेव्हा एखादी साधना एकाग्र होऊन शरीराचा विचार न करता त्या साधनेत मग्न होतो उदा. परिक्रमा ,पद्मासनात बसून जप करणे किंवा एका आसनात बसून ध्यान करणे ह्या पैकी काहीही केले असता कुठलाही त्रास होत नाही व शरीर पुन्हा ती क्रिया करण्यास तयार होते हा शारीरिक चमत्कार
३) आत्मिक चमत्कार---साधना ठराविक पातळीवर गेल्यावर साधक परमात्म्याशी एकरूप होतो व त्याला ह्या सर्व गोष्टीं खरोखर नाशिवन्त वाटू लागतात त्याला खरी विरक्ती येते तो आत्मिक चमत्कार आत्मिक चमत्कार हा ठराविक काळा पर्यंत किंवा कायम स्वरूपी होउ शकतो
हे झाले तीन चमत्कार आता आपण देवाचे दर्शन कसे होते हा चमत्कार कसा होतो ते बघू
मनुष्य हा अध्यात्मात दुसऱ्यावर जास्त विश्वास ठेवतो आणि मानसिक स्तरावर जास्त विचार करत नाही त्यामुळे त्यास तो अशा गोष्टी आपल्यामनावर ठासतो व त्यानुसार त्याला ते दिसते ह्याचे लिहून स्पष्टीकरण देणे थोडं अवघड आहे ज्यांना जास्त माहिती हवी असल्यास मला फोन करा मी सविस्तर सांगेन
क्रमश:---
उद्या आपण पारिभ्रमनाचे नियम व त्यामागची शास्त्रीय कारणे ह्याविषयी बघू
[10/12/2016, 8:36 AM] साखरे काका: 💐 जय गुरुदेव 💐
[10/12/2016, 8:36 AM] साखरे काका: 💐 जय गुरुदेव 💐
क्रमश:----७
काल आपण चमत्काराविषयी बघितले तस अजून त्यावर भरपूर लिहण्यासारखे आहे पण आपल्याला पुढे परिभ्रमणाला सुद्धा जायचं आहे
त्यामुळे आपण आता पुढे बघू
आता परिक्रमेला निघायचं आहे तर सगळे नाही तर जे शक्य आहे त्या विषयी बघू
परिक्रमेला नुसत्या साधू वेशात नाही तर साधू तत्वात जायचं आहे साधू तत्व म्हणजे एका शब्दात सांगायचे तर त्याग वृत्ती असावी
परिक्रमेत चालतांना आपण किती लवकर पूर्ण करू हा विचार करू नये तर आपण किती जास्त साधना करू शकू व मोठं मोठ्या संतांच्या सहवासात जास्त वेळ कसा जाईल त्यांच्या कडून किती जास्त ज्ञान किती जास्त मिळेल हा विचार असावा परिक्रमा म्हणजे मेआरोअथान नवे कोण किती पुढे गेला व मागे राहिला हा विचार करू नये
परिक्रमा व दिंडी ह्यात फरक आहे हे लक्षात घ्या बघा फरक कसा तो
दिंडीत आपल्याला चहा कुठे जेवण कुठे मुक्काम कोठे ह्याची पूर्ण माहिती असते व रोज किती चालायचं हे माहीत असत परिक्रमेत तस नाही परिक्रमेत हे सगळं मैय्या ठरवते दिंडीत आपले सामान वाहायला व्यवस्था असते येथे तसे नाही
अनेक जण बरोबर कोणी तरी असावं असा विचार करतात पण एकटे सर्वात उत्तम कारण तेवढा जास्त जप होतो आणि एकटे असल्यास मैय्याचा सहवास जास्त होतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे कारण गप्पा होत नाही
शास्र असे सांगते
१) ऐक निरंजन -- म्हणजे एकटा साधना जास्त करतो
२) दोन मध्ये संवाद-- म्हणजे दोघात विचार देवाण घेवाण होतात
३)-- तीन मध्ये संगीत--म्हणजे संगीतासाठी तिघे लागतात
४) चार पंथा--- म्हणजे नुसता रस्ता कापायचा असल्यास गप्पा मारत चालता येते ( परिक्रमा म्हणजे रस्ता कापणे नव्हे )
५) पाच न्याय-- म्हणजे न्याय करण्यासाठी पाचजण लागतात
६) सहा वाद--- म्हणजे सहा किंवा सहापेक्षा जास्त असल्यास वाद होतात असो
आता एक परिक्रमेत तेल जवळ ठेवावे कि नाही काहीजण नाही म्हणतात ते बरोबर पण त्याचे कारण हास्यअस्पद देतात लोक कारण सांगतात की रस्त्यात अश्वत्थामा भेटतो व तो तेल मागतो त्याला तेल द्यायचं नसत म्हणून तेल ठेऊ नये ह्याला वेगळी कथा आहे पण खरे कारण ते नाही
खरे कारण आहे आपण साधू वेष व साधू वृत्तीत आहोत व साधूला तेल वर्ज्य आहे
क्रमश:
आता पर्यंत आपण सात भाग वाचले तुमची निश्चित उत्कंठा वाढली असेल की हे परिक्रमा कम परिभ्रमण कसे असेल त्यामुळे आपण उद्या पासून सुरवात करू
पण त्या आधी मी परिभ्रमण का केले व मला इच्छा कशी झाली हे ऐकायचे असल्यास तसे कळवणे एक पोस्ट ती देईन अन्यथा परिभ्रमण सुरु करीन
आपली प्रतिक्रिया आवश्यक
[10/12/2016, 8:45 AM] साखरे काका: 💐 जय गुरुदेव 💐
क्रमश:--- भाग ८
आत्ता पर्यंत बरेच विश्लेषण झाले सर्व मुद्देसूद होते सगळ्यांना माझ्या पहिल्या परिभ्रमण विषयावर ऐकण्याची इच्छा आहे त्यामुळे त्या बद्दल थोडं
मी तसा पक्का दत्त साधक व गुरु आज्ञापालक जे मला ओळखतात त्यांना माहित आहे की मी गुरु आज्ञेशिवाय काहीही करत नाही हे अतिशयोक्ती नाही की मी श्वास सुद्धा गुरु स्मरून घेतो कारण माझा २४ तास गुरूंचा अजपा जप चालू असतो असो
१९८८ साली माझे प. पु. गुरुवर्यांनी सलग आठ दिवस नर्मदा विषयक सांगितले आज माझ्या कडे जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते सर्व सद्गुरुं मुले कारण ते देही असताना रोज रात्री ८ ते १० मला ज्ञान प्रदान करीत आशेच एकदा सलग आठ ते दहा दिवस त्यांनी नर्मदा विषयी सांगितले
नंतर त्यांनी मला विचारले तुला वाटत का परिभ्रमण करावेसे मी सांगितले माझी नर्मदाच क्या पण सर्व देवता तुमच्याच मध्ये समाविष्ट आहेत ते हसले व म्हणाले मी तुला सांगतो परिभ्रमनास जा परिभ्रमण करतांना तू कोणतीही साधना करू शकतो
मग गुरु आज्ञा मानून मी सुरवातीला अनिच्छेने निघालो
अनिच्छेने म्हणण्याचे कारण तेव्हढे दिवस सद्गुरू पासून दूर जाणार होतो
पण मैय्या व गुरु कृपा इतकी मोठी कि परिभ्रमण करतांना त्या १३५ दिवसात एकदा सुद्धा वाटले ननही कि गुरूंपासून दूर आहे मी ते पहिले भ्रमण कधिही विसरू शकणार नाही
माझे पहिले परिभ्रमण १९८८ साली सुरवात व १९८९ साली पूर्ण झाले त्यावेळेस पूर्ण अंतर २७०० कि.मी. होते
आता तेव्हाचे परिभ्रमण व आताचे ह्या मधील मूळ दोन फरक आहेत
१) तेव्हा खरोखर साधना होत होती व बरेच नियम पाळले जात होते
२) त्यावेळेस ९५% हे साधू व संन्याशी असत व ५% गृहस्थी असत आता नेमके उलट होतंय व साधना फार थोडे लोक करतांना दिसतात असो
क्रमश;----
उद्या पासून माझ्या पहिल्या परिभ्रमनास सुरवात करू.
[11/12/2016, 10:28 AM] साखरे काका: 💐 जय गुरुदेव 💐
🌹 क्रमश:---९
काल आपण माझ्या परिक्रमा बद्दल जुजबी कारण बघितले आता पुढे
महाराजांच्या सांगण्यावरून मी परिभ्रमाणेकरिता तयार झालो तेव्हा महाराजांनी मला काही नियम व त्याची कारणे सांगितली ती मी देत आहे
१) परिक्रमा हि ओकारेश्वर येथून सुरु करावी
कारण सुरवातीला आपण जे बाटलीत जे नर्मदा जल घेतो कारण परिक्रमेत रोज सकाळी व संध्याकाळी स्नान करून नर्मदा पूजन व आरती करायची असते व कधी कधी आपण मैय्या पासून खूप लांब असतो तेव्हा बाटलीतली मैय्या आपल्या जवळ असते व नंतर परिक्रमा पूर्ण झाल्यावर ते जल ओकारेश्वर व ममलेश्वरला व्हायचे असते म जर आपण बाकी कुठल्या स्थानावरून परिक्रमा सुरु केली तर जल व्हायला परत ओकारेश्वर पर्यत पायी यावे लागते
२) परिक्रमेच्या आधी प्रायश्चित संकल्प सोडून सर्व केस अर्पण करणे
केस अर्पण ( पुरुषांनी)करण्याचे कारण आपण संकल्प सोडताना मैय्यास सांगतो की आजपासून मी माझा गृहस्थ आश्रम सोडून तुझा साधू वेष धारण करीत आहे त्याचे प्रतीकात्मक स्वरूप म्हणजे केस अर्पण करणे
३) परिक्रमेत सूर्योदय ते सुर्यास्तच चालावे
४)शक्यतो मैय्याचा जवळूनच चालावे
कारण मैय्याचा आध्यात्मिक लहरी ह्या आपल्या शरीरास व जप करीत चालत असताना आपल्या मनास स्पर्श करतील
४) माध्यांनकाळी चालू नये
कारण सद्गुरू श्री दत्तात्रेय त्याकाळात भिक्षेस फिरत असतात तेव्हा स्थिर होऊन रहाणे
५)शक्यतो स्वतःहा पाकसिद्धी करून भोजन करावे
कारण भोजन बनवताना जो भोजन बनवत असतो त्याचा चांगल्या वाईट विचारांच्या भावना त्या अन्नात उतरतात व त्याचा साधकास त्रास होऊ शकतो
६) परिक्रमेत कोणाकडूनही द्रव्य म्हणजे दक्षिणा घेऊ नये
कारण साधक साधना करीत असताना कोणाकडूनही दान दक्षिणा घेतल्यास ती व्यक्ती सुद्धा नकळत त्या साधनेची भागीदार बनते व साधकाची साधना क्षीण होते
अशा प्रकारचे नियम सांगितले बाकी नियम मी वेळेनुसार सांगेन
क्रमश:
आपली सर्वांची उत्कंठा आता शिगेला पोहचली हे मी जाणतो म आता वेळ न लावता उद्या पासून आपण परिक्रमेस सुरवात करू
[11/12/2016, 10:28 AM] साखरे काका: 💐 जय गुरुदेव💐
🌹 क्रमश:--- भाग १०
आता पर्यंत आपण परिक्रमेविषयी नियम व अन्य माहिती बघितली आज पासून सुरवात करू
१९८८ सालच्या कार्तिक महिन्यातील एकादशीचा उपवास सोडून महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्र्यंबकेश्वरहून ओकारेश्वर जाण्यासाठी निघालो फार कठीण वेळ होती कारण २८ वर्षात महारांजांना सोडून पहिल्यांदा दूर जात होतो मानसिक स्थिती काय असेल फक्त विचार करा
प्रश्न असेल बरोबर काय घेतले तर दोन धोतर ,दोन उपरणे ,दोन रामदास ( रामदास म्हणजे काय समजला असाल) एक पंचा, एक ताट, एक वाटी, एक मध्यम पातेले, एक सतरंजी, एक शाल व मैय्याचे पूजा सामान एवढेच सामान महाराजांच्या आज्ञेने असो
ओकारेश्वर येथे दुसऱ्या दिवशी पोहचलो तेथे श्री सुधाकर शास्त्री जे महाराजाच्या ओळखीचे होते त्यांचा घरी गेलो त्यांना सर्व सांगितले ते म्हणाले परिक्रमा करा पण एवढे सोपे नाही लक्षात ठेवा त्याच दिवशी त्यांचा सागण्यांनुसार ओकारेश्वर पर्वत परिक्रमा केली
दुसऱ्या दिवशी म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेस सकाळी गोमुखवर जाऊन लघु प्रायश्चित घेऊन नर्मदापूजन व कन्यापूजन व कन्या भोज करून परिक्रमेचा संकल्प सोडला तेव्हा किंवा त्याआधी मी कोणतेही पुस्तक वाचले नव्हते
संकल्प ,पूजन ,भोज हे सर्व होईपर्यत दुपारचं तीन वाजले होते श्री सुधाकर शास्त्री म्हणाले निघा आता
कारण ज्यादिवशी संकल्प सोडला जातो त्याच दिवशी परिक्रमा सुरु करायची असते किमान एक ते दोन कि. मी. पुढे जावे
मी विचारले पुढील जरा माहिती सांगा
ते म्हणाले मैय्या सोबत आहे किनाऱ्याने चालण्यास सुरवात करा बाकी सर्व मैय्या व तुमचे सद्गुरू बघतील विचार करा कोणतीही माहिती नाही बरोबर कोणी नाही पण एक खरे माझे सद्गुरू खरच बरोबर आहेत ह्याचा भास होत होता असो
पिशवी खांद्यास लावली हातात तुंबा म्हणजे कमंडलू महाराजांनीच दिला होता व सुधाकर शास्रींनी काठी दिली होती ती होती आणि निघालो
एक मनाशी ठरवले फक्त सद्गुरू जप करायचा सद्गुरू जप करीत चालत होतो रस्त्यात विलक्षण चेतनामय वाटत होते शब्दात वर्णन करणे अशक्य बघा साधारण अठ्ठावीस वर्ष झाली तरी मी थोडे सुद्धा विसरलो नाही
साधारण चार ते पाच कि मी चालल्यावर एक आश्रम दिसला तो मौनी बाबा आश्रम एकदम किनाऱ्यालगत मी तेथे पोहचलो तेथील महाराजानी नर्मदे हर म्हणून स्वागत केले संध्याकाळ होत होती ते म्हणाले यही रुको सूर्यास्त के बाद चालना नाही
त्यांनी मला एका कोपऱ्यात थांबण्यास सांगितले व म्हणाले मैय्या का आसन यही लगओ मला आसन लावणे माहीत नव्हते
त्यांनी सांगितले की स्नान करून या व तुमच्या जवळील मैय्या व फोटो व जे काय असेल ती इथे आसन मांडून ठेवा व पूजा आरती करा रात्रभर तसेच ठेवायचे सकाळी निघताना परत पूजा करून झोळीत भरून ठेवणे एकदा मैय्या उचलली कि परत त्या स्थानावर थाबायचे नाही असो
आता मी स्नान करणार पण कसे करायचे कारण गुरुआज्ञा होती की स्नान मैय्याचा आत जाऊन करायचं नाही कारण आपण तिला प्रदक्षिणा करत आहोत मी पाय कसा लावणार
हे मी तेथील महाराजाना सांगितले त्यांना कौतुक वाटले मी त्यांनी बादली दिली मी बादलीने मैय्या जल घेऊन वरील दगडावर स्नान केले
मग मैय्याचे आसन लावून पूजा केली मला मैय्याची आरती येत नव्हती व नर्मदा अष्टक सुद्धा येत नव्हते ते महाराज खुप चांगले होते त्यांनी मला आरती व अष्टक लिहून दिले म्हणाले रोज सकाळी व संध्याकाळी म्हणत रहा आठ दिवसात पाठ होईल
भोजनाविषयी त्यांनी विचारले मी म्हटलं मी बनविन ते हसले म्हणाले तुमच्या सद्गुरूंनी बरोबर सांगितलंय पण हा आश्रम आहे येथील भोजन हा प्रसाद असतो मी धर्म संकटात पडलो कारण एकीकडे गुरुआज्ञा व दुसरीकडे हे पण महात्मा आहेत काय करावे कळेना पण सद्गुरू खरोखर दयाळू लगेच मार्ग दाखवला ते महाराजच म्हणाले असं करा भोजन बनविण्यास आपण पण मदत करा म्हणजे गुरुआज्ञा पण मोडणार नाही व इथला प्रसाद पण घ्याल
मी खिचडी बनवली त्यांनी कढी बनवली मैय्यास नेवेद्य दाखून भोजन केले
सर्व आटोपल्यावर त्यांचा समवेत आध्यात्मिक सुंदर चर्चा झाली खरोखर पहिला दिवस खुपच चांगला होता कारण काहीही माहिती नसताना सर्व व्यवस्थित झाले हे सर्व सद्गुरु व मैय्या कृपेने
आमची चर्चा साधारण रात्री दहा वाजेपर्यंत चालली काय चर्चा झाली तुम्हालाही प्रश्न पडला असेल म आपण ते उद्या बघू
क्रमश:--
चर्चा ऐकायची असेल तर सांगा नाहीतर आपण पुढे जाऊ
[12/12/2016, 11:58 AM] साखरे काका: 💐 जय गुरुदेव 💐
🌹 क्रमश:--- भाग ११
काल आपण परिक्रमेचा पहिला दिवस बघितला आज पुढे
कालचा दिवस खरोखर चांगला होता कारण परिक्रमा व इकडचे सर्व वातावरण नवीन आणि महत्वाचे देहाने सद्गुरुंपासून प्रथमतः दूर म्हणजे जस मुल आईपासून दूर झाल्यावर त्या मुलाला जे होत तेच प्रथम मला वाटत होते पण सद्गुरुंची प्रचंड कृपा व मैय्याचा आशीर्वाद ह्यामुळे जास्त जाणवले नाही असो
काल झालेल्या येथील महाराजांच्या चर्चेने व त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाने बऱ्याच नवीन गोष्टी माहित झाल्या
नेहमी प्रमाणे पहाटे ३.१५ वाजता उठलो व मुखमार्जन करून ध्यान साधनेस बसलो आज नेहमीपेक्षा वेगळे ध्यान साधनेत वाटत होते पहाटे ५.३० पर्यंत बसलो नंतर स्नानास जायचे होते पण हिम्मत होत नव्हती कारण इकडे थँडी जरा जास्त आहे आणि मी साधू तत्वानुसार मी शर्ट किंवा स्वेटर म्हणजे शिवलेले कोणतेही वस्त्र घातले नव्हते त्यामुळे थंडी जरा जास्त जाणवत होती असो
वेळ काढून शेवटी सहा वाजता बादली घेऊन स्नानास गेलो तेथेच किनाऱ्यावर संध्या करून परत वर आश्रमात येऊन मैय्या पूजन व आरती केली नंतर महाराजांनी मला चहा दिला नंतर मी सर्व सामान भरून मैय्यास सोबत घेऊन त्या म्हाराजाचा प्रेमळ निरोप घेऊन निघालो साधारण आठ वाजले होते म्हणजे तस उशीर झाला होता पण थंडी व पहिला दिवस होता असो
सद्गुरूंचा अजपा जप करीत चालत होतो बघा मी किती भाग्यवान मनात सद्गुरु व बाजूला मैय्या खरोखर बाकी कशाचेच भान नव्हते साधारण एक ते दीड तास चालल्यावर मी एका फार मोठ्या शिळेपाशी आलो आणि भांबावलो कारण पुढे कसे जायचे कळेना मग तिथे जरा विश्रांती करता बसलो पाच ते दहा मिनिटे झाली असतील तेथे एक नाव घेऊन आला मी त्याला विचारले पुढे कसे जायचे तो फक्त एवढच म्हणाला महाराज चढ जाओ उपर बस एवढंच बोलला
म सद्गुरूंच स्मरण करून शिळेवर चढण्यास सुरूवात केली मुळात चढण्यासाठी तसा मार्ग नव्हता कड्यावरून चालत होतो डावीकडे शिळेचा उंच भाग तर उजवीकडे खोल दरी अतिशय कठीण असा रस्ता गुरुकृपेने व मैय्या आशीर्वादाने मी शिळा पार केली नंतर मागे वळून बघितले तर माझाच माझ्यावर विश्वास बसेना कि मी हि शिळा पार केली
साधारण एक ते दीड तास चालल्यानंतर असे जाणवू लागले की माध्यांन झाली आहे मग तेथेच एका झाडाखाली दुपारच्या विश्रांती करता बसलो मनात जप चालू होता पण विचार पण येत होता खरंच परिकर्मे सारखी साधना करण्याची माझी योग्यता आहे का ? मनात असा विचार आल्यावर महाराजाना नमस्कार केला व मैय्याला नमस्कार करून दोघांना सांगितले माझी योग्यता नाही तुम्ही पूर्ण करून घ्या मला खूप भरून आले
क्रमश:
मला ते सर्व आठ्वल्यामुळे पुढे काही लिहण होत नाही पुढील भाग उद्या बघू
[12/12/2016, 11:58 AM] साखरे काका: 💐 जय गुरुदेव 💐
💐 जय गुरुदेव 💐
🌹 क्रमश: -- भाग १२
काळ मी थोडा भावनिक झालो म्हणून पुढे लिहू शकलो नव्हतो क्षमस्व असो
झाडाखाली माध्यांन विश्राती घेऊन साधारण २ ते २.३० वाजता निघालो नक्की वेळ साजरा येत नाही कारण माझ्याकडे घड्याळ नाही असो
पुढे निघालो मनामध्ये जप चालू असतांना सुद्धा विचारांचे प्रचंड काहूर चालू होते
विचार असे कि महाराजांनी मला प परिक्रमेला का पाठवले ?
१) साधने करता म्हणावे तर त्यांच्या ब्ररोबर सुंदर होत होती
२) माझी परीक्षा घेण्याकरता म्हणावे तर ते त्यांच्या सोबत असताना त्यांनी अनेक कठीण परीक्षा घेतल्या
३) सिद्धी प्राप्ती करता म्हणावं तर कारण असे म्हणतात की परिक्रमेने सिद्धी प्राप्त होते पण मला सिद्धी विषयी घृणा आहे कारण त्यांनी सांगितले होते की सिद्धी हि साधकाच्या साधनेतील व्यत्यय आहे हे त्यांनी फार चागले समजावून सांगितले होते म्हणजे सिद्धी करता नाही
मी का पाठवले हा विचार खूप त्रास देत होता म परत विचार यायचा याचे कारण तेच दाखवतील असे मनामध्ये गोंधळ चालू होते
जप हि चालू होता रस्ताही चालत होतो
चालत चालत मोरटक्क्यास आलो खूप भूक लागली होती काय करावं कळेना कि पुढे जावं कि येथेच कुठे थाबावं पण अजून वेळ होता म्हणून पुढे जायचं ठरवलं तेवठ्यात एका चहावाल्याने बोलावले व त्यांनी चहा व बिस्कीट घेऊन जरा बरे वाटले म पुढे निघालो प्रश्न आहे तेथेच आहेत मला खात्री आहे कि महाराज ह्याचे काहूर दूर करतील
पुढे साधारण एक तास चालल्यावर एक मळा लागला तो इंदोर येथील गुप्ता यांचा होता त्यांनी मला नर्मदे हर म्हणून आवाज दिला व म्हणाले महाराज श्याम होने को आयी आगे कहा जा रंहे हो यहा रुको मी म्हणालो मी गृहस्थां कडे उतरत नाही त्याला खुप आश्चर्य वाटले तो म्हणाला महाराज घर के बाहर रुको
मी त्याच्या घराबाहेर गेट आहे तेथे थांबलो मी त्याना बादली मागितली आंघोळी साठी त्यांनी विचारले मैय्यावर नाही करणार मी त्यांना सर्व समजावून सांगितले म त्यांनी सांगितले मी मोटार लावतो पाईपला मैय्याचेच पाणी येते मी म्हणालो चालेल
स्नान करून संध्या करून नर्मदापूजन केले वाचून आरती व अष्टक म्हटले त्यांचा घरातील लोक सुद्धा पूजा बघत होते
त्यांनी भोजनाविषयी विचारले मी बनवणार असं सांगितलं मग त्यांनी मला डाळ तांदूळ दिले मी तीन दगडाच्या चुलीवर माझ्याकडे असलेल्या पातेल्यात खिचडी बनवली नंतर मैय्यास नेवेद्य दाखवून भोजन केले नंतर गुप्ता परिवारासोबत आध्यात्मिक चर्चा करून झोपण्याकर्ता सतरंजी घातली त्यांनी सांगितले महाराज थंडी आहे काही देऊ का मी विनम्र नकार दिला शाल पांघरून पडलो वर स्वच्छ आकाश दिसत होते जप चालू होता विचारहि चालू होते हे विचार कधी संपतील सद्गुरच जाणे
क्रमश:---
उद्या पुढे जाऊ
💐 नर्मदे हर 💐
क्रमश:--- भाग १३
नेहमी प्रमाणे पहाटे ३.०० वाजता उठलो मुखमार्जन करून ध्यान करण्यास बसलो पण आज खूप प्रयत्न करून सुद्धा ध्यान लागेना थंडी पण वाजत होती कारण थोडे दव पडले होते मनात चाललेल्या विचारा मुळे ध्यान लागत नव्हते खुप अस्वस्थ झालो असो महाराजांची इच्छा
सहा वाजेपर्यत बसलो पण ध्यान लागले नाही गुप्तांजिनी पंप लाकला नळी खाली स्नान केले पंपामुळे पाणी तोडे कोमट होते असो नंतर संध्या नर्मदापूजन आरती केली व आवरा आवर करून गुप्तजींनी चहा दिला तो घेऊन व मैय्यास घेऊन पुढे निघालो आजपण निघण्यास उशीर झाला थंडीच्या फालतू कारणामुळे निघण्यास उशीर होतो हे लक्षात आले उद्या पासून हि कारणे बंद असो
पुढे चालण्यास सुरवात केली मनात जप चालू होता मैय्याचा किनाऱ्याने खरंच खुप प्रसन्न वाटत होते मैय्याचा थंड हवेच्या लहरी येत होत्या तर पाठीमागून सूर्याची आल्हाद दायक किरणे येत होती
किती प्रसन्न वातावरण होते पण हे नतद्रष्ट मन मला सद्गुरूंनी का पाठवले ह्या विचाराभोवतीच फिरत होते
शेवटी एका ठिकाणी थांबलो खांद्यावरचे सगळे खाली ठेवले मैय्या कडे तोंड करून उभा राहिलो नमस्कार करून सांगितले तू आणि माझे गुरु दोघेही मला वंदनीय आहात मला माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याची पूर्ण जबाबदारी तुमची आहे जो पर्यंत मला उत्तर मिळणार नाही तो पर्यंत मी अन्न सेवन करणार नाही आता काय करायचे तुम्ही दोघे ठरवा
चालत चालत जप करत किनाऱ्यावरील एका नर्मदा मंदिरात पोहचलो माध्यांन झाली होती तेथे एक साधू होते त्यांना वंदन करून नर्मदे हर म्हणालो त्यांनी हसतमुख स्वागत केले भोजनाविषयी विचारले मी नकार दिल्यावर त्यांनी चहा घेण्याचं आग्रह केला मी चहा घेतला दुपारच्या विश्राती करता येथेच थाबायचे ठरवले
त्यांनी ऐकटेच का विचारले मी म्हणालो मला साधना करत शांततेने करायची आहे ते म्हणाले वा चांगले आहे भरपूर साधना होईल तुमची
दुपारी येथून निघालो पुढे एक तास चालल्यावर टोकासर येथील शिव व राममंदिरात आलो वेळ होता पुढे जाण्याचा विचार होता पण येथील महाराजांनी घाईने परिक्रमा करू नये सर्व त्याग करून साधू बनलात म घाई का येथे पण गोमुख आहे म मी राहण्याचं निर्णय घेतला मंदिराच्या समोर असलेल्या झाडाखाली राहण्याचे ठरवले सामान ठेऊन महाराजांशी बोलत बसलो माझ्या मनातील विचारांबद्दल सांगितले ते जरा हसले मी म्हणाले तुमची सद्गुरुंवर अपार निष्ठा आहे ते नक्कीच उत्तर देतील काळजी नका करू थोडा धीर आला
नंतर किनाऱ्यावर जाऊन बादलीने पाणी घेऊन स्नान करून वर आलो संध्या व नर्मदापूजन आरती केली
तेथील महाराजानी विचारले विचार बदलला का जेवणार का मी नाही म्हणालो मी ते म्हणाले चहा तरी घ्या म मी चहा घेतला सतरंजी अंथरून आडवा झालो निरभ्र आकाश बघत होतो दिवसभर पोटात चहा शिवाय काही नाही म्हणून झोप पण येत नव्हती पण मला काळजी नव्हती कारण आता काळजी करणारे दोघे होते एक महाराज व दुसरी मैय्या असो बघू पुढे काय घडतंय केव्हा झोप लागली कळलंच नाही
क्रमश:---उद्या बघू
💐 जय गुरुदेव 💐
🌹 क्रमश:--- १४
रोजच्या प्रमाणे पहाटे ३.१५. वाजता जाग आली मुख मार्जन करून ध्यानास बसलो आज ध्यान लागण्यास म्हणजे मन एकाग्र होण्यास थोडा वेळ लागला पण ध्यान लागले महाराजांची प्रेमळ मूर्त डोळ्यासमोर आली पण कुठलाही संवाद नाही भानावर आलो वेळ घालवायचा नाही कारण रोज निघण्यास उशीर होतो
थंडी वाजत होती पण मैय्याचा नाव घेऊन नळाखाली स्नान केले नंतर जागेवर येऊन संध्या , नर्मदापूजन व आरती केली तेवढ्यात त्या आश्रमातील महाराज आले त्यांनी चहा आणून दिला चहा घेऊन निघण्याची तयारी केली तेथील महाराजांचा निरोप घेण्याकरता गेलो त्यांनी मला सांगितले जास्त हट्ट करून अन्नत्याग करू नका कारण तुम्हाला फार पल्ला पार कराचा आहे तुम्ही ज्ञानी ब्राम्हण व साधक पण आहात मी फक्त मान डोलावली असो
आज जरा व्यवस्थित वेळेत निघालो पुढे काही वेळातच पितमपूर नावाचे गाव लागले तेथे श्री राम मंदिरात प्रभू रामाचे दर्शन घेऊन निघत असताना एका गृहस्थाने चहा पिण्यास बोलावले थंडी पण वाजत होती नाही म्हणणे जमले नाही चहा घेतला जुजबी बोलणे झाले पुढे निघालो
थोडं पुढे आल्यावर दोन रस्ते आहेत असे कळले एक रस्ता खेडी वरून बकावा व दुसरा रस्ता रावेर व तेथून खडक नदी पार करून बकावा तेथील लोकांनी सांगितले की रावेर हा जवळचा रस्ता आहे म्हणून त्या रस्त्याने पुढे निघालो आज विचाराचे जास्त काहूर नव्हते कारण मला विश्वास आहे की सद्गुरू माझ्या शंकेचे निरसन करतील त्यामुळे चालताना लयात जप पण चालू होता पोटात चहा व्यतिरिक्त काहीही नव्हते पण तसे जाणवत पण नव्हते जपामुळे खुप प्रसन्न वाटत होते एक गोष्ट खरी कि ज्या दिवसापासून परिक्रमा सुरु केली त्या दिवसापासून मानसिक वेगळी अनुभूती येत आहे शब्दात वर्णन करणे अशक्य
मस्त जप करत चालत चालत रावेर ला आलो माध्यांन झाली होती रावेर येथील ग्रामपंचायती जवळ येऊन थाबलो दुपारची विश्रांती येथेच घेण्याचे ठरवले थोडस थकल्या वाटत होते म्हणून थोडं आडवे झालो एवढ्यात गावातील एका मैय्या भक्ताने कोरा चहा घेता का विचारले गळल्या सारखे वाटत होते मी होकार दिला त्यांनी चहा आणून दिला
दुपारी तेथून निघालो खडक नदी पाशी आलो नदीला पाणी होते पण नदीतर पार करायची होती विचार करत उभा असताना पाठीमागून एक गृहस्थ आले आणि काहीही न बोलता माझा हात पकडून मला पाण्यात घेऊन गेले जरा वेळ मला काहीच कळले नाही मी खेचल्या सारखा त्याच्या मागे पाण्यातून चालू लागलो पाणी गुडघ्याचा वर होते माझी पिशवी वर घेऊन अक्षरशः त्यांच्या मग नदी पार करून कसे पोहचलो ते मैय्या व महाराजच जाणो असो
क्रमश:----
त्या व्यक्ती विषयी व माझ्या उपवास बद्दल उद्या बघू
💐 जय। गुरुदेव 💐
क्रमश:---भाग १५ पुढे
त्या व्यक्तीने खडक नदी पार करतांना माझा हात पकडला अक्षरश: खेचतच नदी पार करवली नदीला कमरे एवढे पाणी होते व पाण्याला खुप प्रवाह होते मला असे वाटते त्यांनी जर खेचले नसते तर शक्यता फार कमी होती की मी पार करू शकलो असतो असो
पलीकडे गेल्यावर मी त्यांना विचारले आपण कोण ? व्यक्ती खुप साधारण दिसत होती त्यांचा व माझा मोठं संवाद झाला नीट वाचा
हा संवाद पूर्ण हिंदीत होता पण मी मराठीत देत आहे
आपण कोण ?
परिक्रमावासी मला हासू आले कारण त्यांच्या जवळ काहीही नव्हते फक्त अंगाला एक पंचा होता
मी विचारले आपण कुठले ?
ते म्हणाले मी संकल्प सोडला व साधू वेष धारण केला तेव्हाच मी त्यागी झाल्यावर व त्यागी माणसाला स्थान नसते सर्व सृष्टी हि त्याचीच
मी विचारले आपले नाव काय?
पुन्हा ते हसले व म्हणाले अहो साधू हा साधक असतो व साधक हेच त्यांचे नाव
मी म्हटले अहो पण ओळख कशी
तेव्हा ते म्हणाले की साधक हा ज्यांची साधना करतो ते सद्गुरू किव्हा ती देवता हीच आपली ओळख कारण साधकाला साधना करताना भौतिक
ओळखीची गरज नसते
मला हे सर्व ऐकून फार वेगळे वाटत होते त्यांच्या कडे बघितले तर चेहरा खुप निर्विकार होता त्यांच्या डोळ्यांकडे बघण्याची हिम्मत होत नव्हती खरोखर साधक इतका निर्विकार असतो
माझ्या मनातील त्यांनी ओळखले व थोडे हसूनच म्हणाले निर्विकार होऊ शकेल तोच साधनेचा परामोच्य बिंदू गाठू शकतो असो
म मी विचारले आपण परिक्रमा करताय म आपल्या कडे काहीच कसे नाही
ते म्हणाले अहो मी साधू तत्व स्वीकारलय साधूला काय लागत झोपायला धरणी आहे पांघरायला आकाश आहे भोजनाकारता ज्याची मी साधना करतो तो देईलच मला विश्वास आहे
मला हे सर्व आठवून भरून आलाय पुढे लिहण कठीण होत आहे क्षमा करा मी उद्या पुढचे लिहीन
क्रमश:
आजच्या लेखावर प्रतिक्रिया आवश्यक अन्यथा मी पोष्ट बंद करीन कारण मी सर्व सत्य व आत्म्यापासून लिहतोय
💐 जय गुरुदेव 💐
🌹 क्रमश:--- भाग १६
त्यांना मी जे विचारले त्या सर्वाचे उत्तर त्यांच्याकडे तात्काळ असे कुठलाही विलंब किंवा विचार न करता ते तात्काळ देत होते मी अक्षरश: दिग्मूढं झालो पण त्यांच्या विषयी जिज्ञासा वाढली
म मी विचारले साधाकाने एका जागी राहून साधना करावी कि भ्रमणात सुद्धा साधना होऊ शकते
ते म्हणाले गुरु जपाची साधना हि भ्रमणात होऊ शकते ठराविक अनुष्ठान जशे मंत्र सिद्धी कोणतेही पारायण पुरश्चरण हे एकाच स्थानावर व्हावे व कोणतीही भ्रमणातील किंवा स्थानावरील साधनेकरता सर्वात महत्वाचे म्हणजे एकाग्रता व निर्विकारता आवश्यक असते
आसक्ती जाण्याकरता प्रमुख काय असावे
ते हसले व म्हणाले जे तुंचयकडे आहे ते आवश्यक
मी म्हणालो समजलो नाही
ते म्हणाले ठीक आहे सांगतो तुमची जशी गुरूंप्रति शरणागती व गुरु वाक्य प्रमाण आहे तेच मुख्य
मी विचारले साधना करताना काही वेळेस मनात विचारांचे काहूर का माजते
ते हसले म्हणाले ज्यावेळेस तुम्ही साधना सुरु करता त्यावेळेस तुम्ही एकाग्र होता पण मनाविरुद्ध घडले तर
मनामध्ये विचारचक्र सुरु होतात
मी विचारले अश्या वेळेस काय करावे
त्यांनी सांगितले दोन गोष्टी
एक तर तिकडे दुर्लक्ष करा किंवा ज्यांना आपण खरच शरण गेलो आहे त्यांना त्या विचाराच्या कक्षेत आणा
म मी म्हणालो त्यांच्या विषयी विचार असतील तर
म तर अगदीच सोपं आहे समजून घ्या अहो हि त्यांचीच परीक्षा बघण्याची पद्धत आहे
म मी विचारले परीक्षा ह्या साधने मध्ये कोणत्या स्तरापर्यत असतात
ते जोरात हसले म्हणाले अहो मनुष्य जन्म व त्यास येणार मृत्यू ह्या मधील संपूर्ण काळ हीच परीक्षांची वेळ आहे
मी म्हणालो उतार वयात कोणती परीक्षा
ते म्हणाले तुम्ही बाळबोध तर वाटत नाही कारण तुम्ही एक परिपक्व ज्ञानी साधक दिसतंय तरी मी तुम्ही विचारले म्हणून सांगतो
अहो उतार वयात संपूर्ण आयुष्य आपण जे कमावले त्याची देखरेख नीट होईल का नासाडी होईल हे विचार असतात म्हणून सुद्धा साधनेत लक्ष लागत नाही कारण मानसिक रित्या व्यक्ती हि भौतिकात अडकली असते आणि जे भौतिकात अडकतात ते परीक्षाच देत राहतात निकाल कधीच लागत नाही असं म्हणून जोरात हसले
ते जे सांगत होते खरोखर अवर्णनीय होते
म मी विचारले जरा मला परांन्न विषयी सांगा कारण सद्गुरूंनी मला परांन्न घेऊ नये असं सांगितलं आहे
ते म्हणाले अहो एकाच दिवसात किती विचाराल म परिभ्रमण केव्हा कराल
मी काही दिवस तरी बरोबर राहीन
त्यांच्या बरोबर राहण्यात आध्यत्मिक फायदा आहे असं जाणून मी त्यांच्या सोबत राहण्यास तयार झालो कारण सुरवातीपासून कोणा बरोबर राहिलो नाही त्यांनी मनातले ओळखले ते म्हणाले चिंता नका करू मी साधनेत व्यत्यय आणणार नाही कारण मला ही साधनांच करायची आहे आपल्या चालण्यात आपण अंतर ठेऊ मुक्कामाच्या ठिकाणी आपण आध्यत्मिक चर्चा करु
क्रमश:
💐 जय गुरुदेव 💐
क्रमश:---भाग १७
ठरल्याप्रमाणे ते पुढे व मी मागे साधारण १० ते १५ पावले आमच्यात अंतर होतें मी जप करीत चालत होतो
आता त्याच्या बद्दल थोडा विचार मनात आला आणि तो येण स्वाभाविक आहे मी काही फार मोठा साधक नव्हे
विचार करीत होतो की खरोखर साधक एवढा निरिच्छ होऊ शकतो बघा त्यांच्या कडे खरोखर अंगावरील एका पंच्याशिवाय त्याच्यांकडे काहीही नव्हते माझ्यापेक्षा उंची चांगली होती त्यामुळे त्यांचे चालणे जरा जोरात होते मलासुद्धा त्यांना सोडायचे नव्हते म्हणून मी पण जर जोरातच चालत होतो एवढया सगळ्या विचारात व चर्चेत मी काळ पासून काहीही खाल्ले नाही हे विसरलोच असो
आता बकावा नावाच्या गावापाशी मी आलो नर्मदा किनाऱ्यालगत एक आश्रम होता तेथे पोहचलो जरा थकवा जाणवायला लागला मी म्हणालो आज आपण येथे थाबायचे का ? ते म्हणाले तुम्हाला थाबायचे तर तुम्ही थांबा मी पुढे जाणार आहे
अरे बापरे अंगात तर त्राण नाही पण ह्यांना तर सोडायचे नाही कारण ह्यांच्यामुळे आपली ज्ञानवृद्धी होऊ शकते पुनः उठलो व त्यांच्या मागे चालू लागलो त्यांनी ओळखले मागे वळून न बघताच म्हणाले या या एकच गाव पुढे जाऊ मला माहित आहे तुम्ही मला सोडणार नाही कारण तुम्ही परिपक्व साधक असलात तरी ज्ञानाची तुम्हाला आसक्ती आहे व हे साधकाचे उत्तम लक्षण आहे
पुढे साधारण एक तास चालल्यावर आम्ही मरदाना ह्या गावी आलो
मागील गावाविषयी थोडेसे सांगणे राहून गेले मागील गाव बकावा ह्या ठिकाणी बाणलींग तयार होतात अतिशय छोट्यात छोटे व मोठ्यात मोठे बाणलींग येथे तयार करतात या ठिकाणी आम्ही ज्या आश्रमात गेलो होतो ते एक नर्मदा मातेचे मंदिर होते असो
आता आम्ही मरदाना गावात आल्यावर तिथे एक चहाचे दुकान आहे तेथे थांबलो खरं भूक लागली होती पण निग्रह पक्का होता त्यांना माहीत होते की नाही माहीत नाही कारण तसा विषय पण झाला नाही व तशी वेळ पण आली नव्हती ते फक्त म्हणाले चहा घ्या म्हणजे क्षीण जाईल आता हे द्व्यार्थी झाले मी काही बोललो नाही निमूट पणे चहा घेतला जरा बरे वाटले जवळ जवळ ३० ते ३२ तास झाले होते पोटात चहा व पाणी ह्या व्यतिरिक्त काहीही नव्हते पण तरी अंगात एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा होती असो चहा घेता घेता ते एढ़च म्हणाले। हट योग्य हा चांगला नाही
मरदाना येथे गेल्यावर त्यांनी सांगितले कोणत्याही आश्रमात थांबायचे नाही किनाऱ्यावर राहू मी तयार झालो
नंतर आम्ही किनाऱ्यावर असलेल्या मारुती मंदिरापाशी आलो मी सामान ठेवले व त्यांना म्हणालो स्नानकतून येतो व मी तुंबा म्हणजे कमंडलू घेऊन मैय्या पाशी आलो कमंडलूने पाणी घेऊन स्नान केले तेथेच संध्या केली परत मंदिरात आलो ते ध्यान लावून बसले होते मी नर्मदा काढून वर ठेवली व पूजा आरती सुरु केली नंतर अष्टक म्हटले मी त्यांनी सांगितले मी काही जेवणाचे बघतो मी काही बोलायचा आधीच ते निघून गेले
बऱ्याच वेळानी ते आले हातात एक पत्रावळ होती व त्यात पोहे व हिरवी मिरची मीठ होते
त्यांना मी जेवणार नाही व कारण सांगितले ते हसले त्यांनी पोह्यात मिरची कुस्करली मीठ टाकले व पाणी टाकून कालावले व खाल्ले मला हे काय चाललंय काहीच कळले नाही
ते म्हणाले मी रात्री तुमच्याशी निवांत बोलींन व ते पुन्हा ध्यान अबस्थेत बसले
क्रमश:---
माझ्या डॉ दिवसाच्या उपवास बद्दल ते बोलणार तर नाहीत न ह्या विचाराने मला ग्रासले बघू काय होते ते मी त्याच्या ध्यान मुद्रेकडे बघत राहिलो
उद्या दत्तजयंती आहे माझ्या साधनेला पूर्ण दिवस लागेल त्यामुळे उद्या परिभ्रमण पोष्ट टाकणार नाही क्षमस्व
💐 जय गुरुदेव 💐
क्रमश:--- १८
ते ध्यानस्थ बसले होते मी त्यांच्या ध्यानमुद्रेकडे बघत होतो विचार आला महाराजांच्या मनात काय आहे कळत नाही दोन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही त्या करतातर हे भेटले नाहीतन पण तसं ते अजून काही बोलत नाहीये हे का भेटले काहीच कळत नाही मी एवढंच म्हणेन की हे सामान्य नाहीत एक कबूल करतो की त्यांच्या पासून मला ऊर्जा मिळतेय कारण दोन दिवस उपाशी असून सुद्धा जास्त जाणवत नाही असो
काय करावं कळत नाही ह्यांचा बरोबर रहावे कि नाही काहीच कळत नाही पाणी प्यायलो सतरंजी घातली झोपण्याचा विचार करत होतो तेवढ्यात ते ध्यानवस्थेमधून बाहेर आले मला विचारलं झोपला काय झोपायला आलात का त्यांचा आवाज जरा जोरात होता म मी म्हटलं नाही
ते म्हणाले बघा मी तुमच्या गुरुएवढा श्रेष्ठ नाही पण तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान देऊ शकेन एवढी योग्यता माझ्यात आहे ते म्हणाले आपण असं करू आज पासून रोज रात्री आध्यात्मिक चर्चा करू मी म्हणालो चालेल
ते म्हणाले म माझं एक ऐका उपवास सोडा मी म्हणालो आपण श्रेष्ठ आहात हे मान्य पण माझ्या प्रश्ननाचे उत्तर मिळाल्याशिवाय ते शक्य नाही माफ करा ते हसले म्हणाले हठयोगी आहात तुमचे गुरु तुमची इच्छा पूर्ण करोत असो
म त्यांनी बोलण्यास सुरवात केली आध्यात्मिक समजण्यासाठी आपण आध्यात्म ह्या शब्दापासून सुरवात करू
आध्यात्म ह्या शब्दाची फोड बघा ज्या मध्ये फक्त आत्म्याचे विवेचन असत आदी पासून अंतापर्यत ते आध्यात्म
म विचार करा बरेच प्रश्न निर्माण होतील बघा प्रश्न कसे ते
१)आत्मा काय आहे ? आत्म्याचे शरीरातील नेमके स्थान कोणते
२) आत्मा अमर आहे तर मृत्यू काय आहे
३) आत्म्याचे प्रकार किती ?
४) मृत्यू नंतर होणाऱ्या क्रिया कोणत्या
५) पुर्नजन्म होतो का
६)जन्म मरणाच्या चक्राची गती कशी
असे अनेक प्रश्न निर्माण होतील आपण चर्चे द्वारे सोडवू
आता पहिला प्रश्न बघा आत्मा म्हणजे
काय
तर आत्मा म्हणजे पंचमहाभूतांचे एकत्रीकरण हे खरं कसे तर पंचमहाभूते अमर आहे म्हणून आत्मा अमर आहे
आता ह्याचे शरीरातील स्थान कोणते ह्याचा वर अनेक वाद आहेत
म ते म्हणाले नीट बघा आत्मा म्हणजे पंचमहाभूते हे मान्य तर ही जर शरीरात एकाच ठिकाणी असतील तर बाकीचे शरीरास निस्टजत्व येईल किंवा शरीरात जेथे आत्मा आहे तो भाग शरीरापासून वेगळा केला तर मृत्यू येणार नाही पण असे होत नाही ह्याचाच अर्थ आत्मा शरीरात एका ठिकाणी नाही म तो पूर्ण शरीरात विहार करतोय आणि ह्यालाच चेतना म्हणतात
पण ही चेतना एकवटली जाते जेव्हा साधक ध्यान करण्यास बसतो व त्याचे ध्यान लागते तेव्हा ही चेतना म्हणजे आत्मा शरीरात एका ठिकाणी स्थिर होतो म्हणून साधकास भोवताली चाललेल्या घटना समजत नाही ह्यालाच इंग्रजी मध्ये टांस मध्ये जाणे किंवा ब्रम्हांनदी मग्न होणे असं म्हणतात ह्याला वेग वेगळ्या उपमा आहेत
क्रमश:--
वरील विवेचन कोणाला अजून सविस्तर हवे असल्यास मला फोन करा मी अजून सविस्तर सांगेन बाकी प्रश्न उद्या बघू
💐 जय गुरुदेव 💐
क्रमश:--- भाग १९
कालरात्री त्यांच्या बोलण्यावर विचार करत झोपी गेलो
पहाटे उठलो आणि अतिशय आंनदातच उठलो कारण मला दृष्टांत (स्वप्न ) झाला तो आज देतोय
रात्री स्वप्नात सद्गुरू दिसले माझ्याशी नाही बोलले पण त्यांच्या समोर माझे एक गुरुबंधू बसले होते त्यांना महाराज जे सांगत होते ते सर्व मलाच उद्देशून होते
महाराज म्हणाले सद्गुरुंना आपण माता पिता मानतो म मातेने जर आपल्याला घराबाहेर काढले तर त्यामागे तिच्या निश्चित काहीतरी उद्देश असणार हे लक्षात यायला पाहिजे आपण तिला कारण विचारणे ते सुद्धा अन्नत्याग करून हे उचित नाही
सारखं आई बापाजवळ राहून विश्वात वावरायला केव्हा शिकणार स्वकर्तृत्वार साधना केव्हा करणार तुमची आईबापावर प्रचंड निष्ठा आहे तर ते कधीच तुमच्या पासून दूर नसतात तुमच्या मंदतीकरता कोणालातरी पाठवत्तातच तसेच नर्मदा परिक्रमा म्हणजे खऱ्या अर्थाने साधना व मनुष्याच्या आयुष्यातले चढ उतार व मानसिक बदल घडवणारी साधना आहे एवढं ऐकत असतानाच मला जाग आली असो
मला आनंद दोन प्रकारे
१) म्हणजे सध्या जे कोणी माझ्या बरोबर आहेत त्यांना महाराजानीच पाठवले
२) मला परिक्रमेला पाठवण्याचे कारण समजले असो
उठलो ध्यानसाधना झाली नंतर स्नान संध्या झाली नर्मदा पूजन व नर्मदा अष्टक म्हटलं नंतर त्यांना विचारले निघायचं का ते म्हणाले उपवास सोडणार का ? मी म्हणालो हो मी ते म्हणाले चला या आंनदात आपण आज इथे नर्मदा पूजन व कन्या पूजन करू व दुपारी पुढे निघू
मी विचारात पडलो कि कन्यापूजन कस करायचं कारण जवळ काही नाही त्यांनी ओळखले ते म्हणाले अहो काळजी का करता तुम्ही साधू वेष घेतलायन मग मागे भिक्षा बघा तुमचे सद्गुरू व मैय्या बघतील काय करायचं ते मी म्हणालो ठीक
मग मी भिक्षेकरता निघालो पूर्ण गावातून मला डाळ ,तांदूळ व आटा मिळाला मी परत किनारी आलो त्यांना म्हंटल अहो फक्त आटा तांदूळ व डाळ ह्यावर काय होणार ते म्हणाले शांत रहा बघा काय होत ते आणि काय आश्चर्य तेथील एक रहिवाशी बनवारीलाल पटेल आले त्यांनी विचारले आपण कन्या पूजन करीत आहात का मी हो म्हंटल्यावर त्यांनी सर्व जबाबदारी घेतली सर्व भांड्या पासून सर्व व्यवस्था केली मी एकट्याने सर्व स्वयंपाक केला व जवळ जवळ २१ कन्यांचे पूजन झाले व साधारण गावकरी व येणारे परिक्रमावाशी असे मिळून १०० पण झाले खुप आंनद वाटला ओकारेश्वर नंतर पहिलेच कन्यापूजन अतिशय चांगले झाले हि गुरु कृपा असो
ठसरल्या प्रमाणे दुपारी तीन वाजता पुढे जायला सुरवात केली आज खूप हलकं हलकं वाटत होत कारण मनातील विचारांची वादळे थांबली होती दोनी प्रश्नांची उत्तरे मिळाली होती आता बरोबर जे आहेत त्यांच्या बरोबर राहण्याविषयी शंका नाही व उत्सुकता नाही कारण माझ्या सद्गुरूंचे हे नियोजन आहे आताएकच उद्दिष्ट ह्यांच्या जवळ जे ज्ञान आहे ते आपल्या पदरात कसे पाडून घेता येईल असो
आम्ही भट्याण इथे आलो यालाच दुसरे नाव तेली भट्याण म्हणतात इथेच मुक्काम करायचे ठरले
ह्या स्थनाविषयी व मुक्काम का या विषयी तसेच कालच्या उरलेल्या प्रश्नांविषयी उद्या बघू
क्रमश:--
कुठलाही प्रश्न किंवा शंका मी अर्धवट ठेवणार नाही मला जे जे योग्य वाटेल तेच अतिशयोक्ती न करता आपल्या समोर मांडेन पटलं नाही तर सांगा पोस्ट बंद करीन
💐 जय गुरुदेव 💐
क्रमश:--- भाग २०
आम्ही संध्याकाळी ६ वाजता तेली भट्याण येथ येऊन पोहचलो मैय्या किनारी एक हनुमान मंदिर आहे तिथेच वरती श्री सियाराम महाराज हे एक खूप मोठे साधक आहेत त्यांनी ह्या ठिकाणी १२ वर्षे उभं राहून रामायण वाचले बरच काही त्यांच्या बद्दल लिहण्यासारखे आहे मी एवढंच म्हणेन की खरा साधक कलियुगातील एक तपस्वी त्यागी त्यांच्या अंगावर फक्त एक लंगोटी आहे बरच लिहता येईल एवढंच म्हणेन एका सत्पुरुषाचे दर्शन झाले असो
तेथेच झाडाखाली राहायचे ठरवले जरा वेळ बसून मग काठावर बसून तुंब्याने स्नान केले किनाऱ्यावरच संध्या केली नर्मदेचे आसन लावून नर्मदा पूजन अष्टक म्हणून जरा वेळ जप करून आम्ही दोघे सियाराम महाराजाना भेटावयास गेलो त्यांचे दर्शन घेतले त्यांनी चहा दिला त्यांच्याशी जरा वेळ संतसंग झाला त्यांनी संतसंग ह्या शब्दाचा सुंदर अर्थ सांगितला ते म्हणाले संतसंग इसका मतलब सत्य के साथ संग तो फिर पाहिले सत्य ढुंढो आब सत्य क्या तो सत्य ये कि सद्गुरू, परमात्मा ये सत्य तो इनके साथ हम रहे तो संतसंग असे बरेच ज्ञान त्यांनी दिले असो
नंतर आम्ही परत झाडाखाली आलो म मी त्यांना म्हणालो आपली प्रश्नोत्तरे बाकी आहेत ते म्हणाले ठीक
आहे
काल आपण बघितले आत्म्याचे शरीरात स्थान कोठे असते आज आपण बघू आत्मा अमर आहे तर मृत्यू कशास येतो
बघा आत्मा म्हणजे पंचमहाभूते हि अमर आहे म्हणून आत्मा अमर आहे
त्यामुळे आत्म्यास मृत्यू येत नाही पण जेव्हढे आयुष्य जगलो व पूर्वजन्मीचे कर्म बरोबर येत त्यापासून जो एक सूक्ष्म जीवात्मा निर्माण होतो त्याला सर्व कर्माच्या गती होतात
मृत्यू कसा येतो तर शरीरात पंचमहाभूते ज्या प्रमाणात असतात त्यांचे प्रमाण कमी अधिक झाले तर मृत्यू येतो म्हणजे शरीरातील तत्व एकेक करून देह सोडतात व पंचतत्वात विलीन होतात व आपण समजतो मृत्यू आला पण शरीरात जीवात्मा असतो त्याच काय होत हे उद्या बघू
क्रमश:--उद्या मृत्यूनंतर जिवात्म्याचा प्रवास बघू
💐 जय गुरुदेव 💐
क्रमश:--- भाग 21
आज जरा उठण्यास उशीर झाला कारण कालरात्री चर्चेमुळे व नंतर मैय्या किनारी बसून मैय्या कडे बघून रोज जे काय घडतंय त्या बद्दल चिंतन करत होतो असो
४.०० वाजता उठलो ते ओरडले साधकाने आपल्या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यास हवे तरच तो उत्तम साधक होऊ शकतो तुम्हाला निद्रेवर नियंत्रण नाही लाज वाटायला पाहजे जगता कशाला मैय्यात उडी मारा जीवन संपवा वाईट वाटले डोळ्यात पाणी आले विचार आला ह्यांचा माझा काय संबध हे माझ्यावर एवढे का ओरडतात पण पुन्हा विचार आला हे माझी साधना चांगली व्हावी म्हणूनच बोलतात खरं सांगतो मला घडवण्यात अनेक सत्पुरुषांचा हात आहे त्यातील हे एक मी सर्वांच सहन केल म्हणून मी घडलो असो
उठलो ध्यान केलं नंतर मैय्या जवळ जाऊन स्नान संध्या केली थोडा उशीर झाला कारण पाणी फार थंड होते ते वरतून जोरात ओरडले उडी मारताय का जरा खोल पाणी बघा म्हणजे वर नाही येऊ शकणार भरभर आवरलं वर येऊन पूजा आरती केली सर्व आवरता आवरता अष्टक म्हटलं एकीकडे रडू पण येत होते मन सांगत होते साधना करायची आहे काही साध्य करायचे आहे तर हे सहन करावे लागेल असो
निघण्याची तयारी केली ते म्हणाले थांबा बघा माझया बरोबर राशीचे असेल तर असे आळस किंवा मनमानी चालणार नाही जमत असेल तर बरोबर रहा नाहीतर तुमचा मार्ग मोकळा आहे मी त्यांना नमस्कार केला माफी मागितली व म्हणालो तुम्हांला त्रास होईल असं वर्तन पुन्हा घडणार नाही एकदा माफ करा बघा माझं त्यावेळेस वय ४४ होते त्यांनी डोक्यावरन हात फिरवला खरं सांगतो वेगळीच अनुभूती आली त्या स्पर्शात खुप ममत्व होते शब्दात नाही वर्णन करता येणार असे ममत्व पूर्वी फक्त दोनच व्यक्तींच्या स्पर्शातून जाणावले होते एक माझी जन्मदात्री व दुसरे माझे सर्वस्व आदरणीय प. पु. सद्गुरू मी तो हात फिरवल्यांनतर
अक्षरश: निशब्द झालो काय बोलावे कळेना त्यांनी माझी अवस्था ओळखली व फक्त हसले हा सद्गुरुंन पासून दूर राहिल्यांतरचा व परिक्रमेतला पहिला अनुभव होता असो
मी त्यांना सांगितले मला आज पण इथे राहण्याची इच्छा आहे आपण परवानगी दिल्यास इथे राहू त्यांनी कारण विचारले
मी म्हणालो आपण माझ्या मस्तकी जो हस्त ठेवलात त्यानी मी भारावलो आहे व ती घटना इथे घडली त्यामुळे मैय्याविषयी व श्री सियाराम महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करावयाची आहे म्हणून कृपया परवानगी द्याविआपन नाही म्हणाल्यास आपल्या इच्छानुसार पुढे जाऊ ते थोडावेळ काही बोलले नाही आणि नंतर हसले व तयार झाले नंतर दिवसभर जे घडले ते सर्वच धक्कादायक होते
क्रमश:---
💐 जय गुरुदेव 💐
💐 जय गुरुदेव
🌹 क्रमश:--- भाग २२
त्यांनी राहण्यास परवानगी दिल्यावर मी खाली मैय्या पाशी गेलो तिला वंदन केले तिथे एका दगडावर बसलो तिला सांगितले मी अज्ञानी आहे सर्वच माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहे काही कळत नाही पण ह्यांच्या मध्ये विलक्षण सामर्थ्य आहे हे जाणवते ह्यांची त्यागवृत्ती ह्यांची साधक वृत्ती असामान्य आहे हे निश्चितच श्रेष्ठ योगी असावेत ह्यांना पण सद्गुरू स्थानी बसवावे असं वाटत ज्यांच्या कडून आपल्याला सद्गुण घेता येईल ते गुरुस्थानी असतात असं शास्र सांगते मनात घालमेल सुरु झाली कारण परवानगी घेण्याकरिता माझे सद्गुरू इथे नाहीत व ह्यांना विचारणार कस मग मी पद्मासनात बसलो मनात सद्गुरू करणांचे स्मरण केले मनोभावे मानस पूजा केली व म्हणालो मला ह्यांच्या कडून अनुग्रह घेण्याची इच्छा आहे आपण योग्य काय ते ठरवावे आपणास आपल्या मुलाची आध्यात्मिक लालसा ज्ञात आहे व आपल्या आज्ञेबाहेर मी नाही हे पण आपण जाणता त्यामुळे आपणच काय ते ठरवावे आपली परवानगी असल्यास त्यांनी हुन मला सांगितले तर मी आपली परवानगी समजेन
बराच वेळ निघून गेला मल्स एकदम प्रसन्न वाटत होते मी तेथून उठलो वरती सियाराम महाराजांपाशी गेलो ते बाकीच्या लोकांना चहा देत होते मला खुणेनेच बसण्यास सांगितले नंतर मला चहा दिला व एवढंच म्हणाले आप चिंता क्यू करते आपकी आपके गुरुपे श्रद्धा है तो वो देख लेंगे मला आश्चर्याचा धक्का बसला कारण मी काय विचार करतो हे यांना कळले असो
मी परत झाडाखाली आलो ते मैय्या कडे तोंड करून बसले होते ती त्यांच्या समोर जाऊन बसलो त प्रथम माझ्याकडे बघून हसले थोडा वेळ निशब्द शांतता होती नंतर त्यांनीच बोलायला सुरुवात केली
ते म्हणाले माझा अनुग्रह घेण्याची इच्छा आहे मी मान डोलावली त म्हणाले अग्निजवळ येण्याचा विचार करताय माझी साधना अवघड आहे झेपेल का मी म्हणालो क्षमा करा पण साधना आपणच करवून घेणार आहात माझी काय योग्यता ते म्हणाले हुशार आहात स्वता विचारले नाही आपल्या सद्गुरुंना मध्यस्थी केले मग त्यांनी विचारले गुरुदक्षिणा काय द्याल मी म्हणालो मुळात हा देह व मन आधीच मी सद्गुरुंना अर्पण केलाय आपण जर अनुग्रह दिलात तर आपण पण सद्गुरू मी आपण दोघांनी ठरवावे ह्या देहाचे व मनाचे काय करायचे हे ऐकून त्यांनी मला इतकी कडकडून मिठी मारली कि मला काहीच कळले नाही बराच वेळ त्यांचा हात माझ्या मस्तकी होता माझे शरीर एकदम क्षीण झाले होते काय होत होते काहीच कळत नव्हते सगळंच अनपेक्षित, अनाकलनीय, व आश्चर्यकारक असे घडत होते खरंच सांगतो शब्द नाहीत माझ्याकडे त्यावेळेचे वर्णन करायला असो नंतर त्यांनी डोक्यावरील हात काढला व म्हणाले आंघोळीचे कपडे व वरून बादली घेऊन खाली मैय्या पाशी या व ते उठून चालायला लागले मी त्यांच्या कडे पहात राहिलो परत त्यांच्या निर्विकारतेचा प्रत्यय आला
मी वर गेलो सियाराम महाराजाना बादली मागितली ते फक्त म्हणाले हो रहा है न मन के माफिक मी फक्त मान हलवली त्यांनाही नमस्कार केला
खाली गेलो त्यांनी मला एका दगडावर पूर्वेकडे तोंड करून बसवले व त्यांनी मैय्यातून पाणी आणून माझ्यावर घालण्यास सुरवात केली माहीत नाही किती पाणी घातले असेल मी पूर्ण गारठून गेलो होतो माझ्या अंदाजे किमान २५ ते ३० बादल्या ओतल्या असतील तोंडातल्या तोंडात ते काहीतरी म्हणत होते माझा मात्र माझ्या मनात सद्गुरूंचा जप चालू होता बऱ्याच वेळाने ते थाबले
क्रमश:---
मला ते सगळं आठवून डोळ्यातून खुप पाणी येतंय लिहण अशक्य होतंय उद्या बघू
क्रमश:--- भाग २३
त्यांनी मला स्नान घालून ते माझ्यासमोर बसले मला खुप थंडी वाजत होती मनात सद्गुरूंचा जप चालू होता थंडीमुळे तोंडातून शब्द सुद्धा निघत नव्हता
त्यांनी माझ्याकडे बघितले पण त्यांच्या कडे पाहण्याची माझी हिम्मत होत नव्हती माझं लक्ष त्यांच्या पायाकडे होत त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला त्यामुळे माझ्या अंगात एकप्रकारची ऊर्जा आली व खरोखर थंडी गायब झाली नंतर त्यांनी माझ्या डोळ्यावरून हात फिरवला आणि नंतर जवळ खेचून माझ्या कानात तीन वेळा एक मंत्र सांगितला हे सगळं होत असतांना तेथे फक्त मी ,ते, व श्री सियाराम महाराज होते बाकी कोणीही किनाऱ्यावर नव्हते हे खरंच आश्चर्य कारण वेळ सकाळी १०.३० ते ११.३० हि होती असो
नंतर मी त्यांना नमस्कार केला व सियाराम म्हाराजांनाही नमस्कार केला सियाराम महाराजांचा हातात एक भांडे होते त्यांनी सांगितले हि घ्या कढई प्रसाद ( आट्याचा शिरा ) जो नर्मदेला आवडतो मैय्याला नेवेद्य दाखवा व सद्गुरुंना द्या
मी मैय्याला नेवेद्य दाखवला व त्यांचा समोर ठेवला त्यांनी मला थोडासा भरवला मग सियाराम महाराजांना दिला नंतर सगळ्यांना वाटायला सांगितला असो
नंतर आम्ही वर आलो मग त्यांनी सांगितले बघ मी तुला मंत्र दिला मी तुझा सद्गुरु झालो पण पहिला मान हा तुमच्या प्रथम सद्गुरूंचाच राहील त्यामुळे तुम्ही निर्धास्त रहा खरोखर हे ऐकल्यावर माझा मनाचे खूप मोठे ओझे उतरले पुढे ते म्हणाले पूर्ण परिक्रमा होईस्तो पर्यंत मी तुझ्या बरोबर राहीन रोज ज्या प्रमाणे तुझ्या सद्गुरूंचे स्मरण करतो त्याच प्रमाणे तू मी दिलेल्या मंत्राचा जप करणे खरी गुरुसेवा म्हणजे गुरूंनी दिलेल्या मंत्राचे सांगितल्या प्रमाणे अनुष्ठान करणे सामर्थ्य हे कधीही मंत्रात असते तो मंत्र सद्गुरु देतात म्हणून ते श्रेष्ठ त्यामुळे मंत्रावर पूर्ण एकाग्रता असणे अत्यंत जरुरीचे असे बरेच ज्ञानदान त्यांनी दिले असे आमचे बोलणे चालू असताना सियाराम महाराज तेथे आले त्यांनी सांगितले तुम्हाला अनुग्रह मिळाला म्हणून मी येथे भांडारा देतोय तुम्ही थोड्या वेळाने येऊन मैय्यास नेवेद्य दाखवा व नंतर किमान एक पंगत तरी वाढा मी ते ऐकून अक्षरशा रडलो खरंच माझ्या सद्गुरुंची माझ्यावर किती कृपा आहे मी त्यांची उतराई होऊ शकेन का त्यांनी मला नेवेद्य दाखवण्यास व पंगत वाढण्यास जा म्हणून सांगितले
नंतर मी उठलो वर जाऊन दोन नेवेद्य वाढले एक मैय्यास व एक माझ्या बरोबर जी मैय्या आहे तिला नेवेद्य दाखवला नंतर माझ्या द्वितीय सद्गुरू त्यांना मी स्वामी म्हणण्यास त्यांच्या परवानगीने सुरवात केली तर मी स्वामीना घेऊन वर आलो त्यांना पत्रावळ वाढली त्यांच्या समोर उभा राहिलो त्यांचे पूर्ण भोजन झाल्यावर मी त्यांची पत्रावळ बाजूला ठेवली त्यांनी विचारले हे काय मी सांगितले सर्व पंगती झाल्यावर मी आपला प्रसाद म्हणून त्यात भोजन करीन ते फक्त हसले नंतर मी पंगती वाढू लागलो साधारण तीन वाजे पर्यंत पंगती झाल्या बघा सद्गुरू निष्ठेचे फळ जवळ एक रुपया नसताना सुद्धा काल कन्यापूजन आज एवढा मोठा सोहळा म खरं सांगा हि गुरुकृपा नाहीतर दुसरे काय हि गुरुकृपाच
क्रमश:---
आज मी खूप आंनदात आहे
💐 जय गुरुदेव 💐
क्रमश: भाग २४
आज खुप आंनदात आहे मला अजून एक अनुग्रह मिळाला
संध्याकाळच्या आरती पूजेच्या आधी खाली किनाऱ्यावर आलो सकाळी ज्या दगडावर मला अनुग्रह मिळाला त्या दगडावर बसलो व मैय्या कडे बघत होतो पण मनात विचारांचे वादळ सुरु झाले
विचार नाही प्रश्न यायला लागले
बघा प्रश्न मी पुन्हा अनुग्रह का घेतला मी मला पहिल्या गुरूंविषयी स्वप्नात सुद्धा कोणतीही शंका नव्हती दुसरे गुरु करतांना मला तारेवरची कसरत तर नाही करावी लागणार चुकूनसुद्धा ह्या दोन महात्म्यापैकी कोणाचाही माझ्याकडून अपमान तर होणार नाही न हे दोघेही मला जी जी साधना करावयास सांगतील ती माझ्याकडून पूर्ण होईल का असे अनेक प्रश्न मनात येत होते पण मन विचलित नव्हते अपराधी पण वाटत नव्हते मी चुकीचं करतोय असं तर बिलकुल वाटत नव्हतं मैय्याला प्रार्थना केली मन स्थिर कर
मग जाणवायला लागले की माझ्या दुसरा अनुग्रह म्हणजे ह्यांच्या कडून एक त्यागवृत्ती व निर्विकारिता अंगिकाराणे व त्यांच्या जवळ असलेल्या मंत्र सामर्थ्याचा अभ्यास करणे मी दोघांनाही सर्वस्व मानतो त्यामुळे मला कोणतीही कसरत करावी लागणार नाही दोघेही मला पुत्रवत प्रेम करतील ह्याची खात्री आहे
बराच वेळ असाच बसलो नंतर मन थोडे स्थिर झाल्यावर वर आलो मग स्नान नर्मदा पूजन आरती अष्टक म्हटले स्वामींना नमस्कार केला जेवायची इच्छा नव्हती स्वामींना त्यांच्या भोजनाविषयी विचारले त्यांनी नकार दिला ते म्हणाले खाली चल मी आपण बोलू
म आम्ही खाली किनाऱ्याला आलो त्यांनी बोलण्यास सुरवात केली माझी भूमिका फक्त ऐकणे ते म्हणाले बघ तू माझा अनुग्रह घेतला आहेस चिंता करू नको मी तुला कधिही द्विधा अवस्थेत ठेवणार नाही कारण सद्गुरू हे नेहमी मातृपितृ स्थानी असतात व कोणतेही मातापिता आपल्या बालकास द्विधा अवस्थेत ठेवत नाहीत त्यामुळे निर्धास्त रहा मुलगा चुकला तरच आईवडील रागावतात व शिक्षा करतात असो
बघ मनुष्याचा मन हे जलमय असलेल्या मैय्या सारखे असते
म्हणजे बघ जेंव्हा ती संथ वाहते तेंव्हा ती किती निर्मळ असते तसेच मनुष्य जेव्हा विचाररहित असतो तेंव्हाच तो संथ म्हणजे निर्विकार असतो
जशी मैय्या जोरात धावते त्यावेळेस लाटा उसळतात व त्या लाटा एखाद्या दगडावर आदळतात व लाटा नाश पावतात तसेच मनुष्य विचाराच्या गर्तेत अडकून लाटां सारखा धावतो व एखाद्या संकटाच्या खडकावर आदळतो पण फरक एवढाच की जर मनुष्य सद्गुरू कृपानकीत असेल तर संकटाच्या खडकावर आपटला तरी पूर्ववत संथ वाहतो किंवा सद्गुरू कृपेने खडकावर आदळल्यावर त्या खडकाचा चुरा होतो स्वामींची हि समजवण्याची पद्धत फार वेगळी होती समजण थोडं अवघड वाटत होते पण मी निश्चल शांत पणे ऐकत होतो असो
क्रमश:
ते अजून खूप बोलले काय बोलले उद्या बघू
too good but please advice daily written parts after 57 till end of prikrama
ReplyDeleteश्री नर्मदा मातेच्या सान्निध्यात राहून तिची परिक्रमा करतांना आई लेकराची कशी काळजी घेते हे या लेखनावरून समजले.
ReplyDeleteसंत मंडळी भेटणे हा आईचाच प्रसाद. चमत्कार नामक कांही नसून लेकरावरच्या आईच्या मायेचे स्पष्ट व्यक्तीकरण लेखकाला अनुभवास आले. हा पूर्व सुकृताचा भाग आहे.
लेखन बोलके आणि ओघवते आहे. धन्यवाद
अण्णा
९४२२७५६३३३. नाशिक- पंचवटी.
१०/०३/२०१९.
काका महाराजांचे 44 एपिसोड नंतर पुढचे भाग दिसत नाहीत तरी ती कुठे उपलब्ध होतील याची माहिती द्यावी
ReplyDelete