Friday, 20 January 2017

नर्मदा परिक्रमा भाग 43 to57


💐  जय गुरुदेव 💐
🌹 क्रमश:--- भाग ४३
उठण्याचा प्रश्नच नव्हता कारण अक्षरश: रात्रभर जागा होतो कारण खूपच थंडी आहे आजूबाजूला दाट झाडी व पांघरायला फक्त एक शाल स्वेटर नाही खरोखर स्वामी कसे काय झोपले आश्चर्य आहे असो
पहाटे ३.०० वाजता ध्यान साधना केली नंतर ओहळावर  स्नान  केले खुपच थंडी वाजतेय पण स्वामींकडे बघून थंडी दूर करायचा प्रयत्न करतोय असो
स्वामींना चहा किंवा मला दूध असे काही नाही साधना, पूजा झाली नंतर सर्व आवरून पुढे निघालो धरा धवल घाट येथे दुपारी आलो दुपारी येथे थांबायचे ठरविले तेथे एका भिल्लाने कोरा चहा दिला मी तेथेच स्नान करून दुपारची साधना केली स्वामींना येथे एका झोपडीतून भाकरी व डाळ भिक्षा मागून आणली असो
दुपारची विश्रांती घेऊन पुढे निघालो काकराडा व पुढे देववाडा  येथे आलो रात्री येथे  मुक्काम  करायचे ठरवले तेथीलच जवळपास कोरडी भिक्षा मागून चपाती बनवली व स्वामींकरता डाळ बनवली नंतर  स्नान करून साधना ,पूजा केली मग स्वामींना भोजन दिले मी पाण्याबरोबर चपाती खाल्ली सर्व आवरून स्वामीसमोर बसलो कारण कालच विषयी ते पुढे बोलणार आहेत।
स्वामीनीं बोलण्यास सुरवात  केली महाराजानी त्या व्यापाऱ्याला बोलावणे पाठवले  तो व्यापारी आल्यावर त्याला स्वामींनी ती चांदीची वाटी परत दिली तो व्यापारी म्हणाला अहो महाराज  मी बघितले होते पण आपण इतके ज्ञानी व सत्शील आहेत मला एका वाटीने काहीच फरक पडत नाही पण तुम्हाला वाटी दिलीतर मला पुण्य मिळेल
म्हाराजांनीं त्याला विचारले  की तुम्ही काय करता त्यांनी सांगितले मी व्यापारी आहे महाराज म्हणाले तुम्ही चोरी लांडी  लबाडी  करता का तो व्यापारी म्हणाला आपण श्रेष्ठ आहात आपल्याशी काय खोट बोलायचे मी खरं सांगतो व्यापारात खोट चोरी लांडी लबाडी थोडी होतेच म मी महाराज म्हणाले अरे तुझे अन्न खाल्ले व मला ही तशीच बुद्धी झाली
स्वामी म्हणाले म्हणून अन्नाला दोष आहेत मी म्हणालो स्वामी मी एक विचारू का ह्या करता काय करावे संन्याशी तर भिक्ष घेतात त्यात तर अन्न असते किंवा ब्राम्हण म्हून कुठे जेवायला जातो किंवा शिष्या घरी जेवणाचा प्रसंग येतो असे घडत म काय करावं
स्वामी म्हणाले फार सुंदर प्रश्न मी हे सविस्तर तुला उद्या सांगेन झोप आता
क्रमश:----
परत स्वामींनी उत्सुकता वाढवली पण आज मी जास्त विचार करायचा नाही ठरवलं
लेखक श्री विश्वास वाड

💐   जय  गुरुदेव   💐
🌹 क्रमश:--- भाग ४४
पहाटे ३.०० वाजता उठलो ध्यान स्नान संध्या पूजा करून  पुढे निघायचा  तयारीत  होतो  तेवढ्यात स्वामी म्हणाले तुझ्या  सर्व वस्तूंकडे नीट बघून  घे कारण आज नंतर तुझ्याकडे ह्या वस्तू राहणार  नाही ते ऐकून मला आश्चर्य  वाटले मी विचारले म्हणजे काय स्वामी म्हणाले काही नाही चल आता पुढे काय होते ते मला खरंच काही समजले नाही बघू काय होते ते  असो
   आम्ही पुढे  निघालो उमर मांडवी येथून  टेपरानी येथे दुपारी  पोहचलो  दुपारी येथे थांबायचे ठरवले  येथे एका झाडाखाली थांबलो व दुपारी स्नानाकरता  निघत होतो
  तेवढ्यात समोरच्या  ओहळातून चार पाच धडधाकट व्यक्ती आल्या त्यांच्या हातात कुऱ्हाड व तिर कामट्या होत्या ते पाच जण होते आमच्या समोर आले त्यांनी प्रथम स्वामींना विचारले आपके पास क्या  है स्वामीनीं सांगितले फक्त पंचा  है  त्यांनी महाराजांचा  पंचा घेतला मग माझी पिशवी घेतली त्यातून फक्त मैय्या व मैय्याच्या पूजेचे सामान परत केले व बाकी सर्व सामान  त्यांच्या जवळ घेतले मी मागायचं प्रयत्न केला  तर  त्यातील दोन जणांनी रागाने  बघितले  व बोलले आप परिक्रमा कर रहे हो आप साधू बने हो तो ये चिजोंकी आपको क्या जरुरत त्यांनी मला व स्वामींना फक्त   दोन दोन  रामदास ( लंगोट ) लज्जा रक्षणकर्ता दिले  व ते निघून गेले
    स्वामी जोरजोरात हसायला लागले  मला काहीच समजत नव्हते रडावं ओरदाव का हसावं कारण अंगावर फक्त रामदास व समोर झाडाला अटकवलेली मैय्या व तिचे पूजेचे सामान बाकी काही नाही मी निशब्द खाली बसलो आता पुढे काय
  स्वामी म्हणाले आता कसला विचार करतोयस  दुपारची साधना नाही की करणार पुढे पण जायचंयन मी म्हणालो असं ते म्हणाले अरे भिल्ल काय म्हणाले साधूला काही लागत नाही साधूला कश्याही अवस्थेत राहता आलं पाहिजे जो कश्याही अवस्थेत दुःखी व आनंदी  होत नाही तोच खरा निर्विकार  व स्थीतप्रज्ञ साधक उठ जा स्नानाला
मी उठलो स्नान केले  संध्या दुपारची साधना केली आणि  बसलो तेव्हड्यात त्या  भिल्ला  पैकी एक भिल्ल कोरा चहा घेऊन आला मी त्याला सांगितले मेरा जप चालू है  मै नहि लेता स्वामींनी चहा घेतला त्या भिल्लाने विचारले भोजन करोगे मी नाही म्हणालो स्वामी पण नाही म्हणाले
मी म्हणालो भोजन मत दो सिर्फ एक धोती दे दो तो म्हणाला महाराज मेरे घर चलो दो दिन तीन दिन जितना दिन रुकना है रुको मै सेवा करुंगा  लेकीन सांमान भूल जाओ तो निघून गेला थोडा वेळ थाबुन तेथून  निघालो हातात फक्त काठी व महाराजांनी  दिलेला तुंबा व मैय्याची पिशवी
तुंब्याबद्दल बोलायचे तर ते भिल्ल तुंबा पण नेणार होते पण मी सांगितले हा माझा नाही माझ्या सद्गुरुंच्या आहे  तुम चाहो तो मेरी जान  लेलो पर  मै ये नाही दुंगा  बराच वेळ मी देत नाही पाहून त्यातला एक भिल्ल कुऱ्हाड घेऊन माझ्यावर धावला पण तरी मी देत नाही पाहून एका भिल्लाने हसून सांगितले ठीक है राहने दो असो
मन अस्वस्थ होते कारण  अंगावर एक रामदास सोडला तर काही नव्हते मन अस्वस्थ हिते जप होत नव्हता चालत होतो
तेवढ्यात स्वामी ओरडले अरे कितीही विचार केला तरी सामान परत येणार नाही वेळ का वाया घालवतो जप बंद का केला जप कर मी जप चालू केला
क्रमश:---
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव   💐
💐 क्रमश:-- भाग ४५
रस्त्याने चालत होतो पण डोळ्यासमोरील दुपारचा प्रसंग काहीही केल्या जात नव्हता काय झालंय  काय होतंय काय होणार आहे  काहीच  कळत नव्हतं मनस्तिथीच वर्णन करणं सुद्धा अशक्य मनात प्रचंड वादळ होते
      सामान  भिल्लांनी  घेतलं त्याच दुःख नव्हतं पण जी आत्ता अवस्था होती त्याच वैषम्य वाटत होते कारण रस्त्याने चालायचं व अंगावर फक्त रामदास त्यामुळे मनात गोंधळ होता किती दिवस अशी अवस्था राहणार कळत नव्हते दुसरा विचार येत होता अश्या प्रसंगाने निर्विकारिता येईल? निरासक्त होण्याकरता अशे प्रसंग येतात का ? का  देहावरील आसक्ती जाण्यासाठी म्हणजे लाज लज्जा याविषयी मनाची  चंचलता बघण्यासाठी असे घडले ? काहीच कळत नव्हते रस्ता कापत होतो  पण जप होत नव्हता रस्त्याकडे लक्ष नव्हते
इतक्यात स्वामी जवळ आले खांद्यावर हात ठेवला अरे किती विचार करशील अरे ते तर किरकोळ सामान होत एक दिवस न दिसणारा कोणी येईल व हे  शरीर  सुद्धा सोडायला सांगेल  आणि सोडायला सांगेलच असं नाही तर सोडून द्यावा लागेल तर काय करशील अरे जिथे तुझ्या देहावर तुझा अधिकार नाही म्हणजेच देह तुझा नाही तर ते सामान गेल्याबद्दल का खेद करतो
मी म्हणालो स्वामी तस नाही मला सामानाची आसक्ती नाही पण आता जी अवस्था आहे तिचे चालताना लाज वाटते स्वामी परत हसले अरे तू साधक आहेस न मी साधक प्रथम सद्गुरू व नंतर परमात्मा यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही विचार करत नाही आपण त्या झाडाखाली बसू तुझं मन शांत करणं हे मी तुझा सद्गुरू म्हणून कर्तव्य आहे  एवढा विषणणं होऊ नकोस अजून तर  तुला आयुष्यात साधनेद्वारे फार पुढे जायचे आहे आदर्श निर्माण करायचा आहे मी तूला काही सांगतो ऐक
क्रमश:---
स्वामी बोल्ट होते कां ऐकत होते मन समजून घेण्याचा प्रयत्न करीत होते पण स्थिर हिट नव्हते
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव   💐
🌹 क्रमश:--- भाग  ४६
स्वामींनी   एका झाडाखाली बसवले मनात खरंच खूप वादळ होते स्वामी म्हणाले पहिले शांत हो आणि पहिले ठरव तुला कसलं वाईट वाटतंय तुझ्या मनात झालेल्या घटनेबद्दल अनेक विचार येतायेत  म्हणून गोंधळ होतोय
एक एक गोष्टीचा बद्दल विचार केलास तर आपोआप  उत्तरे सापडतलं जातील
स्वामी म्हणाले माणसाचे असेच होते जेंव्हा घटना घडते तेव्हा माणूस कधीहि एक विचार करत नाही तो अनेक विचारांचे  मोहळ  मनात घोळवतो त्यामुळे त्याची अस्वस्थता वाढते असो
आता तुझ्या आज घडलेल्या प्रसंगाबद्दल बघू  मुळात तुला वाईट कसले वाटते तर आपण एक एक प्रश्न बघू
१) तुला सामान गेले त्याच वाईट वाटत का?
तर हे बघ ते सामान आयुष्यभर थोडीच पुरणार होत त आत्ता पर्यंत तुझ्या हातातून किती वस्तू हाताळल्या गेल्या त्या परत आल्या का तर तुला त्याच वाईट वाटतंय का नाही रे कुठल्याही गोष्टीत किंवा वस्तुत व्यक्तीत तू मन गुंतवल  तर त्या  सर्वां विषयी माया  निर्माण होते पण ह्या सर्व  गोष्टी सोडून जाणार आहेत किंवा सोडाव्या लागणार आहेत हे जर मनाशी घट्ट केलं तर  कोणताही त्रास होत  नाही
२) तुला असं वाटत सामान गेलं तर दुःख नाही पण असं फक्त रामदास ( लंगोट ) वर क्स चालायचं
तर तू स्वताला साधक म्हणवतोस साधकाला आपल्या शरीराची तमा नसावी जर तू साधक आहेस तर तुझे सर्व मन विचार व कृती हि फक्त साधनेशी  बांधील असावी  इतरत्र कुठेही नको म शरीरावर वस्त्र नाही तर लोक काय म्हणतील  ह्या कडे लक्ष जाणारच नाही रे तू तर वस्त्राच्या करता लोकांचा विचार करतो बघ  संत गोराकुंभार आपल्या नांसमरणाच्या साधनेत इतका मनस्वी एकरूप होता की त्याचे बाळ त्याचा पायाखाली आले तरी त्याला कळले नाही इतकी एकरूपता जर साधनेत आलीस तर लोक लाज  है विषयी तुला काहीच वाटणार नाही आता तुझ्या मनातल्या चाललेल्या पुढच्या वादलाविषयी
क्रमश:---
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव  💐
क्रमश:--- भाग ४७
स्वामी सर्व तऱ्हेने समजवत होते पटत पण होते पण मन हे सगळे मान्य करून सुद्धा पुन्हा पुन्हा विचारात गुरफटत होते B
मी स्वामींना सांगितले आपण जे सांगताय ते सर्व पटतंय पण मन म्हणजे काही लाईटच  बटन नाही की बंद केले कि बंद स्वामी म्हणे मान्य पण मन म्हणजे पंख्याच तर बटन आहे की बंद केल्यावर हळूहळू बंद होईल पटतंय का?
    आता बघ सामान्य माणसाचे मन हे पंख्याच्या बटनासारखे  असते की ते बटन बंद केले की हळू हळू बंद होते म्हणजेच मनातले विचार काढायचे सामान्य मनुष्याने ठरवले तर हळू हळू जातात पण साधकाचे तसे नसावे त्याचे मन हे लाईटच्या बटना सारखे असावे कि बंद म्हणजे बंद पटलं का
मला हे हि पटलं समजवण्या करता किती  सोपे उदाहरण होते
स्वामी म्हणाले बघ हेच उदाहरण मी तुला पुढे समजवतो कसे ते बघ  बटन  लावणारा म्हणजे फिटिंग करणारा एकच असतो तसेच वायर पण सारखीच असते तरी असं होत तर ह्याच कारण काय ते लाईट आणि पंखा ह्या मधील जी यंत्रणा बसवली असते ती महत्वाची असते आणि त्या यंत्रणेवर अवलंबुन असते जसे लाईट ला फक्त वायर मधून आलेली एकच सूचना त्या लाईटला समजते म्हणून तो बंद होतो पण पंख्याच तस नसत त्याला  वायर रेग्युलेटर व व त्यातील बेअरिंग ह्या मार्फत आलेल्या सुचनाद्वारे बंद होते आता हे सगळं मनाला लावून बघ
साधक हा सुद्धा लाईट सारखा असतो फक्त सद्गुरू जे सांगतील तेच तो मानतो व सामान्य माणूस हा पंख्यासारखा प्रत्यकाच ऐकत असतो म्हणून त्याचा मनातले विचार जायला वेळ लागतो तर तू साधक आहेस म्हणजे लाईट आहेस  आणि लाईटचा दुसरा अर्थ  प्रकाश  म्हणजे तू एक प्रकाश आहेस त्यामुळे तू काय करायचंय ते ठरव विचार करायचा का नाही  स्वामी सांगतात ते खरोखर बरोबर होते असो
पुन्हा उठून दोघेही चालायला लागलो मन पूर्ववत होत होते म्हणजे अजपाजप सुरु झाला होता
अजपाजप करत धडगाव येथे आलो तेथील शाळेत थांबायचे ठरवले तस आमच्या अंगावर फक्त रामदास होता इकडे त्याच विशेष  नव्हते कारण इथं बरेच लोक तसे होते कारण गरिबी असो तेथील ओढ्यावर स्नान करून संध्याकाळची साधना पूजा आरती केली एका भिल्लाने स्वामींना उडदाची डाळ व भाकरी आणून दिली व मला तो  म्हणाला महाराज येथे जास्त चपाती तर नाही मिळणार एक चपाती आहे तेवढ्यात भगवा म्हणजे दूध तर नाहीच पण चपाती खुप मोठी व जाड होती चपाती  पाण्याबरोबर खायला सुरवात केली एवढं सगळं गेलं पण आनंद एवढाच होता की माझ्या महाराजांचा तुंबा माझ्या बरोबर होता म्हणजे महाराज माझ्या बरोबर होते हि भावना मनात आली आणि एवढ्यात स्वामी जोरात हसले मला काहीच कळले नाही मी विचारले काय झालं स्वामी म्हणाले आश्चर्य आहे न सद्गुरू मनात ठाण मांडून असायला हवे आणि तू  तुंब्यात बघतोय हे  ऐकून मला खुप  ओशाळल्या सारखं झालं खरोखर स्वामी माझ्यावर  किती बारीक लक्ष ठेवतात मनात काही यायचा अवकाश ते लगेच बोलतात
आवरायला काहीच नव्हतं हात धुऊन स्वामी समोर बसलो
स्वामी बोलायला लागले
क्रमश:----
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव  💐


💐  जय गुरुदेव  💐
       🌹 नर्मदा परिक्रमा
क्रमश:---- भाग ४८
स्वामीं समोर बसलो स्वामी काय सांगतील उत्सुकता होती स्वामीनीं बोलण्यास सुरवात केली
मन काही अंशी का होईना अस्वस्थ होतेच हवेत गारठापण होता अंगावर वस्त्र नव्हते स्वामीं समोर कसा बसलो असेल फक्त कल्पनाच करा असो
स्वामी म्हणाले चोरी विषयी न बोललेलं बर कारण कितीही बोललो तरी निष्पन्न काही निघणार नाही
    ह्या चोरीचा आपण दुसऱ्या बाजूने विचार करायचा का ? आता बघ  काहींचे म्हणणे असे की हे मैय्याचा भाऊ आहेत मैय्या त्यांना लुटण्यास सांगते हे पटेल का तर मी सांगतो नाही कारण बघ ते मैय्याचा भाऊ आपण मैय्याची मूल म सांग कुठली आई मुलाला लूट असं भावाला सांगेल मी हे न पटणार म का लुटलं जात तर त्याची माझ्या दृष्टीने दोन कारणे
१) हा संपूर्ण भाग निर्जन व जँगलात असा आहे येथे जी वस्ती आहे त्या लोकांना इथे रोजगाराचे कुठलेही साधन नाही म ह्याचा उदरनिर्वाह कसा व्हायचा तर शास्त्र सांगते
"जीव जीवस्य जीवनं" म्हणजेच है लोकांना आप्लाउदर निर्वाह करता हे करावं लागतं असेल  आणि अजून एक बघ त्यांच्यात माणुसकी आहे बघ आपल्याला लुटलं तरी मला  चहा दिला जेवणाविषयी विचारले म्हणजे हे खरे चोर नाही तर आपल्या उदर निर्वाह करता ते हे कर्म करतात
२) ते  परिक्रमावासीयांनाच  लुटतात  का तर  बघ  आपण  परिक्रमा सुरवात  करतांना  संकल्प सोडून साधू तत्व  आवलंबतो  म्हणजेच  त्याग प्रवृत्ती  अंगिकारतो  म  आपण  खरंच  निरासक्त व विरक्त आहोत का हा प्रश्न आपल्याला  चोरी झाल्यावर  आपल्या विचार  प्रवृत्ती  वरून कळते आणि आपण  खरंच  मैय्या करता व साधनेकरता  एकनिष्ठ आहोत का नाही ते कळेल  असो
आता  सध्या तू करत असलेल्या साधनेबद्दल बोलू  ह्या साधनेद्वारे तुला जे प्राप्त व्हायचे ते होईल पण ही साधना करतांना किती एकनिष्ठता अंगी असावी तू खूप  नियम पाळतोस न चुकता जप करतोस त्यामुळे  तुला शारीरिक त्रास सहन करावा लागतो तुला मानसिक शांतता मिळते पण प्रश्न असा आहे की तू एवढे कडक नियम पाळतोस गुरु वाक्य प्रमाण मानतोस  तरी तुला त्रास होतोय थोडक्यात माणूस जितका  इश्वरनिष्ठ असतो तितका त्याला त्रास होतो हे संतांपासून चालत आलय असं का या हा प्रत्यकाचा मनात प्रश्न येतो की असं का ह्याच उत्तर आपण उद्या बघू
क्रमश:----
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय। गुरुदेव  💐
             🌹 नर्मदा परिक्रमा 🌹
क्रमश:-  भाग ४९
स्वामी बोलत होते मी स्वामीना म्हणालो स्वामी हे तर सविस्तर सांगायचं पण माझया मनात काही शंका आहेत विचारू का ?
स्वामी हसले आणि म्हणाले विचार  स्वामी
  *साक्षात्कार म्हणजे काय ?*
  स्वामी हसून म्हणाले खुपच सुदंर प्रश्न ह्याचे उत्तर खूप मोठे आहे कारण ह्याचा अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित होतील आता आपण एक एक बघू पहिले नुसतं साक्षात्कार
आपले जीवन हाच एक साक्षात्कार आहे.
आपण  जिवंत आहोत हाही साक्षात्कारच आहे. तसे पाहिल्यास
श्वासोच्छ्वास हाच साक्षात्कार आहे.
इच्छा, आकांक्षा कमी कमी होणे हा साक्षात्कारच आहे.
आपण निश्चळ होणे हा साक्षात्कार; यासारखा दुसरा
साक्षात्कार नाही. निर्विचार स्थितीत रहाणे हा मोठा
साक्षात्कार आहे.
साक्षात्कार म्हणजे काही गौडबंगाल नाही. साक्षात्कार
ही खरे म्हणजे सहज स्थिति आहे. खरे म्हणजे साक्षात्कार
सतत कायम आहे. रात्रंदिवस साक्षात्कार आहे. साक्षात्कार
अखंड असतो. तो निराळा कसला व्हायचा ? फक्त आपण
त्याचे जवळ नसतो. ज्याचा आपल्याला अनुभव घ्यावयाचा
आहे, त्याच्याजवळ आपण गेले पाहिजे.
साक्षात्कार जरी सतत आहे, तरी जेव्हा जेव्हा
चैतन्याचा प्रकर्ष होतो, तेव्हा तेव्हा साक्षात्कार जाणवतो.
उदा. पाणी सतत वहातच असते. त्याचा कारंजा उडू लागला की
तो दृश्य होऊन जाणवतो. तद्वत चैतन्य आहेच. त्याचा
प्रकर्ष झाला की साक्षात्काराची जाणीव होते.
संत, सद्गुरु जे चैतन्य दाखवितात, त्याचा साक्षात्कार
करून घ्यावयाचा आहे. चैतन्याच्या सागरात स्वत:ला झोकून
देऊन, उसळणार्या लाटा पहाणे हा साक्षात्कार. चैतन्याची
हालचाल पहाणे हा साक्षात्कार. चैतन्याने चैतन्याशी
तादात्म्य होऊन, चैतन्याची अनुभूति घेणे हाच साक्षात्कार.
श्वासांचे घर्षण झाल्याविना चैतन्याचा प्रकर्ष होत
नाही. श्वासांचे घर्षण होण्यास नासिकाग्रावर दृष्टि असणे
आवश्यक आहे. वायूची घासणी झाली की `चक' होऊन `झक'
होते.
चैतन्यात नाद व प्रकाश हे दोन्ही आहेत. साक्षात्कारात
नाद व प्रकाश यांचा अनुभव येतो. हा नाद संघाताविना असतो
आणि हा प्रकाश तेल-बत्ती, चंद्र-सूर्य, अग्नि-वीज
इत्यादिविना असतो.
साधन करणार्याला चैतन्याचा अनुभव वेगवेगळया
प्रकारांनी येतो. एकाला जो अनुभव आला तोच दुसर्याला
येईल असे नाही.
प्रश्न : आत्मसाक्षात्कार म्हणजे काय?
स्वामी म्हणाले आता खुप रात्र झालीय झोप आता उद्या बघू
क्रमश:---
नाईलाजास्तव उठलो विषय खूप चांगला चालू होता पण गुरुआज्ञा
लेखक श्री विश्वास वाड


💐  जय  गुरुदेव  💐
             🌹 परिक्रमा 🌹
🌻 क्रमश:-- भाग ५०
खरं सांगतो एखाद्या गोष्टीचा मनापासून त्याग होत नाही तो पर्यत त्या वस्तू अतयंत गरज भासते मनापासून त्या गोष्टीचा त्याग झाला तर काहीच वाटत नाही मला काय म्हणायचे हे आपणास नक्की समजले असेल  असो
     नुसत्या भूमीवर खरंच छान झोप येते नेहमी प्रमाणे उठलो स्नान साधना पूजा झाली एक  बर  लुटल्या पासून आवरायला काहीच नाही त्यामुळे पुजा झाल्यावर  चालायला तयार आम्ही पुढे निघालो
रात्र कधी होईल असं वाटत होते कारण माझया प्रश्नांची उत्तरे मिळणार खुप आनन्द होता माझ्या मते परिक्रमा हि अतिशय सार्थकी लागत होती ह्या सर्वाला मी एकच उपमा देईन कि एखादया  उपाशी माणसा समोर पंचपक्वांनाचे  ताट ठेवल्यावर त्याची जी अवस्था होते तीच माझी होती असो
दिवसभर चालून मुलगी है गावी आलो रस्त्यात मोठे पहाड लागले एक दृष्टीने चोरी झाली हे चांगलेच कारण पहाड चढताना सामानाचे ओझे नव्हते  मलगी येथे एका झोपदीबाहेर राहायचे ठरवले  तेथे स्नान साधना पूजा आटोपली झोपडीतून त्या मैय्या भक्ताने स्वामींना  भोजन दिले मला चपाती दिली भोजन झाले स्ववामी समोर बसलो
स्वामी हसले म्हणाले  फार अधीर  झाला आहेस ऐकायला साधना व आध्यात्म समजून घेण्याकरता एवढीच  अधीरता आवश्यक आहे ठीक आहे
आता कालचा राहिलेला प्रश्न
आत्मसाक्षात्कार म्हणजे काय?
तर सगळया कल्पनांचा निरास म्हणजे साक्षात्कार. मन,
जग, विषय, व्यवहार, देव, परमार्थ इत्यादि सर्व कल्पना
आहेत. कल्पनेचा निरास होतो तेव्हा आत्मवस्तु दिसते.
कल्पनेचा निरास म्हणजे ब्रह्मवस्तूची ओळख.
आत्म्याचे दर्शन होणे, आत्म्याचा साक्षात्कार घेणे
किंवा होणे म्हणजे ज्या मूळ स्वरूपातून हे विश्व निर्माण
झाले, त्या मूळस्वरूपाप्रत पोचणे व तेच होऊन जाणे. आपण
सर्व जीव मूळ स्वरूपातून निघालेले आहोत; परंतु उपाधीच्या
योगाने आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडला आहे.
तो विसर दूर होऊन आत्मरूप होणे म्हणजे आत्म्याला पहाणे
होय.
आत्मसाक्षात्कार टप्प्याटप्प्यांनी होतो. रिद्धीसिद्धि
प्राप्त होणे हाही एक टप्पा आहे. त्याच्या पलीकडे खरा
साक्षात्कार आहे. आत्मसाक्षात्कारात नाद, बिंदु, कला व
ज्योति हे टप्पे आहेत. हा नाद संघाताविना असतो. आणि हा
प्रकाश तेल-बत्ती, चंद्र-सूर्य, अग्नि-वीज इत्यादिविना
असतो.
परमेश्वराचा किंवा आत्म्याचा साक्षात्कार ही एक
अवस्था आहे. साधनातील प्रकाशदर्शन हा परमात्म्याचा
साक्षात्कार आहे. साधनात प्रत्ययाला येणारा नीलप्रकाश
म्हणजेच परमात्म्याचा साक्षात्कार.
म मी विचारले स्वामी
आत्म्याला पहाण्याची दृष्टि कोणती आहे ?
आत्म्याला पहाण्याचे कार्य कोणता डोळा करतो ?
स्वामी हसून म्हणाले
आत्मवस्तु ही निर्विकल्प आहे. निर्विकल्प वस्तु
म्हणजे आत्मा आणि सविकल्प वस्तु म्हणजे दृश्य; त्या
दोहोंत फरक आहे. दृश्य वस्तूची स्थिति बदलते; निर्विकल्प
वस्तूची स्थिति बदलणारी नाही. आत्मा निर्विकल्प
असल्याने, कल्पनेचे द्वारा आत्मवस्तूचे दर्शन होत नाही.
जेथे कल्पनेचे अस्तित्व आहे, तेथे आत्मारामाचा अनुभव
नाही.
चर्मचक्षूने आत्मा दिसत नाही. परमात्म्याला पहायचे
असेल, तर आपल्या दृष्टीतील दृश्य दूर झाले पाहिजे. आणि
परमात्म्याला पहाण्याची विशिष्ट दृष्टि प्राप्त व्हावयास
हवी. ती दृष्टि सद्गुरुकृपेशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून
सद्गुरु कृपा ही परमार्थात आवश्यक आहे.
परमात्मा निश्चळ आहे. तो निश्चळ बुद्धीकडून ग्रहण
केला जातो. चत्वार देहांचा निरास झाल्यावर, जी बुद्धी रहाते
तिच्याकडून आत्मा ग्राह्य आहे.
आपल्या देहात चंद्र व सूर्य या दोन गति आहेत. इडा
पिंगला म्हणजे चंद्र सूर्य. त्या गतींचा मारा जेथे होतो तेथे
आत्मसाक्षात्कार होतो. चंद्रसूर्याचा लोप झाला की
अग्निरूप आत्म्याचा लोट दिसू लागतो.
प्राणाची धारणा ज्यावर आहे, त्या जीवनावर लक्ष
ठेऊन दृष्टीची एकाग्रता झाली की आत्मप्रकाश दिसतो,
आत्म्याचे दर्शन होते. श्रीगुरूंनी सांगितलेल्या गतीत दृष्टि व
कान यांचा लय झाला म्हणजे ही गति ऊर्ध्वमुख होऊन वाहू
लागते. मग हीच गति डोळयाचे काम करू लागते. ही गति जेथे
पडते त्या ठिकाणाला डोळा म्हणतात. या डोळयानेच/दृष्टीनेच
आत्मस्वरूप पहाता येते. परमात्मा हा वायुस्वरूप आहे.
त्यामुळे त्याला पहाण्याचा डोळाही वायुस्वरूप आहे. एकदा
का नामगतीची व प्राणगतीची एकता होऊन, तो डोळा, ती
दृष्टि बनली की त्या दृष्टीचा विषय आत्मा हाच होतो. या
डोळयाला कुणी ज्ञानचक्षु म्हणतात. गुरुकृपा असेल तरच
आत्मसाक्षात्कारासाठी आवश्यक असणारा डोळा लाभतो.
म  मी विचारले स्वामी आत्मसाक्षात्कार केव्हा होतो वा खरोखर छान आसक्ती आहे पण हे उद्या बघू
क्रमश:---
मन थोडे खट्टू झाले पण नाईलाज उद्याची वाट बघावीच लागणार
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव  💐
         🌹नर्मदा परिक्रमा 🌹
🌻 क्रमश:--भाग ५१
नित्यनियमाप्रमाणे उठून ध्यान साधना जप पूजा सर्व आटोपले व निघायची तयारी झाली स्वामींनी विचारले अरे तुझया नाग मंत्राच्या साधनेला किती दिवस झाले अजून किती दिवस आहे मी म्हणालो स्वामी माफ करा पण खरं सांगतो मी दवसच मोजत नाहीए  मला खुप छान  वाटतंय आतंर्गत अतिशय बदल झाला असे जाणवतंय आणि आपण बरोबर आहात  व इतकि  सुंदर परिक्रमा  व साधना होत आहे त्यामुळे किती दिवस झाले हे मोजायलाच विसरलोय रात्री निवांत ह्या विषयी  बघेन पण जास्त दिवस झाले तर काय हरकत साधना होतेय हे माझ्या  दृष्टीने  फार महत्वाचे स्वामी म्हणाले वा असेच गुण साधकामध्ये असणे महत्त्वाचे अश्या शिष्यविषयी गुरूला सुद्धा अभिमान असतो मी म्हणालो स्वामी स्तुती नको अहं येईल स्वामी म्हणाले असो
रस्ता चालण्यास सुरवात केली खरच विचार आला  की किती दिवस झाले मोजलेच नाही
   आणि स्वामी सांगतात त्या विषयामुळे नाग मंत्राची अनुभूती आपल्या पर्यंत मी पोहचवलीच नाही माझ्या मते परिक्रमा व साधना अशीच असावी जेव्हा आपण सर्व विसरतो तीच साधना आणि तशी गुरुकृपेने माझ्या कडून होते आहे हा गर्व नाही पण अभिमान नक्कीच आहे असो
काठिगाव येथे दुपारी थांबून संध्याकाळी वडफळी येथ मुक्काम साठी आलो तेथे एक महाराज्यांचा कुटीत थांबायचे ठरवले  संध्याकाळची स्नान पूजा साधना करून त्या महाराजांना स्वयंपाकात मदत केली स्वामींना भोजन दिले मी दूध चपाती खाल्ली महाराजांची भाडी घासून स्वामींसमोर  बसलो
स्वामी हसून म्हणाले कालचा प्रश्न काय ?
मी हात जोडून म्हणालो स्वामी
आत्मसाक्षात्कार केव्हां होतो ?
स्वामी म्हणाले  खरंच  तुझी आसक्ती चांगली आहे
साक्षात्कार न होण्याचे कारण मी-पणा आहे.
साक्षात्कारासाठी अहंकार अजिबात उपयोगी नाही. एक
अहंकार तरी किंवा एक साक्षात्कार तरी. मी - माझे
गेल्याशिवाय अनंत जन्मातसुद्धा साक्षात्कार होणार नाही.
अहंकार गेला तर साक्षात्कार होतो. जेव्हा देहबुद्धि, अभिमान
टाकला जातो, तेव्हा साक्षात्कार होतो.
संग सुटला की आत्मारामाचा साक्षात्कार होतो. भेद गेला
तर रामाचा साक्षात्कार आहे. दृश्याचा अंत झाल्यावर
साक्षात्कार होतो. देहातीत झाल्यावरच साक्षात्कार होतो.
देहाचा आणि मनाचा संबंध सुटल्याशिवाय परमार्थातील
अनुभूति नाही.
चारी देहांची(३) शेणकुटे जळल्यावर
साक्षात्कार होतो.
चार देहांचा जेव्हा निरास होतो तेव्हाच
साक्षात्कार होतो.
संताचे कृपेने ईश्वराचा साक्षात्कार होतो.
गुरुकृपा  झाल्यावर साक्षात्कार होतो. गुरुकृपेशिवाय साक्षात्कार
नाही.
गुरुकृपेने दृष्टि प्राप्त झाली तर देवदर्शन होते.
ईश्वरदर्शनासाठी गुरुकृपेची नितांत जरुरी आहे.
गुरूंनी कृपा
केल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही.
नाकातून आतले वारे बाहेर व बाहेरचे आत वहाण्याची
एवढीच क्रिया राहिली, एवढेच ज्ञान राहिले तर आत्मानुभव
दूर नाही. सद्गति म्हणजे सत अशा आत्म्याकडे नेणारी गति.
अशी सद्गति प्राप्त झाली की लगेच साक्षात्कार होतो.
नामाची लावणी - पेरणी केली तर साक्षात्काराचे भरघोस
पीक काढता येते. एकाग्र होऊन जो नामस्मरण करतो
त्यालाच साक्षात्कार होतो. नामाला स्मरणाची जोड मिळाली
की अनुभव येतो.
नामाची गति(४), मनाची गति, जीवनाची गति, प्राणाची
गति आणि उपाधिभूत(५) जीवनाची गति या ज्यावेळी एकत्र
येतात त्यावेळी स्थिर-बिंदुदर्शन होते.
नामाची गति, चैतन्याची गति व श्वसनाची गति ह्या
जेव्हा एक होतात व जीवन हे ऊर्ध्वमुख होते व ते प्राणगतीशी
भ्रूमध्यात मिसळते, तेव्हा नंतर आत्मसाक्षात्कार होतो.
विचार आणि मन यांचा लय गतीत व्हावयास पाहिजे.
अशा रीतीने प्रथम मन संथ झाले की गति प्रथम बाहेरून संथ
होते व मग आतून संथ होते. बाहेरून प्राण आत येईनासा झाला
म्हणजे देहाच्या आतील वार्याला आसनाच्या नेटामुळे
ऊर्ध्वगति मिळते व तो ऊर्ध्वमुख होऊन वाहू लागतो. ही
उर्ध्वमुख गति भ्रूमध्यात प्राणगतीशी मिसळते व नंतर
आत्मसाक्षात्कार होतो.
नामगति व प्राणगति एक होण्याची कळ साधली की
परमात्म्याचा साद आलाच. प्राणाची गति व नामाची गति एक
झाली की `आपुलिया जीवे । शिवासी पहावे । आत्मसुख घ्यावे
वेळोवेळा ।' हीच प्रचीती शिल्लक रहाते.
म  मी  विचारले स्वामी माफ करा पण एक प्रश्न आहे सामी म्हणे विचार
मी  म्हणालो  आत्म्याचे अनुसंधान म्हणजे काय ? ते कसे लागते ?
आत्मानुसंधानाचा परिणाम काय होतो ?
स्वामी म्हणाले वा  हुशार  आहेस पण ते आता उद्या मन निराश झाले सर्व ऐकण्याची व आत्मसात करण्याची प्रचंड इच्छा मनात आहे बघू गुरुकृपा कशी व किती होते नाराजीने उठून  कुटीच्या डाव्या बाजूस दगडाला उशी करून झोपायचा प्रयत्न करत होतो पण मन मात्र अस्थिर होऊन स्वामी उद्या काय सांगतील इकडे लागले होते तेव्हढ्यात स्वामी म्हणाले झोप विचार करू नको
क्रमश:---
लेखक श्री विश्वास वाड


💐  जय   गुरुदेव  💐
             🌹 परिक्रमा 🌹
🌻 क्रमश:--  भाग ५२
नित्यनियमाप्रमाणे उठलो ध्यान स्नान साधना पूजा झाली आणि मनात खरोखर प्रश्न आला खरंच साधना कधी सुरु केली व किती दिवस झाले नागप्रतिमा केंव्हा विसर्जित करायची आठवतच नाही की साधना कधी सुरु झाली
स्वामी हसत होते मी म्हणालो स्वामी काय झाले स्वामी म्हणाले अरे साधना अशीच हवी आपण कधी सुरु केली व कधी संपवायची हे कळल नाही पाहिजे  असं होणं म्हणजेच साधक साधनेशी एकरूप असतो
आता एक सांग ह्या साधनेपासून तुला काय अनुभूती आली
    मी म्हणालो स्वामी खरं सांगतो  मला साधनेपासून  भरपूर  अनुभूती  आली पण तुम्ही रोज जे अमृत पाजताय  त्यामुळे त्या अनुभूतीकडे खरंच  दुर्लक्ष  झाले त्या  मातारामांचा  मी अत्यन्त ऋणी आहे त्यांनी खुप मोठी विद्या मला प्रदान केली
स्वामी म्हणाले ठीक आहे समाधानी आहेस न म  साधना चालू ठेव बघ अजून काय होत कळेल असो
मी फक्त मान डोलावली आणि आम्ही चालू लागलो अजपाजप चालू होता पण आज कधी नाही ते परत परत साधनेविषयी मनात प्रश्न येत होते शेवटी ठरवले गुरुआज्ञा  साधना चालूच ठेवायची
    चालत चालत वडफळी वरून रस्त्यात दुपारी एका झाडाखाली थाबुन रात्री  डुमखल  येथे  एका झोपडीपाशी  आलो  तेथे थांबायचे ठरवले संध्याकाळची स्नान साधना पूजा झाली झोपडीतील  गृहस्थाने  स्वामींना डाळ चपाती व मला दूध चपाती दिली
स्वामीन समोर बसलो ते म्हणाले आता काय मी म्हणालो कृपया कालचा विषय पुढे सांगावे ते हसले
   स्वामी म्हणाले ठीक आहे काल तू काय विचारलं
मी हात जोडून म्हणालो
स्वामी। आत्म्याचे अनुसंधान म्हणजे काय ? ते कसे लागते ?
आत्मानुसंधानाचा परिणाम काय होतो ?
स्वामी म्हणाले  वा काय आसक्ती आहे ऐक  अनुकंपन, अनुवृत्ति, छंद आणि अनुसंधान हे
आत्म्याच्या अनुभूतीसाठी परमार्थात असणारे चार टप्पे
किंवा चार पायर्या आहेत. श्वसनाचे अनुकंपन असते.
साधनाच्या अभ्यासाने वृत्तीवर वृत्ति उठण्याची लकब
साधणे म्हणजे अनुवृत्ति. त्या वृत्तीशी गतीचा पटीपटीने
संघर्ष होणे म्हणजे छंद. आणि हा छंद अखंडपणे लागणे/रहाणे
म्हणजे अनुसंधान. अनुसंधान हे कोणत्याही अवस्थेत टिकून
रहाते. प्रत्येक माणसाचे ठिकाणी श्वासाचे अनुकंपन चालूच
आहे. तेथे लक्ष किंवा दृष्टि लागली की अनुकंपन होते. त्यात
वृत्ति तदाकार झाली की अनुवृत्ति साधते; त्याशिवाय मनात
इतर कोणताही विचार येता कामा नये; षड्विकार दूर झालेले
असले पाहिजेत. अशी तऱ्हा झाली म्हणजे छंद लागतो. छंद
म्हणजे त्याशिवाय दुसरे काही न सुचणे. असा छंद लागला
म्हणजे कोणतीही गोष्ट साध्य होते आणि मग परमात्म्याचे
अखंड अनुसंधान लागते. आत्म्याखेरीज अन्य काही नाही,
सर्व काही आत्माच आहे, अशी जाणीव असणे म्हणजेच
आत्म्याचे अनुसंधान लागणे.
श्वसनात नाम आहे. नाम म्हणजे चैतन्याचा नाद. चैतन्याचा
नाद म्हणजे नाम हे सूत्र आहे. नादाने नाद घेणे हेच
नादानुसंधान आहे. नादानुसंधानाने नादाचाच बिंदू होऊन तो
प्रगटपणे साधकास दृष्टीसमोर दिसू लागतो. नादानुसंधान,
नामस्मरण, आत्मानुसंधान, स्वरूपानुसंधान आणि
आत्मसाक्षात्कार हे सारे शब्द एकच अर्थ सांगणारे आहेत.
मी म्हणालो स्वामी  आता एकच शेवटचा प्रश्न
आत्मसाक्षात्कार देहात कुठे होतो?
स्वामी  म्हणाले खरोखर  हुशार आहेस हळू हळू सगळं जाणून  घ्यायची  इच्छा  चांगली जस तुला अभिमान आहे की महाराज व माझ्या सारखे तुला  सद्गुरू लाभले तस  आम्हाला  सुद्धा अभिमान आहे की तुझ्या  सारखा  मुमुक्षु  शिष्य आम्हाला मिळाला हे  ऐकून  डोळे भरून आले पण गर्व नाही झाला कारण स्वामींनी स्तुती केली हे ठीक पण माझे उद्दिष्ट् फार वेगळे आहे असो
स्वामी म्हणाले रोजच्या प्रमाणे तुझा प्रश्न उद्या झोप आता
क्रमश:-
खरंच आजचा सुदिन म्हणावा का कारण स्वामींनी मला शाबासकी दिली साधना व नियम चालुच ठेवायचे ठरवले
लेखक श्री विश्वास वाड



💐  जय  गुरुदेव  💐
                🌹 परिक्रमा  🌹
🌻 क्रमश:-–-भाग ५३
नित्यनियमांने  प्रातःकाळी उठून ध्यान स्नान पूजा साधना करून पुढे निघालो आज स्वामी सकाळपासून काहीच बोलत नव्हते त्यामुळे खुप विचित्र वाटत होते आपलं काही चुकलं का असा प्रश्न पण पडत होता साधारण चालून  एक तास झाला तरी स्वामी फक्त मागे चालत  जाते
    खुप अस्वस्थ वाटायला लागलं पण स्वामींना विचारायची हिम्मत होत नव्हती शेवटी डोळ्यात पाणी आले अजपाजप तर चालूच होता काय करावे कळत नव्हते
     शेवटी स्वामींनी आवाज दिला मी थांबलो स्वामी जवळ आले म्हणाले काय झालं ? का रडतोयस ? मी म्हणालो स्वामी आज सकाळ पासून आपण बोलत नाही काय झाले माझे काही चूल का मला त्याच वाईट वाटते
    स्वामी म्हणाले अरे तस काही नाही तू काही चुकला नाहीस एवढं वाईट वाटत तर विचारायचं असो चल आता आपण रस्त्यात बोलत नाहीं न  असं म्हणून  डोक्यावरन हात  फिरवला  खूप खूप बरे  वाटले  मन खूप शांत झाले असो
    पुढे  कणजी वरून दुपारी माथासर  येथे येऊन माध्यांनी  येथे थांबलो तेथून पुढे  संध्याकाळी  मोखाडी येथे पोहचलो  तेथे एका  कुटिया पाशी थांबायचे  ठरवले  तेथिल  महाराजांनी  सदावर्त ( शिधा ) दिला भांडी दिली म मी स्वामींन करता डाळ व चपाती बनवली नंतर स्नान साधना पूजा करून स्वामींना भोजन दिले मग मी चपाती  ( दूध  न मिळाल्याने ) पाण्याबरोबर खाल्ली नंतर सर्व आवरून स्वामींनपाशी  बसलो  कि ते काय सांगतील  उत्सुकता  होती
स्वामिनीं बोलायला  सुरुवात केली स्वामी म्हणाले तुझा काळ प्रश्न होता
आत्मसाक्षात्कार देहात कुठे होतो? बरोबर ना तर ऐक आता
खरे म्हणजे आत्मा नाही अशी जागाच नाही. तथापि
आम्हाला आत्मा प्रथम बाहेरच्या जगात कुठे दिसत नाही.
प्रथम आत्मसाक्षात्कार देहात होतो.
शरीर हे आत्मसाक्षात्काराची प्रयोगशाळा आहे. ती
विनावेतन चालविता येते. मस्तक हे देवघर आहे. जरी
आत्मसाक्षात्कार देहात होतो, तरी देहाने आत्मसाक्षात्कार
होत नाही.
भूमध्यात प्राणगति व उपाधिभूतजीवनाची ऊर्ध्वगति
यांची गाठ पडली की प्राणगति डाव्या बाजूने परत न जाता
सरळ मार्गाने श?र्टकट घेऊन सहस्रदल(६) स्थानात जाते.
तेथेच आत्मसाक्षात्कार होतो. म  मी विचारले स्वामी
आत्मसाक्षात्काराने, आत्मानुसंधानाने काय होते ?  स्वामी म्हणाले तळमळ शांत झाली तर देवाला पाहिले असा त्याचा
अर्थ. देवदर्शनाने तळमळ शांत होते.
साक्षात्कार होऊन जर अहंकार रहात असेल तर
साक्षात्कार खरा आहे की नाही ही शंका आहे. साक्षात्काराने
अहंकाराचा निरास होतो.
साक्षात्कारात जे आत दिसते तेच डोळे उघडल्यावर
बाहेर दिसावयास हवे. बाहेर जर नुसतेच आकार-विकार दिसू
लागले तर साक्षात्कार झाला नाही असा अर्थ होतो.
आत्म्याचे दर्शन/आत्म्याचा साक्षात्कार ज्याला झाला
त्याला प्रत्येक गोष्टीत आत्माच दिसत राहतो.
ज्याचे आत्म्याकडे अनुसंधान लागले आहे, त्याचे मन
विचाररहित आणि विकाररहित असते. त्याची दृष्टि
विकाररहित असल्याने, ती सायकलच्या हँडलप्रमाणे
इकडेतिकडे गरागरा फिरत नाही.
ज्याला आत्मानुसंधान लागले आहे त्याला सर्वत्र
आत्मवस्तु प्रतीत होते. साधन करताना त्याला जे आत
दिसते, ज्याचे इंप्रेशन त्याच्या मेंदूवर होते, त्याच
आत्मवस्तूचे इंप्रेशन त्याला इतर कोणतीही वस्तु पहाताना
होते; त्या वस्तूच्या उपाधीचे इंप्रेशन होत नाही. त्यामुळे
साहजिकच त्याच्या दृष्टीत सुखदु:खाचे विकार उमटू शकत
नाहीत; त्याचे समाधान भंग पावत नाही. त्याचा देह व्यवहारात
काहीही करीत असला तरी त्याला सर्वत्र आत्म्याचे
समाधानच मिळत
स्वामींनी विचारले  मी समजून घेण्याचा प्रयत्न  करतो अरे तीन दिवसात मी जे जे बोललो ते नीट आठ्व म्हणजे सगळं समजेल अवघड नाही आणि जो विरक्त  होऊन साधना करतो त्याला तर समजायला काहीच अवघड नाही असो झोप आता
क्रमश:---
खरंच स्वामी जे बोलले  ते सगळं अंतर्मुख  करायला लावणार  आहे
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव  💐
               🌹 परिक्रमा  🌹
🌻 क्रमश;---  भाग---५४
प्रातःकाळी उठून ध्यान साधना  संध्या पूजा झाली गरुडेश्वरावरून दूध आले ते स्वामींना साखर घालून गरम करून दिले व मी नुसते गरम करून घेतले पाच सहा दिवसां नंतर खांद्याला परत  पिशवी आली असो
पुढे निघालो गरुडेश्वरासमोर असलेल्या इंद्रवर्णमहादेवाचे दर्शन घेऊन पुढे मैय्या च्या कडेने पुढे नाणी रावल येथील महादेव मंदिरातील रामबाबा आश्रमात दुपारी थांबून पुढे संध्याकाळी  योगांनन्द आश्रमात मुक्कामी गेलो
संध्याकाळचे सर्व आटोपून रात्री स्वामींसमोर बसलो कालच्या उरलेल्या सहा गुरूंविषयी उत्सुकता होती स्वामींनी बोलण्यास सुरवात केली  स्वामी म्हणाले काळ सहा प्रकारचे गुरु झाले आता पुढील
७ ).🌺  चंद्रगुरुः चंद्र उदय पावतांच चंद्रकांतास पाझर फुटतो , त्याप्रमाणें याचें अंतर द्रवतांच दूरचे शिष्यही तरतात .
८ ). 🌺 दर्पणगुरुः आरशांत पाहिल्याबरोबर आपलें मुख आपणांस दिसतें . त्याप्रमाणें त्याच्या नुसत्या दर्शनानें स्वरूपज्ञान होतें . कसलेच आयास पडत नाहींत .
९ ).  🌺 छायानिधिगुरुः छायानिधि या नांवाचा एक मोठा पक्षी आकाशांत फिरत असतो . त्याची छाया ज्याच्यावर पडते तो राजा होतो . त्याप्रमाणें ह्या गुरूची छाया ज्याच्यावर पडते तो तत्काळ स्वानंद साम्राज्याधिपति होतो .
१० ). 🌺 नादनिधिगुरुः नादनिधि नांवाचा मणि आहे . ज्या धातूचा घ्वनि त्याच्या कानांत पडतो त्या सर्व धातू स्वस्थानीं सुवर्ण बनतात . त्याप्रमाणें मुमुक्षूची करुणवाणी त्याच्या कानीं पडतांच मुमुक्षूस दिव्य ज्ञान होतें .
११ ).  🌺 क्रौंचपक्षीगुरुः क्रौंच नांवाची पक्षीण समुद्रतीरीं पिलें ठेवून चारा घेण्यासाठीं सहासहा महिने दूरदेशीं फिरावयास जाते . व बारंबार आकाशाकडे डोळे करून पिलांची आठवण करते . त्या योगानें तेथें पिलें पुष्ट होतात . त्याचप्रमाणें हा गुरु ज्यांची आठवण करितो ते आपापल्या स्थानीं असतांच तरून जातात .
१२ ).  🌺सूर्यकांतगुरुः सूर्यदर्शनानें सूर्यकांत मण्यांत अथवा भिंगांत अग्नी पडतो व खालीं घरलेला कापूस जळून जातो . ( सूर्याची इच्छा नसतांनाहीं ) त्याप्रभाणें ह्या गुरूची द्दष्टि जिकडे झळकतेते पुरुष तात्काळ विदेहत्व पावतात . रुद्रयामलांत सांगितलें आहे कीं , ग्रंथवाचनानेंच व गुरुप्राप्तीशिवाय जपतपादि साधनें केलीं तर त्यांच्या विशेष उपयोग होणार नाहीं . अधिकारी गुरूशिवाय इष्टदेवता साधन प्राप्त होणार नाहीं . गुरुतंत्रांत सांगितलें आहे कीं ," शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन । तस्मात् ‌ शुद्धमना नित्यं तमेवाराधयेत् ‌ गुरुं " श्रीसमर्थ रामदासस्वामींनीं नवविधा भक्तीचें वर्णन करितांना अर्चन व पादसेवन गुरूचेंच करावें असें सांगितलें आहे . त्याचें रहस्य हेंच होय
मी सगळं ऐकून  विचार करू लागलो
मी काही बोलणार तेवढ्यात स्वामी म्हणाले झोप आता बाकी उद्या बघू
क्रमश:---
खरंच   ज्ञान  किती आघाद  आहे पूर्ण परिक्रमेत स्वामी अजून काय काय सांगणार खरंच मी भाग्यवान आहे
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय। गुरुदेव  💐
              🌹 परिक्रमा 🌹
🌻 क्रमश:--- भाग  ५५
आज स्वामींना मी चित्त ह्या विषयी विचारले स्वामींनी सांगण्यास सुरवात केली
जे साधक नियमित व पुरेसा शास्त्रोक्त योगाभ्यास करतात, त्यांना थोडे दिवस अध्यात्मिक साधना केल्यावर, आपली अध्यात्मिक प्रगती नेमकी किती झाली, हे पहावेसे वाटते. आपली अध्यात्मिक प्रगती मोजायचे साधन म्हणजे आपले चित्त. योगसाधना करून आपले चित्त किती शांत, पवित्र आणि शुध्द झाले आहे, त्यावरून आपली अध्यात्मिक स्थिती मोजली जाते किंवा समजते. नियमित योगसाधनेनुसार आपण अध्यात्मिक प्रगतीच्या कोणत्या पायरीवर आहोत, ते समजण्यासाठी पुढे अध्यात्मिक प्रगतीच्या काही पायऱ्या दिल्या आहेत. त्यावरून आपण आपली अध्यात्मिक स्थिती जाणून घेऊ शकतो. त्यासाठी आपण आपल्या चित्ताचे प्रामाणिकपणे अवलोकन करणे अत्यंत आवश्यक आहे.
🌺१) दुषित चित्त –  दुषित चित्त हि चित्ताची बेसिक स्टेज, सगळ्यात खालची पायरी आहे. ह्या स्थितीत साधक नेहमी दुसऱ्याचे दोष शोधत असतो. नेहमी दुसऱ्याचे वाईट कसे करता येईल याचाच विचार करत असतो. दुसऱ्यांचे चांगले झालेले पाहून त्याला, त्यांची नेहमी असुया वाटत असते. दुसऱ्यांचे नुकसान करण्याचे निरनिराळे उपाय नेहमी शोधत असतो. नकारात्मक विचारांनी, नकारात्मक घटनांनी, नकारात्मक व्यक्तिंनी असे चित्त कायम भरलेले असते.
🌺 २) भूतकाळात हरवलेले चित्त – ह्या प्रकारचे चित्त नेहमी भूतकाळात हरवलेले असते. भूतकाळातल्या प्रसंग, घटना आणि व्यक्तिंमधे कायम गुरफटलेले असते. त्याला भूतकाळातल्या घटनांमधे रमायची इतकी सवय झालेली असते की, त्यातच त्याला आनंद मिळत असतो.

🌺३) निराशावादी चित्त – हे चित्त नेहमी निराशेनी भरलेले असते. नेहमी काहीतरी वाईटच घडेल, असे त्याला सतत वाटत असते. सतत भूतकाळाचे विचार करीत राहिल्याने असे होते. सतत भूतकाळातले वाईट विचार करत राहिल्यानेच अशा व्यक्तीचा वर्तमानकाळ ही खराब होतो, निराशावादी होतो.
🌺४) सामान्य चित्त – हि चित्ताची बेसिक, एक सामान्य स्थिती आहे. ह्या चित्तात चांगले – वाईट दोन्ही प्रकारचे विचार येत असतात. जेंव्हा अशी व्यक्ति चांगल्या संगतीत असते, तेव्हा तिचे विचार चांगले असतात, आणि जेव्हा वाईट संगतीत असते, तेव्हा तिचे विचार वाईट असतात. ह्या प्रकारच्या चित्ताचे म्हणजेच अशा प्रकारच्या चित्ताच्या व्यक्तींचे स्वत:चे काही विचार नसतात. जशी संगत मिळते, तसे ह्यांचे विचार बदलतात, बनतात. प्रत्यक्षात सध्याचे समाजातील वैचारिक प्रदूषण बघता, सामान्य चित्ताचे लोक जास्त करून नकारात्मक विचारांच्या लोकांच्या प्रभावाखाली असतात.
🌺५) निर्विचार चित्त – काही वर्ष ध्यानयोग, साधना केल्यावर साधक निर्विचार स्थितीला पोहोचू शकतो. ह्या स्थितीत त्याच्या मनात चांगले किंवा वाईट असे कुठलेच विचार येत नाहीत. वर्तमानातल्या काही चांगल्या वाईट परिस्थितीमुळे त्याचे चित्त क्षणभर विचलित झाले तरी, असे क्षणभरासाठीच होते. जसे पावसाळ्यातील पाण्याचा बुडबुडा, एक क्षणभरच राहतो आणि क्षणात फुटून जातो, तसे एका क्षणात हे चित्त जाग्यावर येते. हि अध्यात्मिक स्थितीची पहिली पायरी आहे. असे काही वर्ष ह्या स्थितीत चित्त रहायला शिकले की, असे चित्त सशक्त व्हायला लागते.
🌺 ६)  दुर्भावनारहित चित्त – सशक्त चित्त हळूहळू, पुढेपुढे निर्मळ व्हायला लागते. ते इतके निर्मळ आणि पवित्र होते की, कुणीही  त्याच्याशी वाईट वागले तरी, कुणाहीबद्दल त्याच्या मनात वाईट विचार येत नाहीत. हि चित्ताची एक चांगली स्थिती मानली आहे.
🌺७)सद्भावनायुक्त चित्त – खूपच थोड्या लोकांना असे चित्त प्राप्त होते. अशा लोकांच्या मनात सर्व विश्वाच्या प्रती कायम सद्भावनाच भरलेल्या असतात. अशा व्यक्तिंना आपण संत म्हणतो. ते सदैव सगळ्यांचे कल्याणच चिंतत असतात. हे सदैव स्वत:तच मश्गुल असतात. ह्यांचे चित्त कुठेही भरकटत नाही, तर सतत साधनेमधे लीन असते.
   मी ऐकण्यात खुप मग्न होतो
लेखक श्री विश्वास वाड


💐   जय  गुरुदेव  💐
                 🌹 परिक्रमा  🌹
🌻 क्रमश:--- भाग ५६
परवा आम्ही  योगांनन्द आश्रमात मुक्कामास होतो नंतर तेथून  आम्ही काळ रामानंद  आश्रमात मुक्कामास आलो
      सर्व परिक्रमा अतिशय आनंदात व खरोखर आध्यात्मिक उच्च पातळी कडे जात आहे कारण सर्व विसरलो होतो फक्त स्नान संध्या साधना पूजा करावी दिवसभर अजपाजप करावा  स्वामी रोज रात्री ज्ञानामृत पाजतात ते श्रवण भक्तीने प्राशन करावे रोज उठल्यावर आज स्वामी काय सांगतील याची उत्कंठा लागावी खरं सांगतो एक वेगळ्याच विश्वात असल्यासारखे जाणवत  होते
      माझ्या  मध्ये सुद्धा बदल होतोय हे जाणवत  होते  कशामुळे होतोय हे मात्र कळत नव्हते कारण अनेक आहेत मैय्या परिक्रमेमुळे का नागाच्यासाधनेमुळे का स्वामीच्या संगतीने का माझ्या एकाग्र रीतीने होत असलेल्या साधनेमुळे नक्की काहीच समजत नव्हते पण एक नक्की कि माझी आध्यात्मिक प्रगती होत होती  व विरक्ती येत होती अरे हे मी काय लिहतोय हि तर माझी मी स्तुती करतोय हे योग्य नाही असो
नित्यनियमाने  चालत चालत  कुंभेश्वर येथे आलो स्वामिनीं येथें मुक्कामास  थांबायचे ठरवले
ह्या ठिकाणी शनीने साधना केली असे म्हणतात ह्या ठिकाणी शनीचे मंदिर आहे ह्याला नानी मोटी पनौती असं सुद्धा म्हणतात जेव्हा छोटी साडेसाती येते तेव्हा येथे दर्शनास येतात ह्या ठिकाणी अमावास्येस खूप गर्दी असते  आम्ही शनी मंदिराच्या बाहेरओट्यावर राहण्याचे ठरवले
संध्याकाळी  स्वामीच्या  सांगण्यावरून  तेथील  पाच घरी शुष्क भिक्षा घेतली तेथेच  तेथील एका दुकांदाराकडून  भांडी  घेऊन स्वामी करता स्वयंपाक केला डाळ भात चपाती बनवले नंतर स्नान पूजा साधना झाल्यावर स्वामींना भोजन वाढले  नंतर त्या दुकांदाराकडून दूध घेऊन मी दूध चपाती खाल्ली नंतर भाडी घासून दुकांनदारास  दिली सर्व आवरून स्वामींसमोर बसलो
स्वामी म्हणाले आपण काळ चित्ताविषयी  बोलत होतो आपण काल सात चित्ताबद्दल  बघितले आज पुढे बघू
८) शून्य चित्त – हि चित्ताची सर्वोत्तम दशा आहे. ह्या स्थितीत चित्ताला एक शून्य अवस्था प्राप्त होते. हे चित्त नळीसारखे असते, ज्यातून सतत परमेश्वराचे चैतन्य वहात असते. ह्या चित्तातून देवाची करुणा सतत वर्षाव करत असते. हे चित्त कल्याणकारी असते. ह्या चित्ताची कुणावर कृपा झाली तर त्याचे कल्याणच होते. ह्या चित्तातून कल्याणकारी शक्ती सतत वहात असतात. हे चित्त जो संकल्प करते, तो निश्चित पूर्ण होतो. हे चित्त सतत सगळ्यांच्या चांगल्याचीच इच्छा करते. ह्या चित्तातून सदैव सगळ्या जगाला मंगल आशीर्वाद मिळत राहतो.
आता आपण स्वत:च्या चित्ताचे निरीक्षण करून, समजून घेऊयात, की आपली अध्यात्मिक स्थिती नेमकी कशी आहे. आत्म्याच्या पवित्रतेचा आणि चित्ताचा खूप जवळचा संबंध असतो. असे समजा की, हे चित्तरुपी धन घेऊन आपण जन्माला आलेलो आहोत. जीवनभर चित्त दूषित करणाऱ्या लोकांमध्ये राहूनही आपल्याला आपले चित्त दूषित होऊ द्यायचे नाही. अशा लोकांच्या सानिध्यात राहूनही, हे चित्तरुपी धन आपल्याला सांभाळून ठेवायचे आहे.
तू  आता झोप उद्या तुला अनुलोम विलोम, ह्या विषयी सांगेन
क्रमश:---
लेखक श्री विश्वास वाड


💐  जय  गुरुदेव  💐
🌹 क्रमश:--भाग ५७
नित्यनियमाने  पहाटे  उठलो ध्यान स्नान संध्या साधना पूजा झाली नंतर कुंभेश्वर येथून  जवळ  असलेल्या रामेश्वर येथे दर्शन घेऊन पुढे निघालो नंतर  मोरली नदीचा संगम जेथे आहे तेथील   हनुमातेश्वर येथे दुपारी पोहचलो तेथे दुपारी थांबलो  स्वामीनीं जेवायचे नाही ठरवले म्हणून साधना आटोपून थोडी विश्रांती घेऊन पुढे निघालो
पुढे नरखेडी येथील किनाऱ्यावर असलेल्या महादेव मंदिरात मुक्कामास राहायचे ठरवले  आजू बाजूच्या घरातून भिक्षवृत्तीने  आता व डाळ मिळाली स्वामींकरता  डाळ चपाती बनवली नंतर संध्याकाळी स्नान  साधना पूजा झाली  नंतर स्वामीचे भोजन केले नंतर मी चपाती  पाण्याबरोबर  खाल्ली  सगळं  आवरून  स्वामी समोर बसलो
म  स्वामीनीं  बोलण्यास सुरवात  केलि  स्वामी म्हणाले  आज तुला  अनुलोम  विलोम ह्या  बद्दल सांगतो
“अनुलोम विलोम” प्राणायाम, हा प्राणायाम शास्त्रोक्त रित्या कसा करतात व त्याचे नेमके फायदे काय काय आहेत ते आज सविस्तर सांगणार आहे.
या प्राणायामामधे गडोळे बंद करून, सरळ, स्थिर बसून अथवा पाठीचा त्रास असेल तर, प्रसंगी टेकून किंवा झोपून, उजवी नाकपुडी उजव्या हाताच्या अंगठ्याने बंद करून, डाव्या नाकपुडीने मोठा म्हणजे दिर्घ श्वास घ्यावा, व डावी नाकपुडी मधल्या दोन बोटाने बंद करून, उजवीने श्वास पूर्ण सोडावा, सोडून झाल्यानंतर त्याच बाजूने दीर्घ श्वास घेऊन, उजवी नाकपुडी पुन्हा अंगठ्याने बंद करून, डाव्या नाकपुडीने सोडावा. श्वास घेताना शांतपणे, मोठा आवाज न करता खोल घ्यावा व श्वास सोडताना तसाच शांतपणे सोडावा. अनुलोम विलोममधील या श्वासांच्या क्रिया करताना डोळे बंद ठेऊन, लक्ष श्वासांवर देऊन क्रिया करणे जरुरीचे असते. तरच आवश्यक फायदे मिळतात.
अनुलोम विलोम प्राणायामद्वारे शारीरिक आजार दूर करण्यासाठी 4 ते ५ सेकंद श्वास घ्यायला, तसेच 4 ते ५ सेकंद श्वास सोडायला लागायला हवा. तसेच मानसीन शांतीसाठी, एकाग्रतेसाठी, ब्लडप्रेशर सामान्य होण्यासाठी, ६ ते ९ सेकंद श्वास घ्यायला व ६ ते ९ सेकंद श्वास सोडायला हवा.
सुरुवातीला सलग 20 मिनिटे व सरावानंतर 30 मिनिटे हा प्राणायाम केला पाहिजे. काही परिस्थितीत सकाळी व संध्याकाळी किंवा दिवसभरात वेळ मिळेल तेंव्हा, आवश्यकतेनुसार हा प्राणायाम करावा लागतो.  

याचे फायदे - प्रत्येक व्यक्तिची एकावेळेला डावी अथवा उजवी नाकपुडी जास्तीजास्त चालत असते. ज्याची ज्या बाजूची नाकपुडी जास्त चालते, त्याच्या विरुध्द बाजूच्या मेंदूचा विकास यामुळे झालेला असतो. एकाच बाजूच्या मेंदूच्या विकासामुळे त्याच्या शरीराचे नियंत्रण अविकसित राहिलेले असते. अनुलोम विलोम प्राणायाम करू लागल्यामुळे त्याची डावी व उजवी अशा दोन्ही नाकपुड्यांचा श्वास घेण्या सोडण्यासाठी समान वापर केला जातो. यामुळे डाव्या व उजव्या दोन्ही मेंदूंना एकसारखा व पुरेसा प्राणवायू बराचवेळ मिळू लागल्यामुळे दोन्ही मेंदूंचा विकास, पोषण  होते. दोन्ही मेंदूंचे पोषण झाल्यामुळे त्यांचे अविकसित रहिलेले कार्य सुधारते. ऑटोनॉमिक सिस्टीम - शरिरातील ऑटोमॅटिक कार्य करणारी सिस्टीम - जसे खाल्लेले अन्न पचवणे, नवीन रक्त बनवणे, हाडे बळकट करणे, मसल्स स्ट्रॉंग बनवणे, मांस, त्वचा, चरबी बनवणे, अन्न पचवणे, पाठोपाठ एक श्वास घेणे, सोडणे, रक्त पंप करणे, हार्मोन्स, एन्झाइम्स वेळोवेळी पाझरवणे, प्रसंगानुरूप विचार करणे अशा अनेक क्रिया ज्या सिस्टीमद्वारे होत असतात, त्यामधे नियमितता येते, सुसूत्रता येते, डिसिप्लीन येते. म्हणजे ऑटोनॉमिक सिस्टीम बॅलंस किंवा अपडेट होऊन काम करू लागते. यास्तव पुरेसा व नियमित अनुलोम विलोम करणाऱ्यांचे आरोग्य ताबडतोब सुधारते.
डाव्या नाकपुडीने घेतलेला श्वास उजव्या मेंदूला व उजव्या नाकपुडीने घेतलेला श्वास डाव्या मेंदूला मिळत असतो. श्वास म्हणजे प्राणवायू, प्राणशक्ती. आपल्या शरिरात घेतलेला ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम रक्तातील तांबड्या पेशी करत असतात. अनुलोम विलोम करताना प्रत्येक वेळी मोठा श्वास घेतल्यामुळे रक्तामधील ऑक्सिजनचे प्रमाण नेहमी पेक्षा 10 ते 15 पट वाढते, रक्तवाहिन्यांचा विकास होतो. त्याच बरोबर नसनाड्यांचाही विकास होतो. रक्त फक्त ऑक्सिजनलाच वाहून नेते असे नव्हे, तर इतर पोषक तत्व जसे प्रोटीन्स, व्हीटॅमीन्स, सॉल्ट्स, न्युट्रीयंट्स यांना ही वाहून नेत असते. ती सर्व ऑक्सिजनबरोबरच शरिराला वेळच्या वेळी मिळू लागल्यामुळे, शरिरामधील सर्व अवयवांची उत्तम वाढ, विकास व पोषण होते. त्यामुळे शरीर बलवान, कार्यक्षम होते. आपल्या शरिरातील ऑर्गन सेल्संना म्हणजेच अवयवांना तसेच मेंदूला पोषक तत्वांबरोबरच ऑक्सिजनची जास्त गरज असते. जेंव्हा अनुलोम विलोममुळे नियमित व पुरेसा ऑक्सिजन मिळू लागतो, तेंव्हा त्या त्या अवयवांमधे दैनंदिन कार्य करण्यासाठी अतिरिक्त उर्जा तयार होते. त्यामुळे अनुलोम विलोम केल्यानंतर पुढील चोवीस तास प्रत्येक अवयव पूर्ण क्षमतेने कार्य करू लागतो.
अनुलोम विलोमचा प्रभाव जसा शरिरावर पडतो तसाच मेंदूवरही पडतो. जसा शरिराला पुरेसा प्राणवायू आवश्यक असतो, तसाच मेंदूलाही हवा असतो. अनुलोम विलोम शरीराबरोबरच मेंदूचा ही विकास करून त्याला समतोल बनवतो. अनुलोम विलोममुळे मेंदू रिलॅक्स होतो, शांत होतो. शांत झालेला मेंदू, रिलॅक्स झालेला मेंदू नव्या जोमाने काम करण्यास सिद्ध होतो. यामुळे स्मरणशक्ती वाढते, आकलनशक्ती वाढते. विचार शांत होतात, मन शांत होते. मंदबुद्धी असणाऱ्या मुलांनाही या प्राणायामाचा खूप फायदा होतो.  
शरिरातील कोणत्याही रक्तवाहिनीमधे अडथळे, ब्लॉकेज निर्माण झाले असतील तर ते अनुलोम विलोममुळे हमखास उघडले जातात.
अनुलोम विलोममुळे मसल्स मजबूत व हाडे बळकट होतात. अनुलोम विलोममुळे उष्णता कमी होते. पॅरॅलिसीस, अर्धांगवायूचा आजार बरा होतो.
 अनुलोम विलोममुळे शरिरातील रीजनरेशनचा रेट, स्पीड वाढतो. त्यामुळे येणारे अथवा आलेले म्हातारपण, बरेचवर्ष दूर ठेवता येते.
खोलात जाऊन अभ्यास केला तर असे दिसते की अनुलोम विलोम शरिराबरोबरच मन, भावना, विचार, मेमरी, निर्णय क्षमता या सर्वांना करेक्ट करतो. या सर्वांची कार्यक्षमता वाढवतो.
परमेश्वराने मनुष्याला श्वास घेण्यासाठी  दोन नाकपुड्या दिल्या आहेत याला निश्चितच अर्थ आहे. डावा स्वर चंद्र स्वर, याला  “इडा” व उजवा सूर्य स्वर याला “पिंगला” नाडी म्हणतात. डाव्या स्वराने घेतलेला श्वास शरिरात शीतलता, थंडावा उत्पन्न करतो तर उजव्या स्वराने घेतलेला श्वास शरिरात उष्णता, उर्जा उत्पन्न करतो. डाव्या स्वराने घेतलेला श्वास उजव्या मेंदूला मिळत असतो तर उजव्या स्वराने घेतलेला श्वास डाव्या मेंदूला मिळत असतो. अनुलोम विलोम मुळे दोन्ही मेंदूंचा समान विकास होतो. त्यामुळे दोन्ही मेंदूंचे कार्य सुनियोजित रीतीने, सुरळीत होऊ लागते.
    प्रत्येक व्यक्तिमधे डावी अथवा उजवी नाकपुडी जास्त चालत असते. ज्यांची डावी नाकपुडी जास्त चालते त्या व्यक्ती शांत, मनमिळावू, समंजस स्वभावाच्या तसेच सर्दीचे, थंडीचे आजार असणाऱ्या असतात. ज्यांची उजवी नाकपुडी जास्त चालते त्या रागीट, तापट, कार्यक्षम तसेच पित्ताचे त्रास, उष्णतेचे त्रास  असणाऱ्या असतात. काही लोकांचे स्वभाव विध्वंसक असतात तर काहींचे स्वभाव कंस्ट्रक्टीव्ह असतात. सामान्यत: स्त्रियांमध्ये डावी, तर पुरुषांमध्ये उजवी नाकपुडी जास्त वापरली जाते. त्यामुळेच पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया जास्त समंजस, शांत, मनमिळाऊ स्वभावाच्या असतात. अनुलोम विलोम व्यक्तीचे स्वभाव, दोष, विचारही बदलतो.
असा हा अनुलोम विलोम प्राणायाम सर्वांना रोज, नियमित व पुरेसा करायला काय हरकत आहे ? नियमित थोडा वेळ अनुलोम विलोमसाठी दिला तर किती तरी फायदे, सहज आपल्या पदरात पडतात....
   चल  झोप आता उद्या  नवीन  विषयावर  बोलू
क्रमश:----
आता  प्रश्न  पडला स्वामी उद्यापासून काय  बोलतील ह्या विचारातच झोप लागली
लेखक श्री विश्वास वाड











चित्ताचे स्तर
जे साधक नियमित व पुरेसा शास्त्रोक्त योगाभ्यास करतात, त्यांना थोडे दिवस अध्यात्मिक साधना केल्यावर, आपली अध्यात्मिक प्रगती नेमकी किती झाली, हे पहावेसे वाटते. आपली अध्यात्मिक प्रगती मोजायचे साधन म्हणजे आपले चित्त. योगसाधना करून आपले चित्त किती शांत, पवित्र आणि शुध्द झाले आहे, त्यावरून आपली अध्यात्मिक स्थिती मोजली जाते किंवा समजते. नियमित योगसाधनेनुसार आपण अध्यात्मिक प्रगतीच्या कोणत्या पायरीवर आहोत, ते समजण्यासाठी पुढे अध्यात्मिक प्रगतीच्या काही पायऱ्या दिल्या आहेत. त्यावरून आपण आपली अध्यात्मिक स्थिती जाणून घेऊ शकतो. त्यासाठी आपण आपल्या चित्ताचे प्रामाणिकपणे अवलोकन करणे अत्यंत आवश्यक आहे.

1. दुषित चित्त –  दुषित चित्त हि चित्ताची बेसिक स्टेज, सगळ्यात खालची पायरी आहे. ह्या स्थितीत साधक नेहमी दुसऱ्याचे दोष शोधत असतो. नेहमी दुसऱ्याचे वाईट कसे करता येईल याचाच विचार करत असतो. दुसऱ्यांचे चांगले झालेले पाहून त्याला, त्यांची नेहमी असुया वाटत असते. दुसऱ्यांचे नुकसान करण्याचे निरनिराळे उपाय नेहमी शोधत असतो. नकारात्मक विचारांनी, नकारात्मक घटनांनी, नकारात्मक व्यक्तिंनी असे चित्त कायम भरलेले असते.
2. भूतकाळात हरवलेले चित्त – ह्या प्रकारचे चित्त नेहमी भूतकाळात हरवलेले असते. भूतकाळातल्या प्रसंग, घटना आणि व्यक्तिंमधे कायम गुरफटलेले असते. त्याला भूतकाळातल्या घटनांमधे रमायची इतकी सवय झालेली असते की, त्यातच त्याला आनंद मिळत असतो.
3. निराशावादी चित्त – हे चित्त नेहमी निराशेनी भरलेले असते. नेहमी काहीतरी वाईटच घडेल, असे त्याला सतत वाटत असते. सतत भूतकाळाचे विचार करीत राहिल्याने असे होते. सतत भूतकाळातले वाईट विचार करत राहिल्यानेच अशा व्यक्तीचा वर्तमानकाळ ही खराब होतो, निराशावादी होतो.
4. सामान्य चित्त – हि चित्ताची बेसिक, एक सामान्य स्थिती आहे. ह्या चित्तात चांगले – वाईट दोन्ही प्रकारचे विचार येत असतात. जेंव्हा अशी व्यक्ति चांगल्या संगतीत असते, तेव्हा तिचे विचार चांगले असतात, आणि जेव्हा वाईट संगतीत असते, तेव्हा तिचे विचार वाईट असतात. ह्या प्रकारच्या चित्ताचे म्हणजेच अशा प्रकारच्या चित्ताच्या व्यक्तींचे स्वत:चे काही विचार नसतात. जशी संगत मिळते, तसे ह्यांचे विचार बदलतात, बनतात. प्रत्यक्षात सध्याचे समाजातील वैचारिक प्रदूषण बघता, सामान्य चित्ताचे लोक जास्त करून नकारात्मक विचारांच्या लोकांच्या प्रभावाखाली असतात.
5. निर्विचार चित्त – काही वर्ष ध्यानयोग, साधना केल्यावर साधक निर्विचार स्थितीला पोहोचू शकतो. ह्या स्थितीत त्याच्या मनात चांगले किंवा वाईट असे कुठलेच विचार येत नाहीत. वर्तमानातल्या काही चांगल्या वाईट परिस्थितीमुळे त्याचे चित्त क्षणभर विचलित झाले तरी, असे क्षणभरासाठीच होते. जसे पावसाळ्यातील पाण्याचा बुडबुडा, एक क्षणभरच राहतो आणि क्षणात फुटून जातो, तसे एका क्षणात हे चित्त जाग्यावर येते. हि अध्यात्मिक स्थितीची पहिली पायरी आहे. असे काही वर्ष ह्या स्थितीत चित्त रहायला शिकले की, असे चित्त सशक्त व्हायला लागते.
6. दुर्भावनारहित चित्त – सशक्त चित्त हळूहळू, पुढेपुढे निर्मळ व्हायला लागते. ते इतके निर्मळ आणि पवित्र होते की, कुणीही  त्याच्याशी वाईट वागले तरी, कुणाहीबद्दल त्याच्या मनात वाईट विचार येत नाहीत. हि चित्ताची एक चांगली स्थिती मानली आहे.
7.  सद्भावनायुक्त चित्त – खूपच थोड्या लोकांना असे चित्त प्राप्त होते. अशा लोकांच्या मनात सर्व विश्वाच्या प्रती कायम सद्भावनाच भरलेल्या असतात. अशा व्यक्तिंना आपण संत म्हणतो. ते सदैव सगळ्यांचे कल्याणच चिंतत असतात. हे सदैव स्वत:तच मश्गुल असतात. ह्यांचे चित्त कुठेही भरकटत नाही, तर सतत साधनेमधे लीन असते.
8. शून्य चित्त – हि चित्ताची सर्वोत्तम दशा आहे. ह्या स्थितीत चित्ताला एक शून्य अवस्था प्राप्त होते. हे चित्त नळीसारखे असते, ज्यातून सतत परमेश्वराचे चैतन्य वहात असते. ह्या चित्तातून देवाची करुणा सतत वर्षाव करत असते. हे चित्त कल्याणकारी असते. ह्या चित्ताची कुणावर कृपा झाली तर त्याचे कल्याणच होते. ह्या चित्तातून कल्याणकारी शक्ती सतत वहात असतात. हे चित्त जो संकल्प करते, तो निश्चित पूर्ण होतो. हे चित्त सतत सगळ्यांच्या चांगल्याचीच इच्छा करते. ह्या चित्तातून सदैव सगळ्या जगाला मंगल आशीर्वाद मिळत राहतो.
आता आपण स्वत:च्या चित्ताचे निरीक्षण करून, समजून घेऊयात, की आपली अध्यात्मिक स्थिती नेमकी कशी आहे. आत्म्याच्या पवित्रतेचा आणि चित्ताचा खूप जवळचा संबंध असतो. असे समजा की, हे चित्तरुपी धन घेऊन आपण जन्माला आलेलो आहोत. जीवनभर चित्त दूषित करणाऱ्या लोकांमध्ये राहूनही आपल्याला आपले चित्त दूषित होऊ द्यायचे नाही. अशा लोकांच्या सानिध्यात राहूनही, हे चित्तरुपी धन आपल्याला

सांभाळून ठेवायचे आहे.

अनुलोम विलोम,
             
आज मी तुम्हाला “अनुलोम विलोम” प्राणायाम, हा प्राणायाम शास्त्रोक्त रित्या कसा करतात व त्याचे नेमके फायदे काय काय आहेत ते आज सविस्तर सांगणार आहे.
या प्राणायामामधे डोळे बंद करून, सरळ, स्थिर बसून अथवा पाठीचा त्रास असेल तर, प्रसंगी टेकून किंवा झोपून, उजवी नाकपुडी उजव्या हाताच्या अंगठ्याने बंद करून, डाव्या नाकपुडीने मोठा म्हणजे दिर्घ श्वास घ्यावा, व डावी नाकपुडी मधल्या दोन बोटाने बंद करून, उजवीने श्वास पूर्ण सोडावा, सोडून झाल्यानंतर त्याच बाजूने दीर्घ श्वास घेऊन, उजवी नाकपुडी पुन्हा अंगठ्याने बंद करून, डाव्या नाकपुडीने सोडावा. श्वास घेताना शांतपणे, मोठा आवाज न करता खोल घ्यावा व श्वास सोडताना तसाच शांतपणे सोडावा. अनुलोम विलोममधील या श्वासांच्या क्रिया करताना डोळे बंद ठेऊन, लक्ष श्वासांवर देऊन क्रिया करणे जरुरीचे असते. तरच आवश्यक फायदे मिळतात.
अनुलोम विलोम प्राणायामद्वारे शारीरिक आजार दूर करण्यासाठी 4 ते ५ सेकंद श्वास घ्यायला, तसेच 4 ते ५ सेकंद श्वास सोडायला लागायला हवा. तसेच मानसीन शांतीसाठी, एकाग्रतेसाठी, ब्लडप्रेशर सामान्य होण्यासाठी, ६ ते ९ सेकंद श्वास घ्यायला व ६ ते ९ सेकंद श्वास सोडायला हवा.
सुरुवातीला सलग 20 मिनिटे व सरावानंतर 30 मिनिटे हा प्राणायाम केला पाहिजे. काही परिस्थितीत सकाळी व संध्याकाळी किंवा दिवसभरात वेळ मिळेल तेंव्हा, आवश्यकतेनुसार हा प्राणायाम करावा लागतो.  

याचे फायदे - प्रत्येक व्यक्तिची एकावेळेला डावी अथवा उजवी नाकपुडी जास्तीजास्त चालत असते. ज्याची ज्या बाजूची नाकपुडी जास्त चालते, त्याच्या विरुध्द बाजूच्या मेंदूचा विकास यामुळे झालेला असतो. एकाच बाजूच्या मेंदूच्या विकासामुळे त्याच्या शरीराचे नियंत्रण अविकसित राहिलेले असते. अनुलोम विलोम प्राणायाम करू लागल्यामुळे त्याची डावी व उजवी अशा दोन्ही नाकपुड्यांचा श्वास घेण्या सोडण्यासाठी समान वापर केला जातो. यामुळे डाव्या व उजव्या दोन्ही मेंदूंना एकसारखा व पुरेसा प्राणवायू बराचवेळ मिळू लागल्यामुळे दोन्ही मेंदूंचा विकास, पोषण  होते. दोन्ही मेंदूंचे पोषण झाल्यामुळे त्यांचे अविकसित रहिलेले कार्य सुधारते. ऑटोनॉमिक सिस्टीम - शरिरातील ऑटोमॅटिक कार्य करणारी सिस्टीम - जसे खाल्लेले अन्न पचवणे, नवीन रक्त बनवणे, हाडे बळकट करणे, मसल्स स्ट्रॉंग बनवणे, मांस, त्वचा, चरबी बनवणे, अन्न पचवणे, पाठोपाठ एक श्वास घेणे, सोडणे, रक्त पंप करणे, हार्मोन्स, एन्झाइम्स वेळोवेळी पाझरवणे, प्रसंगानुरूप विचार करणे अशा अनेक क्रिया ज्या सिस्टीमद्वारे होत असतात, त्यामधे नियमितता येते, सुसूत्रता येते, डिसिप्लीन येते. म्हणजे ऑटोनॉमिक सिस्टीम बॅलंस किंवा अपडेट होऊन काम करू लागते. यास्तव पुरेसा व नियमित अनुलोम विलोम करणाऱ्यांचे आरोग्य ताबडतोब सुधारते.
डाव्या नाकपुडीने घेतलेला श्वास उजव्या मेंदूला व उजव्या नाकपुडीने घेतलेला श्वास डाव्या मेंदूला मिळत असतो. श्वास म्हणजे प्राणवायू, प्राणशक्ती. आपल्या शरिरात घेतलेला ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम रक्तातील तांबड्या पेशी करत असतात. अनुलोम विलोम करताना प्रत्येक वेळी मोठा श्वास घेतल्यामुळे रक्तामधील ऑक्सिजनचे प्रमाण नेहमी पेक्षा 10 ते 15 पट वाढते, रक्तवाहिन्यांचा विकास होतो. त्याच बरोबर नसनाड्यांचाही विकास होतो. रक्त फक्त ऑक्सिजनलाच वाहून नेते असे नव्हे, तर इतर पोषक तत्व जसे प्रोटीन्स, व्हीटॅमीन्स, सॉल्ट्स, न्युट्रीयंट्स यांना ही वाहून नेत असते. ती सर्व ऑक्सिजनबरोबरच शरिराला वेळच्या वेळी मिळू लागल्यामुळे, शरिरामधील सर्व अवयवांची उत्तम वाढ, विकास व पोषण होते. त्यामुळे शरीर बलवान, कार्यक्षम होते. आपल्या शरिरातील ऑर्गन सेल्संना म्हणजेच अवयवांना तसेच मेंदूला पोषक तत्वांबरोबरच ऑक्सिजनची जास्त गरज असते. जेंव्हा अनुलोम विलोममुळे नियमित व पुरेसा ऑक्सिजन मिळू लागतो, तेंव्हा त्या त्या अवयवांमधे दैनंदिन कार्य करण्यासाठी अतिरिक्त उर्जा तयार होते. त्यामुळे अनुलोम विलोम केल्यानंतर पुढील चोवीस तास प्रत्येक अवयव पूर्ण क्षमतेने कार्य करू लागतो.
अनुलोम विलोमचा प्रभाव जसा शरिरावर पडतो तसाच मेंदूवरही पडतो. जसा शरिराला पुरेसा प्राणवायू आवश्यक असतो, तसाच मेंदूलाही हवा असतो. अनुलोम विलोम शरीराबरोबरच मेंदूचा ही विकास करून त्याला समतोल बनवतो. अनुलोम विलोममुळे मेंदू रिलॅक्स होतो, शांत होतो. शांत झालेला मेंदू, रिलॅक्स झालेला मेंदू नव्या जोमाने काम करण्यास सिद्ध होतो. यामुळे स्मरणशक्ती वाढते, आकलनशक्ती वाढते. विचार शांत होतात, मन शांत होते. मंदबुद्धी असणाऱ्या मुलांनाही या प्राणायामाचा खूप फायदा होतो.  
शरिरातील कोणत्याही रक्तवाहिनीमधे अडथळे, ब्लॉकेज निर्माण झाले असतील तर ते अनुलोम विलोममुळे हमखास उघडले जातात.
अनुलोम विलोममुळे मसल्स मजबूत व व हाडे बळकट होतात. अनुलोम विलोममुळे उष्णता कमी होते. पॅरॅलिसीस, अर्धांगवायूचा आजार बरा होतो.
 अनुलोम विलोममुळे शरिरातील रीजनरेशनचा रेट, स्पीड वाढतो. त्यामुळे येणारे अथवा आलेले म्हातारपण, बरेचवर्ष दूर ठेवता येते.
खोलात जाऊन अभ्यास केला तर असे दिसते की अनुलोम विलोम शरिराबरोबरच मन, भावना, विचार, मेमरी, निर्णय क्षमता या सर्वांना करेक्ट करतो. या सर्वांची कार्यक्षमता वाढवतो.
परमेश्वराने मनुष्याला श्वास घेण्यासाठी  दोन नाकपुड्या दिल्या आहेत याला निश्चितच अर्थ आहे. डावा स्वर चंद्र स्वर, याला  “इडा” व उजवा सूर्य स्वर याला “पिंगला” नाडी म्हणतात. डाव्या स्वराने घेतलेला श्वास शरिरात शीतलता, थंडावा उत्पन्न करतो तर उजव्या स्वराने घेतलेला श्वास शरिरात उष्णता, उर्जा उत्पन्न करतो. डाव्या स्वराने घेतलेला श्वास उजव्या मेंदूला मिळत असतो तर उजव्या स्वराने घेतलेला श्वास डाव्या मेंदूला मिळत असतो. अनुलोम विलोम मुळे दोन्ही मेंदूंचा समान विकास होतो. त्यामुळे दोन्ही मेंदूंचे कार्य सुनियोजित रीतीने, सुरळीत होऊ लागते.
    प्रत्येक व्यक्तिमधे डावी अथवा उजवी नाकपुडी जास्त चालत असते. ज्यांची डावी नाकपुडी जास्त चालते त्या व्यक्ती शांत, मनमिळावू, समंजस स्वभावाच्या तसेच सर्दीचे, थंडीचे आजार असणाऱ्या असतात. ज्यांची उजवी नाकपुडी जास्त चालते त्या रागीट, तापट, कार्यक्षम तसेच पित्ताचे त्रास, उष्णतेचे त्रास  असणाऱ्या असतात. काही लोकांचे स्वभाव विध्वंसक असतात तर काहींचे स्वभाव कंस्ट्रक्टीव्ह असतात. सामान्यत: स्त्रियांमध्ये डावी, तर पुरुषांमध्ये उजवी नाकपुडी जास्त वापरली जाते. त्यामुळेच पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया जास्त समंजस, शांत, मनमिळाऊ स्वभावाच्या असतात. अनुलोम विलोम व्यक्तीचे स्वभाव, दोष, विचारही बदलतो.
असा हा अनुलोम विलोम प्राणायाम सर्वांना रोज, नियमित व पुरेसा करायला काय हरकत आहे ? नियमित थोडा वेळ अनुलोम विलोमसाठी दिला तर किती तरी फायदे, सहज आपल्या पदरात पडतात....
लेखक

3 comments: