Sunday, 15 January 2017

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
सिध्द करुनी मंत्र जपता, येई जीवनी अर्थ

कलियुग असे चालले ,दुर्जनांचे जाळे पसरे
सज्जनांना या आपत्तीतून, नामजपच तारे

विपरीत काळ असे ,होती कलह आणि वाद
कलीच पुरवी शक्ती ,स्वैराचार व भ्रष्टाचारास

मन कायम चंचल ,स्थिर न राही बुध्दी क्षणभर
अंतर्मनात सदा कलिचा, सुसाट असे वावर

काम,क्रोध,मद,मत्सर, रुपे फिरे शरीरभर
नित्यजीवनी सोडून सत्कर्म, प्रभाव अहंपणावर

अहंकाररुपी कली, मानवाच्या बसे मानगुटीवर
प्रत्येक कर्मा लावी ,तो मीपणाची  झालर

सदाचार पावूनी नष्ट, दुराचार फिरे घरभर
जप,पूजन,किर्तन,दान करण्या लागे आधार

यासर्वां दूर सारण्या नाम एकच असे चमत्कार
नामाच्या स्वाधीन करता कलीरुपी मी जाई दूर

स्वामीनाम रुपी साधनेचा,घेऊनी बघा हो ध्यास
पार करुनी या सागरा ,जन्म मरणाच्या फेर्यातून
सुटाल खास

सदा नाम ठेवता, ओठावर श्री स्वामी समर्थांचे
आठवून शेवटच्या क्षणी, सार्थक होईल जन्माचे

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हसत
खेळत नाम घेता पळून जाई कली अहं शोधार्थ

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर



श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय गजानन

गण गण गणात बोते  मंत्र असे श्री गजाननांचा

अनुभव घेऊनी पहावा जप ध्यान नामस्मरणाचा

भान हरपून जाई स्पंदने ठाव घेता अंतःकरणाचा

आळवूनी माऊलीला विडा द्यावा आमंत्रणाचा

नेम न सोडावा श्री गजानन विजय वाचण्याचा

रोज एक अध्याय वाचूनी हेतू पुरवावा अंतरीचा

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर

1 comment:

  1. १ ते ६० भाग वाचले, हा अध्यात्मिक ज्ञानाचा खजिना सापडला, काय लिहावे शब्द सुचत नाहीत, धन्य झालो आहे, पुढील भाग कधी वाचायला मिळतील.

    ReplyDelete