Monday, 13 February 2017

कविता मनातल्या मनातली


श्री स्वामी समर्थ

होते मन अती दुःखी
त्रासून जाई अंतःकरण

लागता मना गोष्ट काही
तेव्हा गळा येतो दाटून

हट्टी मना न पटता विचार
भावनांचा होतो कल्लोळ

विचारांचे होता द्वंद्व मनी
अहंकार तो फणा उभारी

आपले करती मनावर घाव
कुठे करावी सांगा तक्रार

असे दोन गोड शब्दांची आस
समजून घेण्या लागती सायास

अशावेळी आठवणी येती दाटून
आठवे मैत्रीचे दिलखुलास संभाषण

गेले दूर ते पारिवरिक हसरे क्षण
राहीली शाब्दिक चकमकीची खूण

अशा आठवणींना फुटता पाझर
अवचित अश्रू ओघळती गालावर

जगात कॉपी-पेस्टचा चाले बाजार
भरडून जाती लिहिणारे खरोखर

सत्याने जगणार्यास जे मागती आधार
अशांने मन होई स्वामीचरणी स्थिर

स्वामीनाम हाच एक असे माझा ध्यास
जाऊ दे सर्व मनातून शरण मी स्वामीपदास

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ

उदे ग आई उदे ग शांताई
तुझ्या नावाने उदे ग दुर्गाई

पाहता सुंदर मुखकमल
शांत मनी होते हलचल

मायेचा स्पर्श होता आई
नयनी पाणी धावत येई

हास्यात तव शांती विलसे
हृदयी निरंतर प्रेम वसे

साजिरी गोजिरी माय माऊली
लेकरावर ठेव तव कृपा सावली

दुर्गेचा तू असशी शांत अवतार
तापटपणाला घाली शांतीची पाखर

चेहर्यावरचे भाव नित्य बदलती
स्थिर पाहता येते प्रचिती

धाव घेई आसुसला जीव दर्शना
कधीतरी पुरवशील ही आस ना

शांताई कधीही रोष न करी मजवरी
दिसे मज नित्य तव चरण अंतरी

रोज हळदकुंकू लाविते तव भाळी
राहू दे घरी असाच तुझा वास सर्वकाळी

मन होई नतमस्तक पंचमीचे रुप देखणे पाहून
सर्वांचे हित कराया अवतरली शांतादुर्गा कवळेवाशीण.

उदे ग अंबे उदे ग शांताईच्या नावाने उदे ग
ही भावपुष्पे अर्पिते तव चरणावर उदे ग

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

वैशाली कुळकर्णी
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

श्रीराम जय राम जय जय राम।

कायावाचामने नित्य घ्यावे नाम।
शांतीचे असे ते परिपूर्ण  धाम।
श्रीराम जय राम जय जय राम।

विचार येता मना स्थिर करी नाम।
काम धाम करताना शक्ती देई राम।
श्रीराम जय राम जय जय राम।

सर्वत्र असे वसलेले स्वामी नाम।
दुष्ट प्रवृत्तीनां पळवून लावी राम।
श्रीराम जय राम जय जय राम।

जगाला दिशा दाखवी दिव्य नाम।
शुद्ध होते मन आठवता स्वामी राम।
श्रीराम जय राम जय जय राम।

क्रोधाला जिंकून घेई स्वामी नाम।
हसवून जगणे शिकवी मनात राम।
श्रीराम जय राम जय जय राम।

स्वार्थी दुनियेत असे निस्वार्थी नाम।
पैचाही खर्च नसे घेण्यासाठी नाम।
श्रीराम जय राम जय जय राम।

दिन दुःखिता मध्ये वसतो स्वामी राम।
खरा दुःखी ओळखता येतो घेता नाम।
श्रीराम जय राम जय जय राम।

नित्य दान करी रे मनी घेऊनी नाम।
जीवनाच्या अंती मुखात येईल रे स्वामीनाम।
श्रीराम जय राम जय जय राम।

मनात न धरिता खंत प्रेमाने घेऊ नाम।
स्वामीसेवा करु हातात हात घेऊन मुखी नाम।
श्रीराम जय राम जय जय राम।

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

वैशाली कुळकर्णी

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी

दोन थेंब आसवांचे
देती वेदना जीवाला
घरट्यातून नयनांच्या
साद घालती माऊलीला

हरवून मन हे जाते
गुज गोष्टीत मैत्रिणींच्या
मिळता एकांत मजला
पाझरे नयनातूनी या

कधी भेटसी मला ग
आठव सारखी येते
मायेचे चार शब्द मिळता
नयनाला पाझर  फुटते

कुठे अडकलीस माऊली तू
का लागलीस असे कराया
फिरुनी घे जवळी तू
डोळे भरुन येती तुज
पहिल्या सारखी पहाया

आईची महती सांगूनही संपेना
आई सम माया कोणी करु शकेना
स्वामीच वसती माऊलीत
आठव येता आईची स्वामी नाम येई ओठी

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई तुला
आमच्याकडून.
वैशाली कुळकर्णी

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

शांताई दिसे तुझे रुप किती ग सुंदर
डोळ्यांचे पारणे फिटे बघता नयनमनोहर
हास्य विलसे तेजोमय चेहर्यावर निरंतर
भारुन जाई मन तुझ्या पदी लीन खरोखर
वाटे जाऊनी विसावा घ्यावा तव मांडीवर
तव आशिष मिळण्या मन हे आतूर
कृपेची सावली राहू दे सर्व भक्तांवर

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

वैशाली कुळकर्णी

Monday, 6 February 2017

नर्मदा परिक्रमा भाग 58


💐  जय   गुरुदेव  💐
                🌹 परिक्रमा  🌹
🌻 क्रमश:--- भाग  ५८
रोजच्या प्रमाणे  पहाटे उठून ध्यान स्नान साधना पूजा आटोपली खरच सांगतो रोज दिवस कसा उजडतो साधना व स्वामींची अमृत वाणी एकूण कसा संपतो कळतच नाही  रोज खूप वेगळं अनुभूती देणार घडतंय असं वाटत शब्दात सांगणं कठीण
असो पुढे निघालो नरखेडी नंतर रुंडगाव व नंतर करजण नदी ओलांडून शुकदेव  येथे आलो येथे शुकदेवानी  तपस्या केली आहे येथे मार्कण्डेश्वर महादेवाचे मंदिर आहे
तेथून काही अंतर चालल्यावर एक कुटी दिसली स्वामी म्हणाले थाब  ह्ये कुंतीला साधुकुटी म्हणतात आम्ही आत गेलो
 स्वामी म्हणाले इथे शांत बस व अनुभव घे मी सर्व सामान बाजूला ठेवले व शांत बसलो स्वामी पण माझ्या पासून काही अंतरावर बसले
जे घडले त्याचे काय वर्णन करू माझ्या कडे शब्द नाहीत एवढंच सांगेन खरंच जन्माचे सार्थक झाले बर काही घडलं आठवलं तरी तिकडे धावत जावेसे वाटते
खऱ्या आध्यात्मिक लहरी खरी तपस्येची तप्त भूमी काय असते हे पूर्ण जाणवले असो किती लिहले तरी लिहण्यात सुद्धा माझी तृप्ती होणार नाही असो
तेथेच दुपारी  थांबलो साधना केली
येथून जाण्याची इच्छा होत नव्हती निघताना डोळ्यात खरच पाणी आले
पुढे निघालो पाटणा ओरी वरून कोटेश्वर महादेव येथे आलो तेथे महादेव मंदिरात राहण्याचे ठरवले मंदिरातून सदावर्त ( शिधा )  मिळाले स्वामी करता चपाती व बटाट्याची भाजी  बनवली नंतर स्नान साधना पूजा केली नंतर  स्वामींना भोजन दिले नंतर मंदिरातून मला  दूध चपाती खाल्ली सर्व आवरून स्वामीनसमोर बसलो ते काय सांगतात खूप उत्सुकता आहे
स्वामीनीं बोलण्यास  सुरवात केली ते म्हणाले  बघ संख्या एकंदर दहा आहे नंतर कितीही मोठी संख्या बघितली तरी त्यातीलच  संख्या परत येतात आता मी तुला प्रत्येक संख्यचे वैशिष्ठ सांगती

एक )  - एकाक्षरी मंत्र - ओम
दोन )  - शरिरातील महत्वाच्या सर्व अवयवांच्या जोड्या आहेत. डोळे दोन, कान दोन, हात दोन, पाय दोन वगैरे
तीन)   - शंकर त्रिनेत्र, संगीताची अंग तीन, गायन, वादन आणि नर्तन आपल्याकडे तीन गुण मानले जातात. सत्व, रज आणि तम गुण. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हे तीन योग आहेत.
चार)  - चार वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद सध्या सुरु आहे कलियुग, त्याआधी होत कृतयुग, त्रेतायुग. द्वापारयुग आणि चौथं कैलियुग म्हणजे झाली चार युग आपल्याकडे चार आश्रम सांगितले आहेत. ब्रह्मचर्याश्रम, ज्यामध्ये गुरुगृही राहून ज्ञान, अध्ययन केल्ण जातं. गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि सन्यासाश्रम हे चार आश्रम. वाद्य चार प्रकारची असतात. तंतूवाद्य, वायूवाद्य, धातूवाद्य आणि चर्मवाद्य.
पाच) - पंचमहाभूतं कोणती. पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश. देवाला नैवेद्य दाखवतो पंचामृताचा. त्यात असतं दूध, दही, तूप, साखर आणि मध. आपल्याला एक श्लोक माहीत आहे का
आहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा
पंचकन्या स्मरेत नित्यम महापातक नाशनम I
अशा पंचकन्या. पाच इंद्रिय म्हणजे पंचेंद्रिय कान, नाक, त्वचा, डोळे, जीभ.
सहा) - शाळेत असताना सगळ्यांना सहा ऋतुंची नाव पाठ करावी लागली असतीलच. शरद, हेमंत, शिशिर, ग्रीष्म, वर्षा आणि ऋतुराज वसंत. सहा रस. गोड, आंबट, तिखट, तुरट, कडू आणि खारट. माणसाचे शत्रू सुद्धा सहा ज्यांच्यावर विजय मिळवणं कठीण काम, क्रोध, मत्सर, मद, मोह, लोभ असे षडरिपू.
सात) - सप्तसूर. सारेगमपधनीसा सर्वांना माहीत आहेतच. आकाशातलं इंद्रधनुष्य सात रंगानीच बनलेलं असतं. व्यास, वाल्मिकी, विश्वामित्र, वाशिष्ठ, दधिची, अगस्ती आणि अत्री सप्तर्षी ही माहीत असतील.
आठ) - आठ म्हटल्यावर सर्वप्रथम आठवतात. अष्टविनायक प्रत्येकाचं श्रध्दास्थान त्याचा महिमा प्रत्येकजण जाणतो.
शास्त्रीय नृत्यकलेत भरतमुनींनी अष्टनायिका सांगितल्या आहेत. त्यांची नावे अभिसारिका, खंडीता, विप्रलब्धा, उत्कंठा, स्वाधिनपातिका, वासकसज्जा, कलहान्तारिता आणि प्रोषितभर्तृका.
नऊ) - नवरत्नांची वेगळी ओळख सांगायला नकोच. हिरा, पोवळ, पाचू, माणिक, गोमेद, पुष्कराज, नील मोती अकबर बिरबलाच्या गोष्टी सर्वांनी लहानपणी वाचल्या असतील त्याच अकबराच्या दरबारात असणार्‍या नवरत्नांबद्दल तुम्ही वाचलं असेलच. त्यात बिरबल आणि तानसेन ही नावं आपण ओळखतो. इतर नावं अबूल फजल, अबूल फैजी, राजा तोरडमल, पन्हा भांड कवि, गंगाभट, संस्कृत तज्ज्ञ कवि जगन्नाथ पंडीत नऊ रस नवग्रह आहेत.
दहा) - दहा दिशा आहेत. पृथ्वीवर असूरांचा नाश करण्यासाठी विष्णूने अवतार धारण केले ते सुध्दा दहा, ज्यांना आपण दशावतार म्हणतो.
आता झोप  उद्या  दुसरा विषयी बघू
क्रमश:---
स्वामी खरच रोज जे जे सांगतात  ते नवीनच असते व विचार करायला प्रवृत्त करते
लेखक श्री विश्वास वाड

💐  जय  गुरुदेव  💐
              🌹 परिक्रमा 🌹
🌻 क्रमश:--- भाग  ५९
रोजच्या प्रमाणे उठून  ध्यान स्नान साधना व पूजा करून  पुढे जाण्यासाठी तयार झालो कोटेश्वर मंदिरातील  पुजाऱ्याने  स्वामींना चहा पिण्याकर्ता थांबवले मला तर घेण्याचं प्रश्नच नव्हता  इथे परत स्वामींनी विचारले  अरे किती दिवस झाले साधना सुरु करुन मी म्हंटल  खरंच मी दिवस मोजलेच नाही स्वामी परत हसले असो
पुढे निघालो कोटेश्वर वरून सिसोदरा  वरून  कादरोज येथे आलो दुपारी ह्या ठिकाणी थाबण्याचे ठरवले ह्या ठिकाणी कार्तिकस्वामीनीं तप्सया केली आहे ह्या ठिकाणी आश्रमातर्फे  भोजन होते स्वामी म्हणाले काही बनू नकोस मी इथे आश्रमात जेवण करीन मी तेथील  महाराजाना विचारले चपातीत  रामरस ( मीठ ) आहे का त्यांनी हो सांगितले म मी जेवण न करण्याचा निर्णय घेतला माध्यांनचे  स्नान संध्या करून स्वामींचे भोजन होई पर्यत विश्राम केला
दुपारी पुढे निघालो रस्त्यात विचार करत होतो की आज रात्री स्वामी काय सांगतील हा विचार करतच होतो तेवढ्यात पाठीमागुन स्वामीनीं  आवाज दिला अरे काय विचार करतोस रोटरी होऊ दे मग रात्रीच रात्री बघू आत्ता अजपाजप का बंद केलास
चूक लक्षात आली खरंच आश्चर्य आहे माझा मनात विचार आला की लगेच स्वामीना कळते असो
चालत चालत  वराछा वरून आसा येथे आलो याठिकाणी श्री दगडू महाराज ह्यांचा आश्रम आहे ह्याचा ठिकाणी दगडू महाराजानी जलसमाधी घेतली  स्वामी म्हणाले आज आपण येथे  मुक्काम करू आश्रमात राहण्याचे ठरवले तेथील व्यवस्थापकाना माझया साधनेविषयी सांगितले ते म्हणाले ठीक आहे रामरस ( मीठ ) तेल न टाकता तुमच्या पुरत्या दोन चपात्या बनवू  म  संध्याकाळचे स्नान साधना पूजा केली नंतर मी व स्वामी  आश्रमाच्या भोजन शाळेत गेलो तेथे प्रथम स्वामीचे भोजन झाले नंतर मी दूध चपाती  खाऊन ज्या खोलीत  आम्ही थांबलो तेथे आलो स्वामी  समोर बसलो  स्वामी हसले म्हणाले आज काय ऐकायचं मी म्हणालो तुम्ही जे ज्ञान  द्याल ते ग्रहण करीन स्वामी  थोडा वेळ शांत बसले
 मग स्वामी म्हणाले आपण रोज जे स्नान करतो त्या विषयी मी तुला आज सांगतो स्नानाच्या वेळा त्याचे कारण नीट ऐक
   स्नान म्हणजे शरिराची शुद्धि करणे._
_सकाळी उठून अंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खावु पिउ नये. जितके महत्व शास्त्रात मंत्र आणि नामस्मरणाला आहे, तितकेच महत्व  स्नानाला  सुद्धा आहे._
_🌺अंघोळ ही शास्त्रानुसार झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही कितीही उशिरा झोपला तरीही अंघोळ ही त्या त्या वेळेलाच झाली पाहिजे._

 🌺  *ब्रम्हमुहूर्ताची अंघोळ म्हणजे, 4 ते 6.*
 🌺  *मनुष्याची अंघोळ म्हणजे,    6 ते 8.*
  🌺 *राक्षसांची अंघोळ म्हणजे     8 ते 10.*
  🌺 *प्रेत भूतांची अंघोळ म्हणजे     10 ते 12.*
  🌺 *त्यानंतरची अंघोळ म्हणजे शरीराला किड.*
   🌻 *ब्रह्म मुहूर्ताचे स्नान म्हणजे देवांची अंघोळ.*
   ह्या वेळेत अंघोळ केल्याने मनुष्याचे शरीर निरोगी राहते. शरीर जसे शुद्ध होते तसेच मन देखील शुद्ध होते. मनात नकारात्मक विचार येत नाही. आळशीपणा न येता सर्व कामे वेळच्या वेळी होतात आणि  मनुष्याला एक वेगळाच उत्साह येतो. नामस्मरण पूजा झाल्यामुळे मनुष्याची दैविक शक्ति वाढते. मानसीक ताकद वाढते._
🌺 *6 ते 8 ही मनुष्याची अंघोळ असते.*
   ह्या वेळेस अंघोळ केली की पापी मनुष्यही, परोपकारी मनुष्यासारखा वागतो. म्हणजे राग द्वेष कमी होतो. सकाळी स्नान झाल्यामुळे कामासाठी उत्साह येतो. पण ब्रह्ममहुर्ताच्या अंघोळी इतका उत्साह मिळत नाही. फक्त मनुष्य सर्व बाबतीत सम प्रमाणात असतो. सकाळी स्त्रोत्र वाचन झाल्यामुळे अर्धेपट त्याला दैवी शक्ति मिळते._
   🌺  *राक्षसांची अंघोळ 8 ते10*
_ह्या वेळेत जो मनुष्य अंघोळ करतो त्याच्या मनात क्रोध अहंकार जास्त निर्माण होतो. मत्सर लोभ जास्त स्वरुपात मनुष्यात येतो. दैविक शक्ति फार कमी मिळते. शरीराचा कोठा साफ न झाल्यामुळे अनेक आजार मनुष्याला जड़तात. अशक्तपणा BP मधुमेह हे आजार ह्या वेळेस स्नान केलेल्या व्यक्तीला जास्त असतो. कामात उत्साह नसतो. आळशीपणा काम करतांना सतत येतो त्यामुळे मनुष्य सारखा चिड़चिड़ा होतो._
 🌺   *प्रेतभूतांची अंघोळ 10 ते 12*
_ह्या वेळेस अंघोळ करणारी व्यक्ति ही खुप आळशी होते. काम करायचा कंटाळा येणे, सतत झोपुन राहणे, खुप खाणे. त्यामुळे असिडिटी कोठा साफ न होणे तसेच केस गळणे लवकर सुरकुत्या येणे चरबी वाढणे असे आजार होतात. मनुष्य आळशी झाल्यामुळे त्याला कोणतेच काम करण्यात उत्साह वाटत नाही. तो मनुष्य इतका रागिट होतो की राग आला की त्याचा स्वतावर ताबा राहत नाही._
_🌻तुम्ही कितीही झोपा काम करा पण सकाळची पूजा ही सकाळीच झाली पाहिजे.
   तरच त्याची शक्ति मिळेल._
_म्हणून मनुष्याने_
_   कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे.‼_
_स्नान देवपूजा केल्यावर थोड्यावेळ झोपले

तर काही हरकत नाही पण 🌻स्नान देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे.
_तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग नाहीतर मग विवीध आजारांना आमंत्रणच होय._
_ कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्व असते. म्हणून स्नान देवपूजा ह्या कर्मांना पण तितकेच महत्त्व आहे. आणि_  आपणही ते जपलेच पाहिजे
झोप आता उद्या  नवीन विषय बघू
क्रमश:---
लेखक श्री विश्वास वाड



💐  जय  गुरुदेव 💐
                 🌹 परिक्रमा 🌹
क्रमश:-- भाग  ६०
     नित्यनियमाने  पहाटे उठून  ध्यान स्नान साधना पूजा झाली  पूजा झाल्यावर  पुढे निघालो
    गेले दोन दिवस मनात सदोदित विचार येत होता की मी नागाची साधना केंव्हा सुरु केली मातारामनी सांगीतलेले दिवस पूर्ण झाले का काहीच आठवत नव्हते स्वामींनच्या  सहवासाने व त्यांच्या अमृत ज्ञानवणीने काहीच आठवत नाही दिवस कसा उगवत होता सर्व साधना पूजा कशी होत होती व दिवस कसा मावळत होता काहीच कळत नव्हते एकदम आनंदात चालले होते असो
मी हा विचार करत असतानाच स्वामीनीं आवाज दिला व म्हणाले  विचार कसला करतोस जेव्हढी साधना झाली असेल तेव्हढी होऊ दे तो विचार करून अजपाजप का थाबवतोस  जास्त  साधना झाली तर काही वाईट होणार नाही
मला खरंच स्वामी भेटल्यापासून हे कोडेच आहे की माझ्या मनातले  हे लगेच ओळखतात असो मी परत मनात जप सुरु केला व पूढे चालू लागलो
पुढे पंचमुखी हनुमान , गिरनार गुफा,पणेथा पार करून दुपारी वासणा इंद्रेश्वर महादेव मंदिरात दुपारच्या साधनेकरता  थांबलो तेथे अन्नक्षेत्र आहे स्वामींनी तेथे भोजन केले माझी दुपारची साधना करून थोडा वेळ थाबुन पुढे निघालो पुढे वेलूगाम भावपूरा पार करून सरसाद है ठिकाणी आलो येथे गुप्त गोदावरी स्थान आहे ह्या विषयी अनेक कथा आहेत येथेच दुर्वास ऋषींची परिक्रमा खंडित झाली ह्याची पण एक कथा आहे असो
स्वामी आज्ञेने येथे मुक्क्म करायचे ठरवले तेथे एका ब्रम्हवृदाच्या झोपदीबाहेर आंम्ही थांबायचे ठरवले त्या ब्राम्हणाने आम्हास रात्री भोजन देतो सांगितले
संध्याकाळची स्नान साधना पूजा करून स्वामींचे भोजन झाल्यावर मी दूध चपाती खाल्ली व सर्व आवरून स्वामींनसमोर बसलो आज काय ऐकायला मिळणार  हाच विचार मनात आला
स्वामी म्हणाले आज तू प्रश्न विचार मी उत्तर देतो
       मी विचारले स्वामी साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात ? साधकाने साधन काय व कसे करावे ? साधनाने साधकाला काय प्राप्त होते ?
  स्वामी  हसले व बोलू  लागले
 सद्गुरूंनी सांगितलेले साधन जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनाचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. सद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनाचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधन करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधन करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधन करणे या परते दैवच नाही. साधनाखेरीज अन्य वासना असू नये. साधन न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधन सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधन करावे. साधकाने झटून साधन करावे व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.ह्याचा  पुढे  उद्या बघू झोप आता निरिच्छेने झोपण्या करता उठलो
क्रमश:---
लेखक श्री विश्वास वाड

Saturday, 28 January 2017

कृष्णा माहात्म्य


*Anant Deo;Wai.10/01/2017.* ⛳🕉🌺🙏🏼🙏🏼🙏🏼🌺🕉⛳

*श्री कृष्णा माहात्म्य - प्रस्तावना*
💥💥💥💥💥💥💥💥💥
*विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.*
🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
भगवान वेदव्यासांनी समस्त मानवजातीला आत्मिक समाधान प्राप्त करून देण्यासाठी अठरा पुराणे रचिली. त्यामध्ये स्कन्दपुराण हे फार मोठे म्हणजे सुमारे ८१ हजार श्लोक असलेले व अनेक तीर्थक्षेत्रांची महती वर्णन करणारे आहे. स्कन्द उपपुराण म्हणून देखील सुमारे १ लाख श्लोकांचे आहे, असे संशोधकांचे मत आहे. परंतु ते सध्या पूर्णपणे उपलब्ध नाही. सूतसंहिता, सह्याद्रिखंड इत्यादि काही भाग उपलब्ध आहेत.

स्कन्दपुराणामध्ये श्रीकृष्णानदीचे माहात्म्य ६० अध्यायात वर्णन केलेले आहे. त्यामध्ये वाई (वैराजक्षेत्र), लिंब-गोवे, माहुली, कराड, नरसोबाची वाडी (अमरेश्वर), औदुंबर (भुवनेश्वरी) इत्यादि तीर्थक्षेत्रांचे महत्त्व मार्मिक कथा सांगून वर्णन केले आहे.

सनातन धर्माच्या तत्त्वानुसार कृत, त्रेता, द्वापार, कलि या युगांमध्ये मानवाची सत्प्रवृती, मानसिक व शारीरिक कार्यक्षमता यांचा उत्तरोत्तर र्‍हास होत असतो. त्यामुळे मानवाकडून पाप जास्त होत असते; परंतु सामर्थ्य कमी होत असल्याने कृच्छ्र-चान्द्रायणादि शरीरकष्टाची प्रायश्चिते करून पापक्षालन करणे अशक्य असते. म्हणून कृष्णास्नान, कृष्णाजलपान, एवढेच काय पण केवळ कृष्णानदीच्या स्मरणाने देखील पातकांपासून मानवाची मुक्ती होते. याच उद्देशाने प्रत्यक्ष भगवान विष्णूच कृष्णानदीस्वरूप झाले व त्यांच्याच आज्ञेने ब्रह्मदेवाने नदी-सागरादी तीर्थक्षेत्र मानवाच्या पापक्षालनार्थ उत्पन्न केली असे कृष्णामाहात्म्यात सांगितले आहे.

या नदीच्या परिसरात जगाच्या उद्धारार्थ देवादिकांनी वस्ती केली. तीच वाई, माहुली, कराड इत्यादी तीर्थक्षेत्र होत. काशीविश्वेश्वरादी देवांचे येथे वास्तव्य झाले म्हणून वाईला दक्षिणकाशी असे म्हणतात.

श्रीकृष्णानदीस सात घाट असून प्रत्येक घाटावर श्रीकृष्णामहोत्सव सुमारे पाच ते सात दिवस साजरा होत असतो. कृष्णेचे पाणी अत्यंत पवित्र आहे. विष्णूंच्या चरणांपासून गंगा उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.
💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢



*!!श्री कृष्णा माहात्म्य!!*
          *अध्याय १*

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


*विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.*
☘☘☘☘☘☘☘☘☘
*!!श्रीगणेशाय नमः!!*

श्रीकृष्णावेण्यै नमः ॥ ॐ नमोजी गजानना ॥ आदिपुरुषा गौरिनंदना ॥ पूर्ण करिसी भक्तकामना ॥ म्हणोनि आलो शरण मी ॥१॥

तू बुद्धिदाता मंगलमूर्ती ॥ सत्वर पुरविसी भक्तजनार्ती ॥ अभिलाष धरोनि हाचि चित्ती ॥ अनन्यगती पातलो ॥२॥

आता नमू वाग्विलासिनी ॥ आदिशक्ति ब्रह्मनंदिनी ॥ जिव्हाग्री नित्य बैसोनी ॥ ग्रंथ वदवी मन्मुखे ॥३॥

तू सकलगुणनिधान ॥ मी तो असे बुद्धिहीन ॥ म्हणोनि मागतो वरप्रदान ॥ चरणी नमोनि जननीये ॥४॥

आता नमू श्रीसद्‌गुरूमूर्ती ॥ ध्यान करू अहर्निशी ॥ दासवांछा पुरविण्यासी ॥ गुरुराया समर्थ तू ॥५॥

ऐसे ऐकोनि सदगुरुमूर्ती ॥ पातले तेथे त्वरित गती ॥ प्रसन्न होवोनि शिष्याप्रती ॥ बोलती का वो चिंतिले ॥६॥

तदा वंदोनि सद्गुरुचरण ॥ म्हणालो मी बुद्धिहीन ॥ नसे विद्याही मजलागुन ॥ कैचे काव्यज्ञान मग ॥७॥

ऐसा असोनि पशुसमान ॥ करावे कृष्णाचरितवर्णन ॥ म्हणोनि हे श्रीगुरुचरण ॥ चिंतिले निजमानसी ॥८॥

आयुष्याचा नसे भरवसा ॥ गळी यमाचा पडेल फांसा ॥ चित्ती परि ही असे आशा ॥ काय करू गुरुवरा ॥९॥

उदारबुद्धी श्रीगुरुनाथ ॥ म्हणती सकल मनोरथ ॥ होतील शुद्ध करोनि चित्त ॥ कृष्णास्मरण करी बा ॥१०॥

ऐसो ऐकोनि गुरुवचन ॥ कृष्णेचे मग करी ध्यान ॥ आणि म्हणे हे चरित्रकथन ॥ तुझे करवी मन्मुखे ॥११॥

ऐसे करोनि कृष्णास्तवन ॥ वंदिले मातापितृचरण ॥ विनवोनिया मग संतसज्जन ॥ श्रोतृजन निमंत्रिले ॥१२॥

म्हणे आता सावधान ॥ तुम्ही होवोनि मजकडून ॥ कृष्णाकथा सुधापान ॥ करवा सज्जन संत हो ॥१३॥

कृष्णा वेणी ककुद्मती ॥ स्वर्गी सदा त्या वास करिती ॥ तेथोनि आल्या भूतळापती ॥ जगदुद्धार कराया ॥१४॥

त्या पातल्या कवणे रिती ॥ स्कंदपुराणी कैलासपती ॥ ते आदरे स्कंदाप्रती ॥ सांगे ऋषींसि नारद ॥१५॥

असे भाषा ही संस्कृतु ॥ अर्थ जाणती विद्यावंतु ॥ भोळे आबालवृद्ध भक्तु ॥ ज्ञान तयाला कैचेनी ॥१६॥

ऐसे देखोनि कृष्णाबाई ॥ ठाव देता माझे ह्रदयी ॥ स्फुरण जाहलेंचि लवलाई ॥ ग्रंथ प्राकृत वदाया ॥१७॥

श्रोती व्हावे सावधान ॥ कृष्णाचरित्रसुधापान ॥ करिता दुःखनिदर्शन ॥ कल्पांतीही घडेना ॥१८॥

दोषांचे जे माहेरघर ॥ तो हा कलि निरंतर ॥ स्वधर्म सांडोनि दुराचार ॥ राहताति लोक पै ॥१९॥

संगे तयाचे भयभीत ॥ जाहलो आम्ही जाण निश्चित ॥ आता स्वामी कृपावंत ॥ सांगा उपाव झडकरी ॥२०॥

बोल ऋषींचे करोनि श्रवण ॥ हासोनि बोले ब्रह्मनंदन ॥ महापथासी पंडुनंदन ॥ गेले कली हा जाणोनि ॥२१॥

येथेचि राहता धीर होऊन ॥ करिता येतसे जे साधन ॥ ते न घडेचि पावता मरण ॥ ऐसे वाटे मजप्रती ॥२२॥

म्हणोनि जे का नर ज्ञानी ॥ धरू नये हे भय तयांनी ॥ कलियुग हे मोक्षदानी ॥ वैकुंठभुवनी नेतसे ॥२३॥

अदृश्य कलियुगी देव म्हणती ॥ भेटे ज्ञानियासि सत्वरगती ॥ अज्ञानियांसि स्वये श्रीपती ॥ सांगे उपाव तरावया ॥२४॥

स्कंदपुराणी जया कथेस ॥ बोलिला श्रीवेदोव्यास ॥ तीच सांगतो आता तुम्हांस ॥ प्राक्रुत भाषेकरोनी ॥२५॥

कल्पारंभी नारायण ॥ ब्रह्मयासी करी कथन ॥ तुवा साद्यंत सृष्टिरचन ॥ ममाज्ञेने करावे ॥२६॥

ऐकोनि विधि वंदोनि चरण ॥ बोले दोन्ही हस्त जोडून ॥ आज्ञेप्रमाणे सृष्टिरचन ॥ करीन युगपरत्वे ॥२७॥

परि प्रलयवधि ही स्थिती ॥ कैशी चालेल माझिये हाती ॥ ऐकोनि म्हणे कृपामूर्ती ॥ तुवांचि केले पाहिजे ॥२८॥

तुजवाचोनि चतुरानना ॥ कोणासि करिता नये रचना ॥ तरी पर्वत तीर्थ आणि वना ॥ यथापूर्व रचावे ॥२९॥

मी आपुले तनूपासून ॥ करीन कृष्णेसि उत्पन्न ॥ करावया जगदुद्धारण ॥ परम पवित्र भूमंडळी ॥३०॥

 तीच सर्व तीर्थमाता ॥ ऐसे वदे तै जगत्पिता ॥ निष्पाप करोनिया जगता ॥ सायुज्यताही देईल ॥३१॥

संगे कलीचे जो का मळ ॥ दर्शने तो भस्म सकळ ॥ कृष्णासान्निध्याचे फळ ॥ तेही अगम्य जाणिजे ॥३२॥

तत्तीरी करितील जे वास ॥ ते पावन अन्य जीवांस ॥ करितील ऐसे जगन्निवास ॥ ब्रह्मयासी बोलिला ॥३३॥

मग कृष्णेसि ह्या जगती ॥ स्वये उत्पन्न करी श्रीपती ॥ इतर ब्रह्मयाचेचि हाती ॥ तीर्थे निर्माण करवी पै ॥३४॥

ऐसी सकळ तीर्थे करून ॥ बोलता झाला रमारमण ॥ जे का करितील भक्ति पूर्ण ॥ दोष न वसे तयांसी ॥३५॥

मंत्रौषधींचा असे ज्ञानी ॥ काय करी तया अग्नि ॥ कलिनिर्मित पातकांनी ॥ भक्तांसि व्हावे काय हो ॥३६॥

म्हणोनि करिता तीर्थसेवन ॥ तैसेचि जाण हरिस्मरण ॥ येणे कलियुग कृतासमान ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥३७॥

हे कथानक करोनि श्रवण ॥ संतोष पावले ऋषिजन ॥ वदती नारदा पुण्यवान ॥ म्हणोनि उद्धरी जडांसि ॥३८॥

ऐसी कृष्णा पुण्यपावन ॥ केली विष्णूने निर्माण ॥ तिचे कथासुधापान ॥ करवी दीनदयाळा ॥३९॥

ऐसे परिसोनि नारदऋषी ॥ म्हणे विधीने  ह्रषीकेशी ॥ स्तवोनि पुसता तो तयासी ॥ सांगे तेचि सांगतो ॥४०॥

ऐकोनि ब्रह्मयाची स्तुती ॥ सांगतसे मग दानवारि ती ॥ चुकवावया संसारभीती ॥ कृष्णेसि निर्मितसे ही ॥४१॥

त्या कृष्णेचे भयेकरून ॥ निःशंक न करी कली वर्तन ॥ वायु स्पर्शोनि कृष्णाजीवन ॥ करी उद्धार जडाचा ॥४२॥

स्नान पान स्तव नमन ॥ तैसेचि अंतरी तिचे स्मरण ॥ तेणे निष्पाप नर होऊन ॥ दिव्य गती मेळवी ॥४३॥

योगाभ्यासादि साधने ॥ कथिली आहेत शास्त्राने ॥ दुष्कर आहेत कलियुगाने ॥ म्हणोनि कृष्णा निर्मिली ॥४४॥

जो ऐसी करील भक्ति ॥ तैसी तयाला मिळेल मुक्ति ॥ मिथ्या मानू नका उक्ति ॥ समस्त तुम्ही ऋषी हो ॥४५॥

जे तज्जलाचे करितील पान ॥ तद्रूप जातील ते होऊन ॥ भवभयनाशक मिळे ज्ञान ॥ मिथ्या नोहे कदापि ॥४६॥

तुझे कार्य व्हावे अविघ्न ॥ म्हणोनिया निजमूर्तिपासून ॥ केली जे मूर्ति उत्पन्न ॥ अति लावण्य गोजिरी ॥४७॥

तिचे मुखप्रभेकरून ॥ दिशा दिसती शोभायमान ॥ त्यांचे मलिनत्व जाऊन ॥ तेजःपुंज मिरविती ॥४८॥

चतुर्भुज मेघकांती ॥ शंखचक्राब्जगदा हस्ती ॥ झळके पीतांबर कटी ॥ गळा वैजयंती शोभत ॥४९॥

उरी श्रीवत्सलांछन ॥ नाही दिधले कन्या म्हणून ॥ हे न द्यावे तिजलागून ॥ म्हणोनि न दे तियेसी ॥५०॥

ऐसी उत्पन्न करोनी मूर्ती ॥ म्हणे विधीला लक्ष्मीपती ॥ इतर तीर्थे भूमीवरुती ॥ इचे संगती असू दे ॥५१॥

श्रीहरीचे ऐकोनि वचन ॥ संतोष पावला कमलासन ॥ मग सृष्टीची रचना करून ॥ तीर्थे निर्माण पै करी ॥५२॥

विष्णु रुपिणी कृष्णाबाई ॥ सकळ जगाची तीच आई ॥ सत्यापासोनि इया ठायी ॥ आली पावन कराया ॥५३॥

म्हणे नारद ऋषींप्रती ॥ ऐसी असे हो कृष्णोत्पत्ती ॥ पुढिले अध्यायी सेनापति ॥ प्रश्न करील शिवासी ॥५४॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोना पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ प्रथमोऽध्याय गोड हा ॥५५॥

*॥इति श्रीस्कंदपुराणे रेवाखंडस्थ कृष्णामाहात्म्ये कृष्णोत्पत्तिवर्णनं नाम प्रथमोऽध्यायः ॥*



*श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय २*

*विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.*
💢⭕💢⭕🕉⭕💢⭕💢
*श्रीगणेशाय नमः ॥*

श्रीकृष्णायै नमः ॥ कृष्णा भवभयमोचिनी ॥ कृष्णा कृष्णाघहारिणी ॥ कृष्णा कृष्णस्वरूपिणी ॥ कृष्णाबाई माउली ॥१॥

मागील अध्यायी कृष्णाजनन ॥ ऐकोनि ऋषी अस्वस्थमन ॥ बोलती हे ब्रह्मनंदन ॥ तृप्ति नोहे मानसी ॥२॥

कृष्णा कैशी या भूवरी ॥ तीर्थे आणिली नानापरी ॥ हेचि कथा सविस्तरी ॥ कोण कथी तुजवीण ॥३॥

परिसोनिया ऋषिवचन ॥ नारद बोले संतोषून ॥ तुमचे कृष्णेठायी मन ॥ सहज मुक्ती तेणेचि ॥४॥

कृष्णाकथेची अति प्रीती ॥ असता वारितसे मुक्ती ॥ मीही तुमचेचि संगती ॥ पावेन गती हो उत्तमा ॥५॥

मन करोनि सावधान ॥ कृष्णाकथा करा श्रवण ॥ कलीचे जो करी दहन ॥ महिमान ऐसे तियेचे ॥६॥

जेथे होतसे कथापठण ॥ तेथोनि पातके जाती पळोन ॥ सर्प गरुडासि देखोन ॥ पळती जेवि सर्वदा ॥७॥

विपत्तीतून सुटती समस्त ॥ द्रव्य होतए परिप्लुत ॥ शुभोदय तो देश होत ॥ ऐसा महिमा जियेचा ॥८॥

गूढ असे ही कथा अति ॥ स्कंदासि सांगे उमापती ॥ तेथेंचि सहज गोड मी ती ॥ श्रवण केली सादरे ॥९॥

तीच तुम्हांसि सांगतो कथा ॥ लक्ष्य लावा तुम्ही आता ॥ नास्तिकालाही सांगता ॥ फल काय तयासी ॥१०॥

सुज्ञ शैव की भागवत ॥ अथवा असती भक्तिवंत ॥ देता तयासी हे अमृत ॥ योग्य होय सर्वथा ॥११॥

अविद्येने झाकली कीर्ती ॥ अद्‍भुत ऐसेचि बोलती ॥ आत्मभूत भक्तांप्रती ॥ कथन आवडे विष्णूंचे ॥१२॥

नास्तिक अथवा जे दांभिक ॥ तार्किक अथवा विषयात्मक ॥ दिव्य कृष्णाकथानक ॥ अयोग्य तयांसी सर्वथा ॥१३॥

निमग्न असती भवसागरी ॥ संकटी शांति इच्छिती भारी ॥ मर्त्यास हे औषधापरी ॥ दिव्य कृष्णामहात्म्य ॥१४॥

सद्भक्तीने श्रवण करिती ॥ पापे तयांची दूर जाती ॥ अनात्मवाद बहु कांपती ॥ ठाव नाही म्हणोनि ॥१५॥

ऐसा दुर्बोध हा प्रभाव ॥ सांगेल जो का धरोनि भाव ॥ तोचि सुखाचा घेईल ठाव ॥ महिमा यापरी जाण पा ॥१६॥

कृष्णामहात्म्य जे जाणती ॥ दुःखे तयांची नष्ट होती ॥ जी का स्वप्नी असे भिती ॥ केवि ती होय जाग्रता ॥१७॥

कृष्णावेणास्मरणकृशानु ॥ पापवृक्ष करी दहनु ॥ ऋषींसि म्हणे ब्रह्मनंदनु ॥ ऐसे कृष्णामहात्म्य ॥१८॥

पूर्वी इंद्रादि सकळ देव ॥ हे चरित्र ऐकण्यास्तव ॥ गेले कैलासपर्वती शिव ॥ तेथे उमेसह बैसला ॥१९॥

सर्वालंकारभूषित ॥ सकल जगाचे जे दैवत ॥ जे का होते आसनस्थ ॥ नमन करिती तयासी ॥२०॥

जयजयाजी गंगाधरा ॥ कृपासागरा पार्वतीवरा ॥ नीलकंठा कर्पूरगौरा ॥ गजचर्मधरा महेशा ॥२१॥

पंचवदन त्रिशूलधर ॥ कांसे वेष्टिले व्याघ्रांबर ॥ शोभे ललाटी अर्ध चंद्र ॥ पिनाकपाणी दयाळा ॥२२॥

अंगी विराजे भस्मउटी ॥ देवाधिदेवा धूर्जटी ॥ रुंडमाळा घातली कंठी ॥ जटाजूटी नीर हे ॥२३॥

ऐसी करोनिया स्तुती ॥ पुढती साष्टांग नमन करिती ॥ बैसविले मग शिवानिकटी ॥ सर्वांप्रती कार्तिके ॥२४॥

केला पाहोनि तो गौरव ॥ संतुष्ट जाहले पार्वती शिव ॥ पाचारोनि स्कंदराव ॥ बैसविला निजांकी ॥२५॥

स्कंदे पाहोनि तातवदन ॥ वंदिले मातृपितृचरण ॥ कर जोडोनि नम्र वचन ॥ बोले स्तवोनि तयांसी ॥२६॥

म्हणे तुमचे भेटीची आस ॥ आहे आम्हांस सदा खास ॥ जरी निरंजनी तुझा वास ॥ तरी भक्तार्थ सगुण तू ॥२७॥

केले नृकपाल धारण ॥ भस्म सर्वांगी लेपन ॥ सदा स्मशानी राहणे करून ॥ भिक्षा मागणे नेहमी ॥२८॥

जो का भुजंगभूषण ॥ करी गजचर्म वेष्टन ॥ करिती जयाचे योगानुकरण ॥ सनकादिक मुनीही ॥२९॥

जया पाहिजे आत्मविज्ञान ॥ तेणे करावे हेचि ध्यान ॥ म्हणोनिया हे सदाचरण ॥ वागविलेसे मज गमे ॥३०॥

तरी प्रसन्न होवोनि देवा ॥ सुखवी सकल मनोभावा ॥ तूचि साक्षी सर्व जीवा ॥ सदाशिवा महेशा ॥३१॥

 ऐसे ऐकोनि स्कंदवचन ॥ संतोष पावले अमरगण ॥ भक्तिपूर्वक करोनि स्तवन ॥ करिती नमन आदरे ॥३२॥

म्हणे कार्तिक सनकादिकाला ॥ श्रवणी सादर देवमेळा ॥ झाला देखोनि मी पित्याला ॥ प्रश्न केला एक हो ॥३३॥

देवाधिदेवा इंदुशेखरा ॥ श्रीशंकरा कर्पूरगौरा ॥ कृपासागरा पंचवक्त्रा ॥ परिसा माझी विनंती ॥३४॥

पूर्वी समस्त ऋषी मिळोन ॥ करिती अगस्तीस जो प्रश्न ॥ की श्रीकृष्णाचरित्रकथन ॥ पुण्यपावन करी हो ॥३५॥

तोचि देवा तुजलागोनि ॥ प्रश्न करितो कर जोडोनि ॥ कृष्णाकथामृत माझिये कानी ॥ घाली दीनदयाळा ॥३६॥

हेचि तुझे मुख श्रवण ॥ करावे इच्छिती सर्व जन ॥ मीही होईन पंक्तिपावन ॥ शरणवत्सला महेशा ॥३७॥

ऐसे ऐकोनि ऋषि सकळी ॥ हर्षे पिटती गजरटाळी ॥ म्हणती धन्य चंद्रमौळी ॥ रत्‍न ऐसे प्रसवला ॥३८॥

ब्रह्मचारी जो निश्चित ॥ परोपकारी प्रतापवंत ॥ होती जयाचे दर्शने मुक्त ॥ प्राणी तो हा कार्तिक ॥३९॥

ऐसे परिसोनि मुनिवचन ॥ संतुष्ट झाला उमारमण ॥ प्रेमे स्कंदासि पोटी धरून ॥ म्हणे परिस बाळका ॥४०॥

जिचे चरित्र आपुले कानी ॥ पडावे ही इच्छा मनी ॥ धरिली तुवा ती मजपासूनि ॥ झाली उत्पन्न जाणिजे ॥४१॥

विष्णूने ही निर्माण केली ॥ तरी हरिहर एक बोली ॥ जैसा कापूर परिमळी ॥ भेद नसेचि सर्वथा ॥४२॥

कल्पारंभी कृष्णावेणी ॥ उत्पन्न झाली सर्व भुवनी ॥ हेतु असे पापशमनी ॥ हेचि जाण सर्वथा ॥४३॥

पातकांचे करी कर्षण ॥ म्हणोनि कृष्णा नामाभिधान ॥ गाती हरुषे भक्त जन ॥ पुण्यपावन नाम हे ॥४४॥

महानदी ही सुविख्यात ॥ इचे महात्म्य अति अद्‍भुत ॥ स्नाने दर्शने जीव मुक्त ॥ होती नरकस्थ जीवहि ॥४५॥

कृष्णावेणाकथामृत ॥ पढता निर्मळ होय चित्त ॥ श्रवणे कृतात भयाभीत ॥ होय निश्चये मुनीहो ॥४६॥

पुढिले अध्यायी कथा सुरस ॥ येईल कृष्णा भूतळास ॥ नारद म्हणे मुनिवरास ॥ परिसा चित्त देवोनि ॥४७॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ द्वितीयोऽध्याय गोड हा ॥४८॥

*॥इति श्रीस्कंदपुराणे रेवाखंडस्थ कृष्णामाहात्म्ये महात्म्यकथाप्रश्नोनाम द्वितीयोऽध्यायः ॥*
💥💥💥💥💥💥💥💥💥



*श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ३*
🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
*विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*श्रीगणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरूभ्यो नमः ॥ श्रीकृष्णायै नमः ॥*

कृष्णा घोर वडवानल ॥ जाळी पापाब्धि समूळ ॥ चित्त होतांचि निर्मळ ॥ दावी मौक्तिक भक्तांसि ॥१॥

विष्णुकृपेची साउली ॥ होता ब्रह्मकन्या जाहली ॥ भक्तजनांची माउली ॥ कृष्णावेणा सत्य पै ॥२॥

आता श्रोते व्हावे सावधान ॥ ऐका सिंहावलोकनेकरून ॥ कैसी कृष्णा आली जाण ॥ तेचि कथा सांगतो ॥३॥

कल्पारंभी कृष्णावेणा ॥ स्वर्गी असता देव जाणा ॥ नित्य करिती पूजना ॥ अनन्य भावेसि ॥४॥

तेव्हा सृष्टी पुण्यवंत ॥ लोक असती बुद्धिवंत ॥ पूर्ण होउनि आयुष्यवंत ॥ राहती समस्तही ॥५॥

जो जयासि पाहिजे अर्थ ॥ तो सिद्धीस असे जात ॥ सकळ लोक भक्तिमंत ॥ सदा वर्तती सत्कर्मी ॥६॥

ऐसे जाता काही दिवस ॥ कालस्वभावे पातकास ॥ होता अंतरी प्रवेश ॥ ऐक पुढती सांगेन ॥७॥

पापसंसर्गाची बुद्धि ॥ तिणेच नष्ट जाहली सिद्धि ॥ दोषांची जाहली वृद्धि ॥ झाल्या औषधी त्या ठायी ॥८॥

त्या साठी जनांच्या निर्वाहाकारण ॥ फलमूल औषधी जाण ॥ वनस्पती केल्या उत्पन्न ॥ व्हावे रक्षण म्हणूनि ॥९॥

औषधी जीवनाकारण ॥ मेघवृष्टि केली निर्माण ॥ धर्माधर्म व्यवस्थापन ॥ मन्वादिमुखे करीतसे ॥१०॥

ऐसे असता अवचित ॥ धर्मापासून उत्पन्न होत ॥ चतुर्वपु निश्चित ॥ धर्मरक्षणाकारणे ॥११॥

नर आणि नारायण ॥ तिसरे प्रभुत्व वेगळे जाण ॥ चवथा कृष्ण होऊन ॥ झाली काया संपूर्ण ॥१२॥

प्रजादुःखांचे परिमार्जन ॥ चिंतोनिया चौघेजण ॥ कृष्ण धाकुटा त्यालागून ॥ बोलती काय परिसा ते ॥१३॥

जाऊनिया ब्रह्मसदनी ॥ कृष्णा आणावी तेथोनि ॥ जी का असे सुखदायिनी ॥ सर्व लोकांसि निश्चये ॥१४॥

आणिक सांगावे ब्रह्मयासि ॥ तीर्थे कल्पावी भूमीसि ॥ यापरी बोलूनि कृष्णासि ॥ होती स्वस्थ त्रिवर्ग ॥१५॥

रुकार देऊनी तिघांजणा ॥ सवेंचि गेला ब्रह्मसदना ॥ देखोनि कृष्ण चतुरानना ॥ निरोप कथी तयासि ॥१६॥

ऐकोनिया कृष्णवचन ॥ तात्काळ तोषला भारतीरमण ॥ करूनि कृष्णा कृष्णाधीन ॥ आपणही निघाला ॥१७॥

तैसेचि विष्णु आणि शंकर ॥ इंद्रादिदेव ऋषीश्वर ॥ करीत वाद्यांचा गजर ॥ तिजमागूनि चालले ॥१८॥

आनंदे बहु गर्जना करीत ॥ जय कृष्णे जय कृष्णे उच्चारित ॥ कोठे करावी स्थापित ॥ ऐसे बोलती एकमेका ॥१९॥

प्रवास करिता मार्गात ॥ ऋषि देखिला आसनस्थ ॥ त्यासि विचारिती त्वरित ॥ कवण तुम्ही ऋषिवर्या ॥२०॥

काय इच्छिसी मानसी ॥ प्रसन्न होउनी कृष्णा तुसी ॥ देईल सत्वर मग इजसी ॥ दैव उदेले तुझे बा ॥२१॥

देवीच्या आगमोत्सवार्थ ॥ जे जे असेल अभीप्सित ॥ ते ते मिळेल त्वरित ॥ शंका नाणी किमपही ॥२२॥

ऐसे ऐकोनिया वचन ॥ संतुष्ट जाहले ऋषिमन ॥ करसंपुट जोडून ॥ घाली लोटांगण भूमीसी ॥२३॥

उभा ठेला मग भूवरी ॥ म्हणे मी सह्यगिरी ॥ कृष्णा पूजावी अंतरी ॥ हेतू धरोनी बैसलो ॥२४॥

साक्षाद्विष्णुमयी कृष्णा ॥ व्हावी मजपासाव उत्पन्ना ॥ जिच्या पुण्यजलाने स्नाना ॥ करिता धन्य होईन ॥२५॥

तीर्थमातेच्या कृपेने ॥ जगी राहीन धन्यपणे ॥ ऐकोनि ऐशी उभयवचने ॥ तुष्ट झाली महानदी ॥२६॥

भक्तवत्सल श्यामकांती ॥ प्रसन्नवदना कृष्णामूर्ति ॥ बोलती झाली पर्वताप्रति ॥ तथास्तु ऐसे त्रिवार ॥२७॥

मी तुजपासून होते उत्पन्न ॥ याचि कारणे तव सुता जाण ॥ सह्यजा हे नामाभिधान ॥ विश्रुत होय भूमंडळी ॥२८॥

जैसा विष्णु भक्तवत्सल ॥ तैसेचि देवीचे शब्द कोमल ॥ ऐकोनि करिती देव नवल ॥ धन्य गिरी म्हणोनी ॥२९॥

देवासहित श्रीकृष्णा ॥ जाई आपुले सुस्थाना ॥ तैसाचि निघे पर्वतराणा ॥ नरनारायणासहित ॥३०॥

 सिद्ध आणि विद्याधर ॥ सर्प आणि किन्नर ॥ गिरिवरी पातले सत्वर ॥ चवदा भुवने दाटली ॥३१॥

श्रीकृष्णामहोत्सवार्थ ॥ पित्रर्षिदेव समस्त ॥ स्तुति करिती अनवरत ॥ महानंदे करोनि ॥३२॥

कृतार्थ होईल सर्व लोक ॥ कामधेनूही इष्टदयक ॥ आली भूमंडळी नाक ॥ सोडूनिया सत्य पै ॥३३॥

एकवार मिळे कृष्णाजल ॥ तरी सुधा व्यर्थ केवल ॥ हव्यकव्ये आम्ही सकल ॥ तुष्ट होऊ तर्पिता ॥३४॥

सर्व अशुभांचे करी हरण ॥ ऐसा कृष्णाप्रवाह जाण ॥ तेथील जन भाग्यवान ॥ देश होय पुनीत ॥३५॥

कृष्णाप्रवाह जाय जेथोनि ॥ तीच पुण्य क्षेत्रमेदिनी ॥ निरय सोडिले पूर्वजगणी ॥ कृष्णावास होताचि ॥३६॥

होता कृष्णातटी वास ॥ पापे धुंडिती आश्रयास ॥ सकळ लोकांस स्वर्गास ॥ सोपान झाली जावया ॥३७॥

ऐसे नानापरी स्तवन ॥ करिता भोळे भाविक जन ॥ देव करिती पुष्पवर्षण ॥ संतोष होई सर्वांसी ॥३८॥

ऐसा सोहळा पाहूनि नयनी ॥ सह्य आनंदला मनी ॥ पूजासाहित्य करि घेऊनी ॥ करी पूजन कृष्णेचे ॥३९॥

तधी तोषून जनार्दन ॥ सह्यासि बोले गर्जोन ॥ म्हणे मी अश्वत्थ होऊन ॥ वास करीन ये स्थळी ॥४०॥

कृष्णा माझी तनु जाण ॥ निघेल अश्वत्थमुळापासून ॥ ऐसे बोलूनि जगज्जीवन ॥ अश्वत्थ होवोनि राहिला ॥४१॥

श्वेताश्वत्थमुळापासून ॥ तात्काळ जाहले कृष्णाजनन ॥ प्रवाहरूप सनातन ॥ पुर्वगामी जाहले ॥४२॥

कृष्णेचा ओघ पाहता नयनी ॥ जय जय केला सर्व ऋषींनी ॥ आनंदे टाळिया पिटोनी ॥ नाचो लागले सर्वही ॥४३॥

वाद्यांचा होतसे गजर ॥ दुंदुभिनादे कोंदले अंबर ॥ सुरवर वर्षती सुमनभार ॥ आल्हाद घन दाटला ॥४४॥

सकल देव मुनिवर ॥ करोनि कृष्णेस नमस्कार ॥ गेले स्वधामी सपरिकर ॥ जय जय कृष्णे करीत ॥४५॥

नारद म्हणे ऋषींसी ॥ कृष्णा आली भूमीसी ॥ तई अधर्मीदिकांसी ॥ थारा कोठे मिळेना ॥४६॥

पापे पळती देशातून ॥ कोठे न मिळे तया स्थान ॥ सर्व लोक पुण्यवान ॥ करिती भजन कृष्णेचे ॥४७॥

राक्षस होऊनि भयाभीत ॥ तेहि वेगे पळोनि जात ॥ परि मनी असे हेत ॥ कृष्णा मुक्त करील ॥४८॥

शुभ्रवर्ण वाहे सलिल ॥ ऐशी कृष्णा पुण्यशील ॥ दर्शने प्राणी तात्काल ॥ सायुज्यपदा पावती ॥४९॥

तिच्या आश्रये स्थळोस्थळी ॥ तीर्थे वसती पावलोपावली ॥ त्यांसि घेवोनि खेळीमेळी ॥ समुद्रांतरी प्रवेशे ॥५०॥

जैशी ऋग्वेदसंहिता ॥ तैशीच असे कृष्णा माता ॥ सूक्ता म्हणावे सर्व तीर्था ॥ पापमुक्त कराया ॥५१॥

स्कंदासि सांगे उमारमण ॥ ऐसे कृष्णेचे महिमान ॥ कथियेले मी संक्षेपून ॥ विस्तार करी तू आता ॥५२॥

जगाच्या हिताकारणे ॥ करावी महात्म्यकथने ॥ मुनींसि मत्प्रसादाने ॥ तीर्थे तुवा त्यापरी ॥५३॥

श्रवण करूनि तातवचन ॥ स्कंदे केले साष्टांग नमन ॥ गेला तो ऋषीस घेऊन ॥ स्वस्थानासी तात्काळ ॥५४॥

सह्यापासाव सागरावधी ॥ तीर्थे असती जी मधी ॥ तया ऐके ऋषीची मांदी ॥ स्कंदमुखेकरूनी ॥५५॥

नारद म्हणे मुनिपुंगवा ॥ ऐका महिमा तो आघवा ॥ नमन करूनि स्कंददेवा ॥ तुम्हांप्रती सांगतो ॥५६॥

पुढले अध्यायी तीर्थमहिमा ॥ नारद सांगेल वायंचमा ॥ श्रवण करिता सर्व कामां ॥ कृष्णाबाई पुरवील ॥५७॥

कृष्णानदीचे आगमन ॥ अत्यादरे करिता श्रवण ॥ दीर्घायुष्य ऐश्वर्य धनर ॥ आरोग्य मिळे सर्वदा ॥५८॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ पाहता चाखोनि रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ तृतीयोऽध्याय वर्णिला ॥५९॥
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂


*श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ४*
🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁
*विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.*
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
*श्रीगणेशाय नमः ॥*

जे का कृष्णातरंगिणी ॥ निशिदिनी धरिती अंतःकरणी ॥ तेचि देखती मोक्षसरणी ॥ ब्रह्मसदनी जावया ॥१॥

ऐकावया तीर्थे थोरी ॥ सादर देखोनी तयावरी ॥ कृष्णा स्मरोनि ह्रदयांतरी ॥ ब्रह्मनंदन बोलत ॥२॥

सह्याद्रीचे उत्तरेसी ॥ ब्रह्मगिरी नामे श्रृंगेसी ॥ जेथे तपोनी विष्णुपदासी ॥ मेळविले विधीने ॥३॥

तयाचे दक्षिण अंगावरी ॥ नामे असे वेदगिरी ॥ वेद वसती जयावरी ॥ अंगेसहित साक्षात ॥४॥

उभयगिरींचे मध्ये एक ॥ महातीर्थ असे आमलक ॥ जेथे देवचि सकळिक ॥ वृक्ष आमलक पहाती ॥५॥

आमलकी वृक्षाचे पदी ॥ वेणानाम महानदी ॥ तेथेचि कृष्णा अश्वत्थपदी ॥ उदयासि पावत ॥६॥

कृष्णाप्रवाह जेथोनि होत ॥ ते स्थली असे विष्णुतीर्थ ॥ तेथे जो स्नान करीत ॥ विष्णुरूप होतसे ॥७॥

अमावास्येसी गुरुवासरी ॥ करी दर्शन निर्धारी ॥ रुद्र विरिंची तयावरी ॥ कृपा करी जाण पा ॥८॥

रिघे वेणाप्रवाह तेथोन ॥ जो का सिद्धांचे साधन ॥ कृष्णावेणा हे अभिधान ॥ याचि कारणे पडियेले ॥९॥

जगाची व्हावया शांती ॥ ब्रह्मे केली कृष्णोत्पत्ती ॥ शेष होय कुंठितगती ॥ अगम्य महिमा जियेचा ॥१०॥

वेणा कृष्णेसी मिळाली ॥ म्हणोनि महत्वासि लाधली ॥ ककुद्मतीही धन्य झाली ॥ कृष्णामाउलीसंगमे ॥११॥

वारुणीमंत्र जपता तेथ ॥ की गायत्री अष्टशत ॥ निरसोनी जाती पापे समस्त ॥ संगममहिमा ऐसा हा ॥१२॥

मिळावया कृष्णेस ॥ सत्या येता एक राक्षस ॥ शिला होऊन अति धाडस ॥ आड आला तियेसी ॥१३॥

सत्या भयंकर धारांनी ॥ पाठवी तया यमसदनी ॥ कृष्णेसी मिळे येवोनी ॥ विहंगतीर्थ तेच पै ॥१४॥

जेथे विहंगम करिता स्नान ॥ पावता झाला वैकुंठभुवन ॥ ऐसे अनिर्वाच्य पुण्यपावन ॥ विहंगतीर्थ बोलती ॥१५॥

जेथे एक स्वयंभूस्थान ॥ शंभूचे असे पुरातन ॥ तेणे त्या तीर्थाचे महिमान ॥ अधिकाधिक होतसे ॥१६॥

पुढे वाहता कृष्णा ऐसी ॥ वेदनद करी संग तिशी ॥ जो का निघाला उत्तरेसी ॥ वेदगिरीच्या ॥१७॥

जेथे कृष्णावेदसंग ॥ तेथे असे धूर्जटिलिंग ॥ जयाचेनि दर्शने चतुर्वर्ग ॥ फल भर्गकृपेने ॥१८॥

तेथुनि काही अंतरावर ॥ रुद्रतीर्थ मनोहर ॥ जेथे गोकर्णऋषीश्वर ॥ तपे मोक्ष पावला ॥१९॥

यापरी नारदोक्ति परिसोन ॥ ऋषि म्हणती गोकर्ण कवण ॥ काय केले तपाचरण ॥ ऐकू श्रवण इच्छिती ॥२०॥

ऐकोनि ऋषींचे वचन ॥ बोलता झाला ब्रह्मनंदन ॥ भारद्वाजकुलोत्पन्न ॥ ज्ञानसंपन्न धार्मिक ॥२१॥

मानापमानाची नसे वसती ॥ अखंड राहे उदासवृत्ती ॥ ह्रदयी आठवोनी गिरिजापती ॥ समाधान चित्ती निरंतर ॥२२॥

ब्रह्मचारी परोपकारी ॥ अखंड वास कृष्णातीरी ॥ निरापेक्ष सदाचारी ॥ अर्चन करी शिवाचे ॥२३॥

ऐसा गोकर्णभाव निर्मळ ॥ पाहोनि प्रसन्न जाश्वनीळ ॥ बोले माग वर दुर्मिळ ॥ इंद्रादि सकल देवां जो ॥२४॥

ऐकोनि शिवाचे वचन ॥ गोकर्ण बोले कर जोडून ॥ सदा होवो तुझे स्मरण ॥ कपालभूषण गिरीश ॥२५॥

श्लोक ॥ ॐनमो भवाय रुद्राय शर्वाय पशुपाय च ॥ उग्राय महते नित्यं भीमाय शंभवे नमः ॥२६॥

ऐसे हे मंत्राष्टक ॥ प्रणवादि नमोन्तक ॥ जपे तया इष्टदायक ॥ व्हावे पिनाकपाणी गा ॥२७॥

ज्या नारी पुत्रहीन ॥ की असती पतिवाचून ॥ करिता गोकर्णतीर्थस्नान ॥ शीघ्र पावन होती पै ॥२८॥

माझे नामे लिंगमूर्ति ॥ सदा असावे पशुपति ॥ ऐशी पुरवी माझी आर्ती ॥ आश्रमे वसती करून ॥२९॥

स्नान करूनि गोकर्णी ॥ पितर तुष्टती पिंडदानी ॥ ऐसे करी तुझे चरणी ॥ एवढी मागणी दयाळा ॥३०॥

 संतोषोनि गौरीरमण ॥ ह्रदयी आलिंगी तपोधन ॥ म्हणे मागीतले जे वरदान ॥ दिधले जाण निश्चये ॥३१॥

ऐसे बोलोनि गोकर्णमुनी ॥ पुष्पके नेला कैलासभुवनी ॥ नारद म्हणे ऋषीलागोनि ॥ ऐसे गोकर्णमहात्म्य ॥३२॥

गंगाद्वाराचे निकटी ॥ कृष्णानदी दक्षिणतटी ॥ चार सहस्त्र धनुष्कोटी ॥ गिरीपासाव गोकर्ण ॥३३॥

हे कुष्णागोकर्णाख्यान ॥ जो करी सकाळी नित्य पठण ॥ त्यासी शिवाचे संनिधान ॥ सायुज्य सदन मिळतसे ॥३४॥

पुढले अध्यायी कथा विशद ॥ गणिकातीर्थ बहु पुण्यद ॥ सांगेल मुनीसी नारद ॥ महाप्रसाद कृष्णेचा ॥३५॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ पाहता चाखोनि रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ चतुर्थोऽध्याय वर्णिला ॥३६॥

*॥इति श्रीस्कंदपुराणे रेवाखंडस्थ कृष्णामाहात्म्ये गोकर्णतीर्थवर्णनं नाम चतुर्थोऽध्यायः ॥४॥*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
क्रमशः

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ५*
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
*विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.*
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
*श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥*

जय जय कृष्णा माउली ॥ भक्तबाळा कृपासाउली ॥ करोनिया निजपाउली ॥ संकट काळी अहर्निशी ॥१॥

सुकृत लाधता जिचे चरण ॥ काळही बांधू न शके जाण ॥ तात्काल चुके जन्ममरण ॥ ऐसे महिमान अगाध ॥२॥

मागील अध्यायी तीर्थ गोकर्ण ॥ सांगीतले पुण्य पावन ॥ आता श्रोते सावधान ॥ सादर कर्ण असावे ॥३॥

आणोनिया कृष्णा ध्यानी ॥ नारद बैसे निजआसनी ॥ आरंभ करीतसे झणी ॥ महात्म्यवर्णन करावया ॥४॥

श्रीकृष्णेच्या दक्षिणतीरी ॥ गोकर्ण तीर्थाचे पासारी ॥ सहा हजार धनुष्यांवरी ॥ गणिका नाम विख्यात ॥५॥

जरी पातकी असे महान ॥ अनाचारी अतिदारुण ॥ सर्व पापक्षयकारण ॥ तीर्थ जाण निश्चये ॥६॥

एकदा नरनारायण ॥ ब्रह्मयाचे मानसनंदन ॥ पितयासि करूनि वंदन ॥ कृष्णादर्शना निघाले ॥७॥

घेवोनि कमंडलू हाती ॥ बंधु दोघे मार्ग चालती ॥ रम्य स्थळे पाहूनि अमिती ॥ कृष्णातटाकी पातले ॥८॥

कमंडलू ठेविता अवनी ॥ प्रवाह निघे तेथोनि ॥ मिळता कृष्णेसी येवोनी ॥ पावे अभिधान कमंडली ॥९॥

मानसपुत्र निष्पाप ॥ करोनि तया संगमी तप ॥ सिद्धि जोडती अमूप ॥ काळ अल्प होतांचि ॥१०॥

हा तीर्थमहिमा अद्‍भुत ॥ लोकत्रयांमाजि विश्रुत ॥ क्षालन करी पाप त्वरित ॥ नारद सांगत ऋषींसी ॥११॥

गौतमनामे एक मुनि ॥ तेजे जैसा मध्यान्हतरणी ॥ पूज्यता असे वृद्धजनी ॥ महाज्ञानी कुलवंत ॥१२॥

घरी धनधान्यसमृद्धि ॥ दासी ज्याच्या अष्टसिद्धि ॥ बृहस्पतिसारखी बुद्धि ॥ ऐसा थोर ऋषीश्वर ॥१३॥

वेदशास्त्री असे संपन्न ॥ अध्यात्मविद्येमाजी प्रवीण ॥ सदा करी शिवार्चन ॥ अतिथी पूजा विशेषे ॥१४॥

स्वये असे वृद्ध आपण ॥ भार्या रूपवती तरूण ॥ सिंहोदरी हे अभिधान ॥ यथार्थ जाण तियेसी ॥१५॥

जैशी सिंही निजपतीस ॥ तैशी भार्या गौतमास ॥ प्रिय अत्यंत सहवास ॥ उभयतांस जाहला ॥१६॥

प्रार्थी पतीस वारंवार ॥ भोग देई गा सत्वर ॥ आयुष्य असे क्षणभंगुर ॥ तृप्त करी मन माझे ॥१७॥

पुष्पासम माझी काया ॥ योग्य असे रतिसुखा य ॥ आधी शमवावे इंद्रिया ॥ मग लागे तपास ॥१८॥

ऐशी वारंवार प्रार्थना ॥ पतीस करी ती ललना ॥ परि विषयेच्छा नये मना ॥ दुष्टता पाहोन काळाची ॥१९॥

भार्या म्हणे पतिलागून ॥ पोटी नसता पुत्रसंतान ॥ कदा न मिळे स्वर्गभुवन ॥ माझे वचन सत्य पै ॥२०॥

ऐसे ऐकोनि ऋषिवर ॥ होवोनि गेला चिंतातुर ॥ कुसंततीचे भय अपार ॥ फिरू लागले अंतरी ॥२१॥

अस्तासि जाता नारायण ॥ प्रियेशी झाला रममाण ॥ दैवे लाधली गर्भधारण ॥ नारद म्हणे ऋषीसी ॥२२॥

ऐसे नवमास भरल्यावरी ॥ प्रसूत जाहली सुंदरी ॥ पुत्रमुख पाहता अंतरी ॥ सुखावली अत्यंत ॥२३॥

येवोनिया गर्गमुनि ॥ जातक करिता बोले वाणि ॥ अहो ऐस अपुत्र होवोनि ॥ काय लाधले तुम्हांसी ॥२४॥

सुदामा नामे पापी फार ॥ पितृवंशा भयंकर ॥ करील ब्राह्मणसंहार ॥ मातृगामी निश्चये ॥२५॥

निमग्न राहील सुरापानी ॥ कुल टाकील उच्छेदोनि ॥ काळ घालविल दुराचरणी ॥ शांति करी यास्तव ॥२६॥

ऐसे ऐकोनि गर्गवचन ॥ होवोनि पडला मूर्च्छायमान ॥ भार्येसी करी निर्भर्त्सन ॥ क्रोधायमान होवोनि ॥२७॥

पुत्र नसेल ज्याचे घरी ॥ अरण्य नाही त्यासी दुरी ॥ मूर्ख पुत्र येता उदरी ॥ नाही अंतर किमपही ॥२८॥

दुर्वृत्त होती पुत्र ज्यास ॥ विमुख दवडी अतिथीस ॥ धर्मभक्तीचा सदा आळस ॥ नाही अंतर किमपिही ॥२९॥

अग्निहोत्र नसे जया घरी ॥ कधी न जो श्राद्ध करी ॥ भार्येने जिंकिल्यावरी ॥ नाही अंतर किमपिही ॥३०॥

 उल्लंघी जो पितृवचन ॥ दुराचारी असे आपण ॥ धिक् तयाचे होय जिण ॥ नाही अंतर किमपिही ॥३१॥

भार्येचे पहोनि वदन ॥ रडो लागला आक्रंदोन ॥ ह्रदय तत्क्षणी गेले फुटोन ॥ पावला निधन झडकरी ॥३२॥

तयाची ती तरुणी भार्या ॥ मदे विव्हल तिची काया ॥ पतिप्रेत सोडोनिया ॥ बाळ टाकोनि गेली पै ॥३३॥

तरुणी रूपसंपन्ना ॥ सिंहकटी सुलोचना ॥ भोगीतसे पुरुष नाना ॥ दुराचारे वर्तत ॥३४॥

नाम पावोनि कामसेना ॥कान्यकुब्जी ती अंगना व राहोनि मेळवी बहु धना ॥ तरुन पुरुष भोगोनि ॥३५॥

आरक्त वस्त्र परिधान ॥ करी शुभ्र गंधलेपन ॥ माणीकमोत्यांचे आभरण ॥ लेईतसे अंगावरी ॥३६॥

बैसे सुवर्णपलंगावर ॥ वारांगनाही सेविती फार ॥ गळा जिचे पुष्पहार ॥ जैसी अप्सरा नंदनी ॥३७॥

ऐशी चतुर्दश वर्षे जाण ॥ गेली सदा उल्लास मन ॥ इकडे पुत्र पापप्रवीण ॥ उत्तरोत्तर वाढला ॥३८॥

नित्य सुदामा बंध तोडून ॥ द्यूतक्रीडेत निमग्न ॥ कोणी केल्या निवारण ॥ वचन तयांचे न मानी ॥३९॥

अखंड राहे मद्य प्राशित ॥ कुलधर्मादि सोडूनि देत ॥ पापे भरले सदा चित्त ॥ व्यसनाधीन जाहला ॥४०॥

चोरांची धरुनि संगत ॥ मार्गस्थांचे सर्वस्व हरित ॥ ब्रह्महत्या असंख्य करित ॥ महापापी सुदामा ॥४१॥

द्रव्याची करुनी वाटणी ॥ सर्वही जात निजभुवनी ॥ तोही कान्यकुब्जा जावोनि ॥ कामलंपट जाहला ॥४२॥

कामसेनेवर बैसले मन ॥ बहु देई तिजला धन ॥ तू कोण आलीस कोठून ॥ ऐसे विचारी तिजलागी ॥४३॥

ऐकोनि सुदाम्याच्या प्रश्ना ॥ हासोनि बोले कामसेना ॥ सत्य सांगतसे खुणा ॥ ऐकोनि घेई समग्र ॥४४॥

गौतम नामे माझा पति ॥ वृद्ध धार्मिक विप्रजाती ॥ मज न देई कदा रति ॥ तरुण होते जरी मी ॥४५॥

निर्भर्त्सना केली फार ॥ तेणे रममाण मजबरोबर ॥ संध्याकालाचा न करी विचार ॥ झाला गर्भ मजलागी ॥४६॥

मी प्रसूत झाल्यावर ॥ पति होवोनि शोकपर ॥ मरण आले त्यास सत्वर ॥ ऐकोनि जातक पुत्राचे ॥४७॥

गृह पुत्र आणि मृत पति ॥ सोडोनि त्यांची संगति ॥ विषयासक्ति धरोनि चित्ती ॥ परदेश मी स्वीकारिला ॥४८॥

ऐसे बोलता बोलता जाणा ॥ साद्यंत सांगीतले वर्तना ॥ ऐकता सुदाम्याच्या मना ॥ अवघ्या खुणा बाणल्या ॥४९॥

पश्चात्ताप होवोनि अंतरी ॥ मस्तक आपटिला खांबावरी ॥ दीर्घस्वरे रुदन करी ॥ म्हणे दुराचारी जन्मलो ॥५०॥

ब्रह्मघातकी सुरापानी ॥ विश्वासघातकी पापखाणी ॥ चांडाळ मी मातृगमनी ॥ कैचा आता तरेन ॥५१॥

ऐसा नाना विलाप करी ॥ अंग आपटी धरणीवरी ॥ मग येवोनि शुद्धीवरी ॥ झाला फार लज्जित ॥५२॥

ओळखोनि पुत्र आपला ॥ लज्जा उत्पन्न झाली तिला ॥ आठवोनि स्वकर्माला ॥ अनुताप थोर करीतसे ॥५३॥

कैची मी ब्रह्मभार्या ॥ की धर्मपत्‍नी पुत्रभोग्या ॥ की जाहले वारमुख्या ॥ काय नवल जाहले ॥५४॥

सांडोनि आपला निजधर्म ॥ आचरिले मी कुकर्म ॥ महापातकांचा संगम ॥ तेणे घडे मजलागी ॥५५॥

ऐसे धिक्कारोनि सोडिले घर ॥ द्रव्य टाकूनि अपार ॥ अरण्यात रिघाली सत्वर ॥ निश्चय करूनि मरणाचा ॥५६॥

ती निघाली पाहुन ॥ सुदामाही विरक्त होऊन ॥ सवेंचि करीतसे गमन ॥ घोर वनी जावया ॥५७॥

पुढे माता मागे सुत ॥ हळू हळू मार्ग क्रमित ॥ तव पुढे अकस्मात ॥ देवल ऋषि भेटला ॥५८॥

ऋषि पुसे तयालागून ॥ तुम्ही कोठील अहा कवण ॥ चिंतीतसा का मरण ॥ दुःखे उद्विग्न दीसता ॥५९॥

चिंतातुरास चिंतामणि ॥ तैसा भेटे देवलमुनि ॥ की अंधासी वासरमणि ॥ ज्ञानदीप उगवला ॥६०॥

दोघे होवोनि सद्‍गदित ॥ सांगते झाले स्वचरित ॥ ऐकोनि त्यांची ही मात ॥ कृपा ऋषीस उपजली ॥६१॥

संतोषोनि बोले ऋषि वचन ॥ तुम्ही करावे कृष्णासेवन ॥ तेणे सकळ दोषदहन ॥ होईल जाणा निश्चये ॥६२॥

ऐसे ऐकोनि ऋषीसी ॥ म्हणे कृष्णा कवण देशी ॥ आम्हा पाप्या प्राप्त कैशी ॥ सांग सत्वर दयाळा ॥६३॥

परिसोनिया उभयवाणी ॥ कृष्णा नमोनि अंतःकरणी ॥ सांगे दोघा देवलमुनि ॥ कृष्णाचरित्र अगाध ॥६४॥

पूर्वेस सह्याद्रिपर्वत ॥ विख्यात असे भूमंडळात ॥ कृष्णाबाई तेथोनि निघत ॥ साक्षात तनू विष्णुची ॥६५॥

सर्व देवतांची माता ॥ जी का सर्वोपनिषदगाथा ॥ पावन करी शरणागता ॥ ऐसे महात्म्य कृष्णेचे ॥६६॥

नरनारायणाश्रमु ॥ जेथे ब्रह्मनदी संगमू ॥ तेथ माघशत स्नानु ॥ करिता पुनीत तात्काळ ॥६७॥

ऐकोनि देवलांचे वचन ॥ दोघी केले साष्टांग नमन ॥ ऋषिचा निरोप घेवोन ॥ सह्याद्रीसी पातले ॥६८॥

नारायणाश्रमी श्रीकृष्णा ॥ घेवोनि जियेच्या दर्शना ॥ रोमांचित तनु कंपायमाना ॥ अष्टभावे दाटले ॥६९॥

म्हणती जयजया अघनाशिनी ॥ कृष्णाबाई जगन्मोहिनी ॥ सद्‍गति आम्हांलागोनि ॥ द्यावी जगन्माते हो ॥७०॥

 ऐशी करोनि प्रार्थना ॥ करोनि संगमी स्नाना ॥ वाटे करावे वसतिस्थाना ॥ नारायणाश्रमी तो ॥७१॥

अकस्मात देखोनि ऋषिवर ॥ लज्जेने कोंदले अंतर ॥ कृष्णादक्षिणतीरावर ॥ वास करिती उभयता ॥७२॥

त्रिकाळ करोनिया स्नान ॥ निराहारी शुद्ध मन ॥ केले असे प्रायोपवेशन ॥ मरणालागी निर्धारे ॥७३॥

नंदी पाहोनि गणिकेसी ॥ बोले मग भाषा ऐसी ॥ काय इच्छा असे तुजसी ॥ मज सांगे सत्वर ॥७४॥

हांसोनि बोले तया वचन ॥ कोठे असे रे उमारमण ॥ करीन दुःखनिवेदन ॥ तयालागी कृपाळा ॥७५॥

प्रसाद होता जयाचा ॥ संहार होईल दुःखांचा ॥ म्हणोनि धावा करितसे त्याचा ॥ तुझेनि नोहे ते काही ॥७६॥

ऐसे ऐकता हासोन ॥ जावोनि शिवा करी कथन ॥ म्हणे भक्ता तूचि शरण ॥ कृपासागरा पशुपति ॥७७॥

गणिकेसी होवोनि प्रसन्न ॥ तिचे करावे उद्धारण ॥ ऐसे ऐकोनि नंदीवचन ॥ दर्शन द्यावया निघाला ॥७८॥

गणिकेसमीप येवोनि ॥ तीस बोले हो कल्याणि ॥ वससी का खिन्न मनी ॥ कृष्णानदीतीरी हो ॥७९॥

ऊर्ध्वरेत मुनींचे तपोबळ ॥ की द्वादशाब्द तपांचे फळ ॥ प्राप्त होई ते सकळ ॥ केवळ कृष्णासेवने ॥८०॥

आजन्म ब्रह्मचर्यव्रते ॥ कलीमाजी जे मिळते ॥ ते कृष्णासेवने होते ॥ प्राप्त तियेचे सेवका ॥८१॥

तपे झालीस निर्दोष ॥ अपेक्षित जे मानस ॥ ते तू मागे सावकाश ॥ पुण्यश्लोके कल्याणि ॥८२॥

अभय ऐकोनि गणिका ॥ नमस्कारी गौरिनायका ॥ माझे भाषण हे ऐका ॥ बोलती झाली शिवासी ॥८३॥

देव देव जगन्नाथ ॥ जे मी केले दुष्कृत ॥ ते तुज असे की विदित ॥ पुनरुच्चार कासया ॥८४॥

तू जरी प्रसन्न होशी ॥ माझे मागणे एक तुजशी ॥ जे मूळ असे पापाशी ॥ छेदन करी झडकरी ॥८५॥

निष्पाप झाले ही खूण ॥ नाम माझे स्वये धरून ॥ या स्थळी वास करोनि ॥ राहे देवा महेशा ॥८६॥

हेचि देणे मज द्यावे ॥ या तीर्थास गणिका म्हणावे ॥ स्नान करिता सद्‌गति पावे ॥ माघमाशी महेशा ॥८७॥

ब्रह्मघ्न असो की सुरापानी ॥ जो का रत मातृगमनी ॥ गुरुतल्पग परस्त्रीगमनी ॥ होवो मुक्त महेशा ॥८८॥

विध्युक्त करिता पिंडदान ॥ पितरा मिळो सायुज्यसदन ॥ ब्राह्मण देता हिरण्यदान ॥ पावो सद्‌गति महेशा ॥८९॥

देवाधिदेवा भवनाशना ॥ जाळी समूळ हे वासना ॥ न विसंबो तुझे चरणा ॥ हेचि प्रार्थना महेशा ॥९०॥

ऐकोनि हे गणिकावाणि ॥ तथास्तु म्हणे पिनाकपाणी ॥ तिजला बैसवोनि विमानि ॥ नेली तात्काळ कैलासी ॥९१॥

गणिका जेथ झाली मुक्त ॥ तेचि झाले गणिकातीर्थ ॥ तेथोनि आठ सहस्त्र हस्त ॥ नारायणआश्रम ॥९२॥

आरूढोनि नंदीवरी ॥ गेला स्वधामी अंधकारी ॥ काय वदू कृष्णाथोरी ॥ नारद म्हणे ऋषीसी ॥९३॥

गणिकाख्यान परम अद्‌भुत ॥ ऐकता पापे दग्ध होती ॥ पूर्ण होती मनोरथ ॥ कृष्णाप्रसादे निश्चये ॥९४॥

पुढिले अध्यायी मनोहर ॥ कथा ऐकावी सादर ॥ तुष्ट होईल सिद्धेश्वर ॥ भक्तकामकल्पतरू ॥९५॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ पाहता चाखोनि रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ पंचमोऽध्याय वर्णिला ॥९६॥

*॥इति श्रीस्कंदपुराणे कृष्णामाहात्म्ये गणिकातीर्थवर्णनं नाम पंचमोऽध्यायः ॥५॥*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

*क्रमशः
*अनंत देव वाई।15/01/2017.*
🌷🌿🍄🙏🏼🙏🏼🙏🏼🍄🌿🌷

*श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ६*
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷
*विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.*
🍄🌻🍄🌻🍄🌻🍄🌻🍄

*श्रीगणेशाय नमः ॥*

कृष्णादिवाकर उगवता ॥ अज्ञानतम नाशी तत्त्वता ॥ सवेंचि ब्रह्म प्रकाशता ॥ संदेह काही उरेना ॥१॥

स्कंद म्हणे ऋषींप्रती ॥ आता सिंहावलोकने चित्ती ॥ देखा कृष्णामंडली सांगती ॥ तेचि ऋषितीर्थ जाहले ॥२॥

नरनारायण जेथ ॥ सिद्ध गंधर्व अग्निष्वात्त ॥ महोरग ब्रह्मर्षि मूर्तिमंत ॥ जया ठायी राहती ॥३॥

संगमाचे उत्तरतटी ॥ ऋषितीर्थ असे विख्याती ॥ पितृतीर्थ दक्षिणप्रांती ॥ देवतीर्थ पूर्वेसी ॥४॥

देवतीर्थी सिद्धेश्वर ॥ वसे धौम्य ऋषीश्वर ॥ स्नान करोनि सुदामा भूसुर ॥ धूतपाप जाहला ॥५॥

म्हणूनि धूतपाप बोलिजे ॥ संगमापासूनि कोस जे ॥ यथार्थ नाम जया साजे ॥ स्कंद म्हणे ऋषींसी ॥६॥

पितृतीर्थी स्नान करिता ॥ तिले पितरांसी तर्पिता ॥ अखंड जोडे पुण्य तत्त्वता ॥ काय वर्णू ऋषी हो ॥७॥

तेथे जो श्राद्ध करील ॥ पिंड सातूचे देईल ॥ स्वगोत्रवर्धन करील ॥ हिरण्यदाने निश्चये ॥८॥

मिष्टान्ने पितृश्राद्ध करी ॥ नारायणाश्रमी जरी ॥ घृत मधुक्षीर वारी ॥ अखंड मिळे पितरांसी ॥९॥

संगमाचे उत्तरेसी ॥ स्नान करुनि ऋषींसी ॥ तृप्त करी यवान्नासी ॥ अखंड लाधे समृद्धि ॥१०॥

जे का नरनारायणासी ॥ देती तिलयुक्त फलासी ॥ संतुष्ट होवोनि ते त्यासी ॥ इच्छिले मानसी पुरविती ॥११॥

माघमासी एक स्नान ॥ ऋषिदेवांचे पूजन ॥ नारिकेल देता द्विजांकारण ॥ रुद्रलोक मिळतसे ॥१२॥

पापशुद्धि धरोनि चित्ती ॥ प्रातःकाली देवतीथी ॥ स्नान करावे मंत्रोक्ती ॥ भक्तिपूर्वक अवधारी ॥१३॥

मंत्र ॥ सवित्रे प्रसवित्रे च परं धाम जलं मम ॥ त्वत्तेजसा परिभ्रष्टं पापं यातु सहस्त्रधा ॥१४॥

दिवाकर जगन्नाथ प्रभाकर नमोऽस्तुते ॥ परिपूर्ण कुरुष्वैव स्नानं त्वेतन्ममाच्युत ॥१५॥

जो हा असे आगमोक्त ॥ ऐसा मंत्र उच्चारित ॥ अग्निवरुणां करोनि दंडवत ॥ स्नान करावे तात्काळ ॥१६॥

माघमासी करिता स्नान ॥ बिंब रवीचे भेदून ॥ शीघ्र पावे मोक्षभुवन ॥ काय वर्णू ऋषी हो ॥१७॥

शुक्लपक्षी माघमासी ॥ हस्तनक्षत्र एकादशी ॥ स्नान करिता पाप नाशी ॥ जन्मजन्मांतरींचे ॥१८॥

ऋषींस म्हणे शरजन्मा ॥ काय वानू तीर्थमहिमा ॥ धूतपाप होय सुदामा ॥ मातृगामी जरी तो ॥१९॥

शालकवंशी धौम्यमुनी ॥ पंचाक्षरी मंत्र जपोनी ॥ सिद्धि झडकरी पावोनी ॥ पुनीत जाहला तेधवा ॥२०॥

ध्यानस्थ करोनि शिवलिंग ॥ अर्चिता टाकिला देहलिंग ॥ स्वयेंचि झाला स्वयंभू ॥ सिद्धेश्वर नामाने ॥२१॥

पुष्पवृष्टि प्रभंजन ॥ करी सौम्य वर्षाव घन ॥ सकल झाले शुद्ध मन ॥ सिद्धेश्वरप्रसादे ॥२२॥

सिद्धेश्वर तीर्थासी ॥ व्यतिपात संक्रमेसी ॥ स्नान पिंडप्रदानेशी ॥ करिता पावे सौम्य गति ॥२३॥

माघ व्यतिपात आमेसी ॥ धूतपापतीर्थासी ॥ करितां घृत गूढ पायसी ॥ प्राप्य होय रुद्रलोक ॥२४॥

कृष्णेच्या उत्तरतटी ॥ तीर्थ सिद्धेश्वर विख्याति ॥ हिरण्यदान जे करिती ॥ सूर्यगति पावती ॥२५॥

स्कंद म्हणे ऋषींलाग्न ॥ ऐसे धूतपाप महिमान ॥ जयेठायी द्विजनंदन ॥ उत्तम गति पावला ॥२६॥

ऐशी ही पुण्य पावन कथा ॥ भक्तिपूर्वक नित्य ऐकता ॥ चतुर्वर्ग फल तत्त्वतां ॥ लाधे कृष्णाप्रसादे ॥२७॥

पुढिले अध्यायी सुरस आख्यान ॥ सत्य ब्राह्मणा उपदेश गहन ॥ होता पावेल ब्रह्मसदन ॥ आनंदभिधान असे हे ॥२८॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ पाहता चाखोनि रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ षष्ठोऽध्याय वर्णिला ॥२९॥

*इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये धूतपापतीर्थवर्णनं नाम षष्ठोऽध्यायः ॥*
🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸

*[अनंत देव वाई।१६/०१/२०१७.]* 🔔🌺🕉🙏🏼🙏🏼🙏🏼🕉🌺🔔
*श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ७*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*श्रीगणेशाय नमः ॥*

ऐकोनि कृष्णासिंहध्वनि ॥ पापकुंजर जाती पळोनी ॥ कृष्णा सुखाची रत्‍नखाणी ॥ दुःखनिरसनी श्रीकृष्णा ॥१॥

ब्रह्मकुमार ऋषींप्रती ॥ सांगे कृष्णा धरोनि चित्ती ॥ काय वानू कृष्णास्तुति ॥ पन्नगपतीही कुंठित ॥२॥

कृष्णानदीच्या दक्षिणेस ॥ धूतपापासाव कोस ॥ तीर्थ असे जे तयास ॥ बोलती सत्य ऋषीश्वर ॥३॥

येईविषयी कथा पावन ॥ तपननामा असे ब्राह्मण ॥ तया असती पुत्र दोन ॥ सत्य आणि वेद ऐसे ॥४॥

तर्कशास्त्र तया शिकवून ॥ केले चांगले विद्वान ॥ प्रौढ झाले हे पाहून ॥ पिता बोलवी तयांसी ॥५॥

म्हणे मजपाशी विपुल धन ॥ घ्यावे तुम्ही विभागून ॥ धर्मकार्यार्थ करावे साधन ॥ ऐशी असे मम इच्छा ॥६॥

मी तरी विषय सोडिला ॥ त्रिवर्ग येणेचि साधिला ॥ एक आशय मनी राहिला ॥ योगे आत्मदर्शन ॥७॥

तरी तुम्ही अगस्ती मुनी ॥ साक्षी करोनि घ्या विभागोनि ॥ जे का भवनगिरीत पुरोनि ॥ ठेविले मी धन बहु ॥८॥

ऐसे त्यास बोलोनि पिता ॥ गेला वनी तपाकरिता ॥ अगस्तीसी आणिती तत्त्वता ॥ पुत्र दोघे विभागासी ॥९॥

सत्य म्हणे मी वडील ॥ म्हणोनि श्रेष्ठांश मज येईल ॥ वेद ऐकोनि हे बोल ॥ म्हणे मूढा काय वदसी ॥१०॥

सवेचि सत्ये एक चापट ॥ मारिता वेद अति तापट ॥ हाती घेवोनि एक लकुट ॥ ताडण करी अग्रजा ॥११॥

ऐसे देखोनि यापरी ॥ अगस्त्य दोघांही निवारी ॥ परी ते परस्परवैरी ॥ ऋषिवैखरी नायकती ॥१२॥

धनलोभे दोघेजण ॥ एकमेका करिती ताडण ॥ ऋषि हांसे पोट धरून ॥ विस्मित होवोनि मानसी ॥१३॥

तधी सत्य पितयापाशी ॥ जाऊनि सांगे गोष्टी ऐशी ॥ ऐकोनि म्हणेरे कायसी ॥ बुद्धी तुम्हा उपजली ॥१४॥

थोर कुळी उपजोन ॥ जे करिती दुराचरण ॥ धिक तयांचे होय जीण ॥ व्यर्थ माता प्रसवली ॥१५॥

धन असे धर्माचे फळ ॥ धर्म करुणेचे आलवाल ॥ करुणा सौंदर्याचे मूळ ॥ ऐक बालका निर्धारे ॥१६॥

विष्णुसी नार्पिले जे कर्म ॥ की धन असे रहितधर्म ॥ नाही जाणिले ईश्वरवर्म ॥ ज्ञान व्यर्थ कासया ॥१७॥

की उपकारावीण देह ॥ की अतिथीवीण गेह ॥ सत्याविण जिणे इह ॥ व्यर्थ जाण बालका ॥१८॥

जीवन ज्याचे धर्मास्तव ॥ तोचि जाणे ज्ञानभाव ॥ ज्ञाने ध्याने तोषिला देव ॥ तरीच जीवनमुक्त तो ॥१९॥

परमेश्वरे ब्राह्मणदेही ॥ उपभोगहेतु ठेविला नाही ॥ तप करोनि विदेही ॥ अनंतसुख मिळवावे ॥२०॥

जी कर्मे असतील प्रशस्त ॥ तीच ठेवावी हस्तगत ॥ दुष्कर्मै वर्जावी समस्त ॥ जी का वेदनिंदित ॥२१॥

संतुष्ट ठेवावे आपुले मन ॥ सर्वत्र ठेवावे सम नयन ॥ इंद्रियांचे करोनि आकलन ॥ सत्यप्रिय रहावे ॥२२॥

मन असावे शांत दांत ॥ ब्राह्मणे रहावे दयावंत ॥ परियोषितेवरी न ठेवी चित्त ॥ पारुष्य हिंसा नसावी ॥२३॥

लोकवार्तेचा न येवो आळ ॥ परोपकारी घालवी काळ ॥ ऐसा धर्म आचरोनि बाळ ॥ मुक्ति मेळवी निर्वाण ॥२४॥

नर जैशी करील कृति ॥ तैशीच त्यास मिळे गति ॥ दुष्कृतीचे फल निश्चिती ॥ याच जगी मिळतसे ॥२५॥

ऊर्ध्व बाहू करोनि आपुला ॥ सत्य सांगतो ऐक बाळा ॥ धर्म लाधे अर्थकामाला ॥ ऐसे वर्म न जाणशी ॥२६॥

पूर्ववयी धर्म न करीत ॥ होईल तोचि स्वार्थभ्रष्ट ॥ याचिकारणे धर्म सतत ॥ बुद्धिमंते करावा ॥२७॥

मरण येतांचि सहसा ॥ बांधवांचा काय भरवसा ॥ शून्यमार्गी जाशील कैसा ॥ धर्मावीण सांग बा ॥२८॥

जैसा बुडबुडा पाण्यावरू ॥ तैसा देह क्षणभंगरू ॥ जीव अनित्य जेवि पाखरू ॥ ऐक बाळा एकचित्ते ॥२९॥

महापुरी काष्ठे मिळती ॥ तैशी स्त्रीपुत्रसंगती ॥ कैसा निजलासि मूढमति ॥ सावध सत्वर होई गा ॥३०॥

 जवळी नसे धर्मपाथेय ॥ सोडिता सद्‌गुरूचे पाय ॥ घोरमार्गी बहुत अपाय ॥ कैसा जाशील एकटा ॥३१॥

जपतपक्षमेची करोनि नाव ॥ तरोनि जाई भवार्णव ॥ कृष्णेवरी ठेवोनि भाव ॥ साक्षात देव होशी तू ॥३२॥

कृष्णामृताचा ऐकोनी घोष ॥ जन्मजन्मांतरींचे दोष ॥ नष्ट होवोनि देवेश ॥ कृपा करी तात्काळ ॥३३॥

तीन वेळा कृष्णास्नान ॥ करिता श्रीकृष्णेचे ध्यान ॥ कृष्णरूप होसी हे जाण ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥३४॥

ऐसे ऐकोनि सुधावचन ॥ सद्‌गदित झाले तयाचे मन ॥ शीघ्र नमोनि पितृचरण ॥ कृष्णातीरी पातला ॥३५॥

दूत पाठवून एक कोस ॥ कृष्णातटी केला वास ॥ करिता शिवाचा निजध्यास ॥ तुष्ट गौरीश जाहला ॥३६॥

देखोनि तयाची शुद्ध मती ॥ शांत सम निंदास्तुति ॥ जया सारखी कनक माती ॥ स्वच्छकांती शिवभक्त ॥३७॥

अगस्तीचे धरोनि पाय ॥ लाधे मंत्र नमः शिवाय ॥ जपता तोषोनि कैलासराय ॥ म्हणे काय इच्छिसी ॥३८॥

जे का असेल तव कामना ॥ दुर्लभ जरी देवादिकांना ॥ तरी देईन मी वरदाना ॥ कैलासराणा म्हणतसे ॥३९॥

साष्टांग करोनि नमस्कार ॥ सत्ये याचिला योगवर ॥ जेणे दिसे उमावर ॥ चराचरव्यापी जो ॥४०॥

ऐकोनि तयाचे भाषण ॥ योगिध्येय उमारमण ॥ आत्माराम जो सर्वपूर्णं॥ बोले वचन तेधवा ॥४१॥

मन कर्म आणि वाणी ॥ याही अपपर एक जाणि ॥ सर्वभूतस्थ शूलपाणी ॥ मोक्षदानी तेधवा ॥४२॥

सर्वांभूती असे ईश्वर ॥ हेचि ज्ञानतप सुंदर ॥ मोक्षसाधन हेचि सुकर ॥ ज्ञानी निरंतर बोलती ॥४३॥

ऐशी योगाची हे स्थिती ॥ सांगता झालो तुजप्रती ॥ ग्रहण करिता होय स्फूर्ति ॥ आनंदमूर्ति मी असे ॥४४॥

यापरी हे योगरत्‍न ॥ केले मी तुझे आधीन ॥ नित्य ठेवी करोनि जतन ॥ राही निमग्न आनंदी ॥४५॥

ऐसे हे परमगुह्य ॥ सांगता झाला मृत्युंजय ॥ ऐकोनि बोले तदा सत्य ॥ नारद म्हणे ऋषींसी ॥४६॥

सत्यनामे व्हावे तीर्थ ॥ सत्यनामे रहावे येथ ॥ आणिक मागतो किंचित ॥ वर द्यावा मजलागी ॥४७॥

तत्त्वसंवाद हा आपुला ॥ ऐके जो भक्तपाळा ॥ तोचि पावो तत्त्वपदाला ॥ हेचि तुजला मागतो ॥४८॥

माझे अनुजाची अहंता ॥ त्वत्प्रसादे नाशवंता ॥ व्हावी असे उमाकांता ॥ चिंताहरा मागणे ॥४९॥

माझे दर्शन होता तया ॥ नैश्वरबुद्धि जावो लया ॥ तत्त्वज्ञानी करी सदया ॥ नमोनि पाया मागणे ॥५०॥

तथास्तु म्हणोनि महेश्वर ॥ विदेही करोनि सत्य सत्वर ॥ गेला तत्काल कैलासावर ॥ भवानीवर पिनाकी ॥५१॥

पुढिले अध्यायी दयाबंधु ॥ तुष्ट होता सत्यबंधु ॥ तपन होईल मुक्तबंधु ॥ आनंदकंदु झडकरी ॥५२॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ पाहता चाखोनि रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ सप्तमोऽध्याय वर्णिला ॥५३॥

*इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये सत्यतीर्थवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥*
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

*श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ८*
🌹🍄🌹🍄🌹🍄🌹🍄🌹
*विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.*

💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢
*श्रीगणेशाय नमः ॥*

वाहता कृष्णाप्रभंजन ॥ नष्ट होती दुरितघन ॥ कामक्रोधादि वृक्ष सघन ॥ पडती मोडोनि कडाडा ॥१॥

आता श्रोते एकचित्त ॥ होवोनि ऐका कथामृत ॥ महा पापीही होय पुनीत ॥ विरिंचिसुत म्हणतसे ॥२॥

मागील अध्यायी सत्यकथा ॥ तुम्हा जाहलो मी सांगता ॥ योगसंसिद्ध ऐकोनि भ्राता ॥ वेदे अहंता सोडिली ॥३॥

वेदासी बोले सत्यतात ॥ जावे तुवा अग्रजाप्रत ॥ भेटी होता तुज त्वरित ॥ दुःखविमुक्त होशील ॥४॥

तदा तातासी नमस्कार ॥ करोनि निघाला तपनकुमार ॥ अग्रजा पाहोनि हरहर ॥ म्हणे भूभार जाहलो ॥५॥

ऐसा अनुतापी जाणून ॥ सत्य हासोनि बोले वचन ॥ श्रीकृष्णेचे करी सेवन ॥ एकाग्रमने करोनी ॥६॥

बरे बोलोनि कृष्णेवर ॥ स्नान करी द्विजवर ॥ पूजीतसे सत्येश्वर ॥ गौरीहर पशुपति ॥७॥

जितश्वास निराहार ॥ मानसी जपे मंत्र अघोर ॥ बारा वर्षे होता वर ॥ माग म्हणे पिनाकी ॥८॥

ऐशी ऐकोनिया उक्ति ॥ वेद नमोनी शिवाप्रति ॥ म्हणे द्यावी गा सद्‌गति ॥ योगी वंदिती जियेसी ॥९॥

माझे नामे हा पर्वत ॥ राहो देवा सदोदित ॥ आणि जे का मी याचित ॥ उमाकांता द्यावे गा ॥१०॥

माझा पिता जो तपन ॥ नाम तयाचे करोनी धारण ॥ येथे वसावे जी आपण ॥ माझी आण महेशा ॥११॥

आम्हा उभयतांचे मधी ॥ महापुण्या कृष्णानदी ॥ असावी हे कृपानिधि ॥ येवढी आधी दयाळा ॥१२॥

सत्यतीर्थी करोनि स्नान ॥ घेती जे तुझे दर्शन ॥ तयां मिळो परमस्थान ॥ हेचि मागणे पुरवी गा ॥१३॥

तपनेश्वर आणि वेदगिरि ॥ मध्ये कृष्णेत देह जरी ॥ पडे तरी अंधकारी ॥ मुक्त करी दयाळा ॥१४॥

ऐसे म्हणोनी स्वस्तिकासनी ॥ बैसोनि चिंती शूलपाणी ॥ प्राणापानैक्य करोनी ॥ चैतन्य चित्ती ठेविले ॥१५॥

तपन तपे शतरुद्रीय ॥ प्रसन्न होवोनि मृत्युंजय ॥ म्हणे बापा इच्छिसी काय ॥ सांग निर्भय मानसे ॥१६॥

ऐकोनि म्हणे तपन देवा ॥ देई मज हाचि मेवा ॥ सदा घडो चरणसेवा ॥ प्राणविसावा तूचि मज ॥१७॥

सर्व जंतूत तुझी वसति ॥ म्हणोनि बोलती श्रुतिस्मृती ॥ सर्वशांत त्रिगुणमूर्ति ॥ वर्णू किती मी वाचे ॥१८॥

वाणीमनाचा अविषय ॥ सर्वज्ञ जो योगगम्य ॥ जो का चिदात्मा योगवंद्य ॥ तोच करी जगदीशा ॥१९॥

ऐसा स्तविला जयाशी ॥ स्पर्शी तोचि तपनासी ॥ बोलता झाला योगऋषी ॥ ऋषिप्रती तेधवा ॥२०॥

नित्यानंद पराशांति ॥ वरेण्य अमृत मज बोलती ॥ ऐशी अद्वैत शिवस्फूर्ति ॥ जाण निश्चिती परात्मा ॥२१॥

ऐसे बोलोनि तपनाप्रति ॥ तात्काळ बैसे नंदीवरती ॥ गमन करी कैलासपति ॥ नारद म्हणे ऋषींसी ॥२२॥

तया तपनेश्वरापासाव ॥ होय गंगासमुद्भव ॥ अगस्त्याश्रमी येता स्त्राव ॥ कृष्णासंगम पावली ॥२३॥

सत्य तीर्थाचे महिमान ॥ करिता जयाचे संस्मरण ॥ महापापीही उद्धरून ॥ कैलासभुवन पावती ॥२४॥

तेथोनी एक कोसावरी ॥ विष्णुतीर्थ असे निर्धारी ॥ अश्वत्थरूपी नरहरी ॥ वास करी ज्या ठायी ॥२५॥

करोनि वनस्पतीमंत्रोच्चार ॥ प्रदक्षिणा शत अष्टोत्तर ॥ प्रातःकाळी करिता नर ॥ दोशवर्जित होतसे ॥२६॥

विष्णुतीर्थी द्वादशीसी ॥ श्राद्धादि करी उपवासी ॥ पितर होती वैकुंठवासी ॥ जे का नरकासी पावले ॥२७॥

पुढिले अध्यायी कथा सुंदर ॥ मुक्त झाला सप्तकर व अग्नितीर्थ सिद्धेश्वर ॥ महिमा जेथ वर्णिला ॥२८॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ तृप्ति पावाल तेणे अखंड ॥ अष्टमोऽध्याय वर्णिला ॥२९॥

*इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये तपनोद्धारवर्णनं नाम अष्टमोऽध्यायः ॥*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

*क्रमशः



🕉🌸🌺🙏🏼🙏🏼🙏🏼🌺🌸🕉

*श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ९*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

*श्रीगणेशाय नमः ॥*

येता कृष्णाधाराधर ॥ नाचो लागले भक्तमयूर ॥ चित्तचातक होवोनि समोर ॥ फार टाहो फोडती ॥१॥

ऋषि म्हणती अहो स्कंद ॥ तपन झाला आनंदकंद ॥ ऐकोनि लागला हाचि छंद ॥ कृष्णामाहात्म्य ऐकावे ॥२॥

ऐशी ऐकोनिया वाणी ॥ स्कंद आणि कृष्णा ध्यानी ॥ म्हणे ऐका चित्त देवोनी ॥ कृष्णामहिमा अगाध ॥३॥

विष्णूतीर्थापासूनि दूर ॥ अग्नितीर्थ दंड सहस्त्र ॥ जे का भुक्तिमुक्तीचे घर ॥ कथा मनोहर येविषयी ॥४॥

मानसपुत्र चतुराननाचा ॥ ऋषीश्वर भृगु नावाचा ॥ दाता दयालु सदा वाचा ॥ नामी शिवाच्या रंगली ॥५॥

सत्यवादी शुचिष्मंत ॥ दयाशील ज्ञानवंत ॥ प्रिय अतीथ अभ्यागत ॥ शिवभक्त महायोगी ॥६॥

तयाची भार्या नामे दाता ॥ साध्वी सुशीला नित्य शांता ॥ प्रेमे सेवीतसे स्वकांता ॥ काय वृत्तांत जाहला ॥७॥

तो कोणेक दिवशी ऋषी ॥ आदित्य येता मध्यान्हीशी ॥ सूर्याराधना करावयासी ॥ गंगातीरासी पातला ॥८॥

इकडे शूलनामा असुर ॥ विक्राळ दाढा भयंकर ॥ मुनिपत्‍नीस सत्वर आला हरण करावया ॥९॥

देखोनि ऋषीचा आश्रम ॥ किंचित घेतसे विश्राम ॥ चुंबन करो पाहती द्रुम ॥ व्योम ऐसे वाटले ॥१०॥

ऐसे जे का पुण्यस्थल ॥ तेथे वृक्ष असती प्रफुल्ल ॥ नाना पुष्पांचे परिमल ॥ भ्रमर गुंजारव करिताती ॥११॥

जाई जुई चंपक मालती ॥ मोगरे नाना जाती फुलती ॥ पारिजात गुलाब सेवंत ॥ रंग असती भिन्न भिन्न ॥१२॥

दवणा पाच मरवा निर्मळ ॥ सुवास सुटतसे सोज्वळ ॥ ठायी ठायी सरोवरे विपुल ॥ माजी मराळ खेळती ॥१३॥

नाना जाती वृक्ष असती ॥ पक्वफलभारे नमती ॥ बकुल अम्र चिंचा किती ॥ कपित्थ असती बहुसाल ॥१४॥

केळी नारळी शिताफळे ॥ अत्यंत गोड रामफळे ॥ खिरण्या जांभळे रायावळे ॥ कोंब कोवळे वेळूंचे ॥१५॥

सुरु कृष्णागर मैलागर ॥ पनस दाळिंबे पेरू अपार ॥ खजूर पोफळी देवदार ॥ रुद्राक्ष सुंदर शोभती ॥१६॥

ऐसे नानाजाती वृक्ष असती ॥ पक्षी तयांवरी शब्द करिती ॥ शुक सारिका मंजुळ बोलती ॥ कोकिळा गाती सुस्वर ॥१७॥

ठायी ठायी मनोहर ॥ नाचती मयूरी मयूर ॥ गुंजारव करिती अति मधुर ॥ भ्रमर सुवासा देखोनी ॥१८॥

विप्र वेदघोष करिती ॥ स्वाहा वषट्‌कार बोलती ॥ तेथ जाहला असुरपति ॥ द्विजरूप तात्काळ ॥१९॥

आश्रमी जेव्हा तो शिरला ॥ मृग पक्षांनी आक्रोश केला ॥ आ करोनि म्हणे भृगुपत्‍नीला ॥ काम चेतला अंतरी ॥२०॥

ऐकोनि तयाच्या वचना ॥ बाहेर आली भृग्वंगना॥ देखोनिया तया ब्राह्मणा ॥ काय वचना बोलत ॥२१॥

अरे तू असशी कोठील कोण ॥ येथे यावया काय कारण ॥ परस्त्रीसी पाचारण ॥ काय कारण करतोसी ॥२२॥

ऐकोनि सतीचे उद्‌गार ॥ येरू म्हणे तुझा भ्रतार ॥ मीचि होतो म्हणूनि सत्वर ॥ बाहेर येई सुंदरी ॥२३॥

पूर्वी तुझे पित्याकडून ॥ झाले मजशी वाग्‍दान ॥ तरी तुज न्यावयालागून ॥ जाण येथे आलो गे ॥२४॥

पूर्वी केले जे भाषण ॥ त्याचेच बल अधिक जाण ॥ यासी असे गे शास्त्रप्रमाण ॥ विद्वज्जन बोलती ॥२५॥

ऐकोनि दुष्टाची ते वाणी ॥ भयाभीत झाली विप्रपत्‍नी ॥ मग आपल्या गृह्याग्निलागुनी ॥ शरण गेली तेधवा ॥२६॥

प्रदक्षिणा घालिता कुंडास ॥ कंप सुटला तदंगास ॥ येरु म्हणे गृह्यदेवतेस ॥ पूस आता झडकरी ॥२७॥

ऐकोनि ऐसे ती भामिनी ॥ विचारी पावका सांग झणी ॥ पुण्यपातका साक्षी होवोनी ॥ भूतांमाजी राहसी ॥२८॥

पावक म्हणे तुजलागून ॥ द्यावी राक्षसा ऐसे वचन ॥ असता भृगूसी अर्पण ॥ केले तुझिया पित्याने ॥२९॥

ऐकोनि अग्निची मात ॥ राक्षसे धरिला तिचा हात ॥ भृगूसी तो भीत भीत ॥ आश्रमापासाव निघाला ॥३०॥

गर्भिणी मुनीची भार्या ॥ विधात्या म्हणे अरे निर्दया ॥ काय केले हे अनार्या ॥ वाया गांजिशी का मज ॥३१॥   अनंत देव ।

 अहो सकल वनस्पती ॥ राक्षसे नेले मजप्रति ॥ ऐसे कथोनि माझा पति ॥ सावध करा तात्काळ ॥३२॥

अहो आश्रमदेवता ॥ राक्षसे नेली तुझी दांता ॥ ऐसे कथोनि माझिये कांता ॥ सावध करा तात्काळ ॥३३॥

अहो पुष्करणी सपद्मिनी ॥ राक्षसे नेली मज हिरोनी ॥ ऐसे कथोनी भृगुमुनि ॥ सावध करा तात्काळ ॥३४॥

स्फुंदस्फुंदोनि ते अंगना ॥ हाका मारी पक्षिगणा ॥ तुम्ही तरी माझिया रमणा ॥ सावध करा तात्काळ ॥३५॥

अरे गर्भस्थ माझिया बाळा ॥ काय करु मी हा कपाळा ॥ ऐसे ऐकता बाहेर आला ॥ हुंकार करोनी झडकरी ॥३६॥

पाहोनि तव बालतेज ॥ राक्षस झाला भस्म सहज ॥ कडिये घेवोनि तो निज ॥ बाळक आली घरासी ॥३७॥

इकडे तीर्थाहूनि ऋषी ॥ आश्रमी येता पाहे सुताशी ॥ सवेंचि कापोनि मानसी ॥ म्हणे पत्‍नीसी काय हे ॥३८॥

तुझा अपराधी असे कवण ॥ कैसे झाले हे गर्भपतन ॥ भस्म येथे काय कारण ॥ कथन करी मजलागी ॥३९॥

ऐकोनि ऋषीचे वचन ॥ झाले वृत्त करी कथन ॥ अग्निसी शापी ऋषि कोपून ॥ सर्वभक्ष्यी तू होसी ॥४०॥

ऐकोनि पत्‍निमुखीची वार्ता ॥ क्रोध नावरे ऋषीचे चित्ता ॥ म्हणे गृह्याग्नीने तत्त्वता ॥ साक्ष कैशी दीधली ॥४१॥

लोक म्हणती तुज पावक ॥ धर्मरहस्यामाजि मूर्ख ॥ आहेसी सकलाहितकारक ॥ आजि कळले पै माते ॥४२॥

ऐसे ऐकोनी शापवचन ॥ अग्नि झाला क्रोधायमान ॥ सर्वशक्ति संहारून ॥ लीन जाहला सागरी ॥४३॥

नष्ट झाला जठरानळ ॥ जिरेना एकही अन्नकवळ ॥ अंधकार जाहला सकळ ॥ पाकसिद्धी राहिली ॥४४॥

राहिले यजन माजन ॥ अतिथी जाती विन्मुख होवोन ॥ तदा इंद्रादि सुरगण ॥ शरण गेले विधीसी ॥४५॥

देवांसी विचारी धाता ॥ काय झालेसे तत्त्वता ॥ अग्निरहित सर्व जगता ॥ सांगती अमर नेमोनी ॥४६॥

स्वाहा स्वधा अग्निमागून ॥ जाते झाले विश्वांतून ॥ वषट्‌कारासहित यज्ञ ॥ लया गेले सर्वही ॥४७॥

मनुष्य गाई तुरग महिषी ॥ स्थावर जंगम सर्व विनाशी ॥ शरण आलो म्हणोनि तुजशी ॥ ऐकता विरिंची निघाला ॥४८॥

सवे घेवोनि देवगण ॥ ऋषि पितर आणि ब्राह्मण ॥ जलशायी जेथ हुताशन ॥ पातले तेथे समस्त ॥४९॥

ब्रह्मा आलासे पाहून ॥ प्रदीप्त झाला हुताशन ॥ म्हणे हे चतुरानन ॥ विनाकारण शाप हा ॥५०॥

काय केले मी भृगूस ॥ त्याने उच्चारिले शापास ॥ म्या न बोलावे की सत्यास ॥ कठीण प्रसंग सर्वथा ॥५१॥

प्रजापति बोले रे हुताशन ॥ कैसे वाचू तुजविण ॥ कैसे श्राद्ध सुधापान ॥ तुजवीण व्यर्थ सर्वथा ॥५२॥

तूचि यज्ञ स्वधा स्वाहा ॥ देवमुख तो मेषवाहा ॥ जिवंत करी ही सर्वसहा ॥ तुजवीण व्यर्थ सर्वथा ॥५३॥

तयावरी चतुरानन ॥ म्हणे कृष्णेसी करी गमन ॥ जे का साक्षात नारायण ॥ शापमोचन करील ॥५४॥

ब्रह्मयाचा निरोप घेऊन ॥ कृष्णादक्षिणतटी येऊन ॥ राहिला जेथे सिद्धेश्वरस्थान ॥ पावन करी पावका ॥५५॥

विष्णुतीर्थ मनोहर ॥ तेथोनि सहस्त्र धनुष्यांवर ॥ स्नान करिता अर्धवत्सर ॥ सिद्धि सप्तकर पावला ॥५६॥

झाला अग्नी शापमुक्त ॥ तेथे देता तीळ घृत ॥ सप्त कुळांचा उद्धार करीत ॥ नारद म्हणे ऋषींसी ॥५७॥

अमावास्या व्यतीपात ॥ येता जो सक्तुपिंड देत ॥ तयाचे तीन पुरुष मुक्त ॥ पितृलोक पावती ॥५८॥

सोमप्रदोष श्रवणेसी ॥ स्नान करोनि सिद्धेश्वरासी ॥ अवलोकिता अग्निलोकांसी ॥ जाईल ईशकृपेने ॥५९॥

रवि मकरेसि येता ॥ ब्राह्मणा तीळ तूप दान करिता ॥ आठ सहस्त्र गायत्री जपता ॥ चांद्रायणफळ मिळतसे ॥६०॥

सिद्धेश्वराच्या अग्रभागी ॥ स्नान करोनि द्विजालागी ॥ धेनु देता यज्ञभागी ॥ होय अग्निप्रसादे ॥६१॥

शुद्ध प्रतिपदा दिवशी ॥ अग्नितीर्थी ब्राह्मणाशी ॥ तंडूळ देता दरिद्र नाशी ॥ अग्नि भक्तजनाचे ॥६२॥

 सह्यजेच्या दक्षिणतीरी ॥ अग्नितीर्थ सिद्धेश्वरी ॥ विप्रमुखी हवन करी ॥ तोचि वरी लक्ष्मीसी ॥६३॥

अग्नितीर्थ सिद्धेश्वर ॥ महिमा जयाचा ऐकता नर ॥ आयुष्यारोग्य सुख अपार ॥ भोगोनि जाय शिवलोका ॥६४॥

पुढिले अध्यायी तीर्थथोरी ॥ कथन करील तारकारी ॥ भक्तीने ऐकता मुरारि ॥ संकट वारी भक्तांचे ॥६५॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ तृप्ति पावला तेणे अखंड ॥ नवमोऽध्याय वर्णिला ॥६६॥

*॥इति श्रीस्कंदपुराणे कृष्णामाहात्म्ये अग्नितीर्थवर्णनं नाम नवमोऽध्यायः ॥*



💐🌸🌺🙏🏼🙏🏼🙏🏼🌺🌸💐

*श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १०*

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.*

☘☘☘☘☘☘☘☘☘
श्रीगणेशाय नमः ॥

विकास पावता कृष्णारविंद ॥ गुंजारव करिती भक्तमिलिंद ॥ प्रेमेचि धावती येता सुगंध ॥ मकरंद सेवन करावया ॥१॥

कृष्णामाहात्म्य ऐकता ॥ निर्भय होय श्रोता वक्ता ॥ संशय नुरे मनन करिता ॥ मुक्तता पावे निजध्यासे ॥२॥

ऋषींस म्हणे ब्रह्मतनय ॥ वैराजक्षेत्र महापुण्य ॥ स्मरणे ज्याचिया चित्तजन्य ॥ दोष दहन पावती ॥३॥

जेथे ब्रह्मा वैराजकल्पी ॥ द्वादशाब्द सत्र संकल्पी ॥ बुडो वासना निर्विकल्पी ॥ हाचि हेतू धरोनि ॥४॥

तये सत्रामाजी शब्द ॥ भोजन करा तुम्ही स्तब्ध ॥ दैवे झाला हरी लब्ध ॥ आपुलीये उच्छिष्टे ॥५॥

सुखप्रद असे जे सत्र ॥ सर्वत्र असे सुवर्णपात्र ॥ सभासद ऋषी सकलत्र ॥ यज्ञकर्मी पै असती ॥६॥

वसु मनू विद्याधर ॥ सिद्ध गंधर्व सकल अमर ॥ अप्सरागण सपरिकर ॥ यज्ञकर्मी पै असती ॥७॥

यूप वेदी कनकाची ॥ सुपे उखळी त्यापरीची ॥ स्रुक् स्त्रुवा कल्पतरूची ॥ विरिंची यजमान जयाठायी ॥८॥

चित्रविचित्र मृगाजिन ॥ कंबल आणि दर्भासन ॥ विशाल मंडप शोभायमान ॥ विश्वकर्मे निर्मिला ॥९॥

शंख दुंदुभी वाजती ॥ गंधर्वगण मधुर गाती ॥ ऋग यजू साम पढती ॥ मूर्तिमंत्र जयाठायी ॥१०॥

नैऋत्येस पत्‍नीशाला ॥ आग्नेयदिशी पाकशाला ॥ पश्चिमेस पुष्पमाला ॥ वायव्येसी द्विजतर्पण ॥११॥

उत्तरेस अश्वहत्ती ॥ धनधान्या नाही मिती ॥ ईशान्येस देव वसती ॥ ब्रह्मसभा पूर्वेसी ॥१२॥

ऐशी असे सर्व आयति ॥ परि नसे दाक्षायणीपती ॥ म्हणोनि आसनी कोणी न बैसती ॥ तदा ब्रह्मा बोलला ॥१३॥

रुद्राविण यज्ञप्राप्ती ॥ कैसी होईल मजप्रति ॥ ऐकोनिया देव म्हणती ॥ वायूप्रति सत्वर ॥१४॥

जाऊनिया वाराणशी ॥ उमेसहित शंकराशी ॥ दंडपाणी माधवासी ॥ शीघ्र आणी या ठायी ॥१५॥

ऐसे परिसोनिया वात ॥ काशीस जावोनि जगन्नाथ ॥ तैसाचि विनवी उमाकांत ॥ वंदोनि पाय तयांचे ॥१६॥

कराया चलावे सोमपान ॥ तुम्ही कौस्तुभ सौमार्धभूषण ॥ समारंभी सत्र कमलासन ॥ येऊनि सांग करावे ॥१७॥

स्वाहा स्वधा वषट्‌कार ॥ प्रणव यज्ञ ॐकार ॥ तुजविण कैसे विश्वंभर ॥ परिपूर्ण होती सांगपा ॥१८॥

ऐशी ऐकोनि विनंती ॥ संतोषोनि म्हणे भगवती ॥ त्वरित चलावे यज्ञाप्रति ॥ प्रजापती तोषव ॥१९॥

तदा गौरी त्रिलोचन ॥ लक्ष्मीसहित मधुसूदन ॥ नंदी गरूडारूढ होऊन ॥ वैराजक्षेत्री निघाले ॥२०॥

श्वेत कृष्ण धूम्राक्ष ॥ दंडपाणी पद्माक्ष ॥ गदा खड्‌ग परश धनुष ॥ घेवोनि गण निघाले ॥२१॥

कलावती चंद्रवती ॥ पद्ममालिनि मालती ॥ विश्व आणि हेमकांती ॥ विद्याधरी निघाल्या ॥२२॥

असित भरद्वाजान्वय शिव ॥ देवल व्यास मुनिपुंगव ॥ सस्त्रीक निघाले अभिनव ॥ यज्ञशोभा पहाया ॥२३॥

ऐसा आला पाहोनि शंभु ॥ हर्षे दाटला तो स्वयंभु ॥ म्हणे झाला महालाभु ॥ शीघ्र सन्मुख निघाला ॥२४॥

शंख दुंदुभी वेदघोष ॥ करिती होवोनि अति हर्ष ॥ ऐसा आणिला पार्वतीश ॥ यज्ञयश मिळवाया ॥२५॥

विश्वेश्वर महाविष्णु ॥ पूजोनि बोले कमलासनु ॥ अंबिकेसहित आपुले चरण ॥ लागता पावनु होय मी ॥२६॥

ब्रह्मा बोले हरिहरांस ॥ पूर्ण केले तुम्ही यज्ञास ॥ आता रक्षावे यमसदनास ॥ प्रलयकालपर्यंत ॥२७॥

ऐकोनि ब्रह्मयांचे वचन ॥ तथास्तु बोले गौरीरमण ॥ कृष्णातीरी वास करून ॥ राहते झाले तेधवा ॥२८॥

तयांची आज्ञा घेवोन ॥ यज्ञास आरंभी चतुरानन ॥ ऋत्विजां वरावया कारण ॥ पाचारण करी पत्‍नीसी ॥२९॥

अरुंधती भानुमती ॥ पूजीतसे सावित्री सती ॥ हळदी कुंकुम देत होती ॥ गंध तांबूल कंचुकी ॥३०॥

 तदा कोपोनि सरस्वती ॥ बोलती झाली शांडिल्याप्रति ॥ पवित्र व्हावया सत्रपूर्ती ॥ गायत्रीसि पाचारी ॥३१॥

ऐकोनि शांडिल्य गायत्रीसी ॥ आणिता विधि सत्रासी ॥ प्रारंभ करिता अति त्रासी ॥ स्त्रीस्वभावे सावित्री ॥३२॥  अनंत देव ।

कोपोनि म्हणे गायत्रीसी ॥ मजवाचूनि पतिस्थितीसी ॥ कोठेही तू न पावसी ॥ अगे सवती निश्चये ॥३३॥

सावित्री बोलोनि यापरी ॥ अंतर्धान पावे वटाभीतरी ॥ सवेंचि तेथोनि निघे वारी ॥ प्रवाहरूपे जातसे ॥३४॥

पश्चिमाब्धिची धरिता वाट ॥ ब्राह्मण करिती कलकलाट ॥ सवेचि धावती पाठोपाठ ॥ परत भेट व्हावया ॥३५॥

जाती विप्र समुद्रतीरी ॥ तो सागरामाजी प्रवेश करी ॥ ऋषींस म्हणे तारकारी ॥ तीर्थ थोर ते झाले ॥३६॥

सावित्रीसी न देखता ॥ मूर्च्छा पावे सृष्टिकर्ता ॥ महापापी असुर अवचिता ॥ आला क्रियालोपार्थ ॥३७॥

ब्रह्मयासी नाही शुद्धि ॥ आला असे पापबुद्धि ॥ ऐसे जाणोनि दंडपाणि तधी ॥ महादेवासी कळवीतसे ॥३८॥

ऐकोनिया अंधकारी ॥ शूल फेकी तयावरी ॥ असुर चकवोनी झडकरी ॥ सह्यजातीरी बुडाला ॥३९॥

ऐसे जाणोनि पिनाकपाणी ॥ सुदर्शन घेत विष्णूपासोनि ॥ सोडोनि मारिला पापखाणी ॥ रजनीचर तात्काळ ॥४०॥

तेथ जाहले चक्रतीर्थ ॥ स्नाने पावती चारी पुरुषार्थ ॥ त्रिशूळ फेकिला ते तीर्थ ॥ त्रिशूल नामे जाणावे ॥४१॥

सिद्धेश्वरापासून ॥ दंडशते त्रिशूल जाण ॥ वीस धनुष्य तेथून ॥ पतितपावन चक्रतीर्थ ॥४२॥

चक्रतीर्थी अन्नदान ॥ करता तोषे गौरीरमण ॥ पंचवीस धनु चक्रतीर्थाहून ॥ महाभैरव तीर्थ ते ॥४३॥

आश्विनमासी रविवारी ॥ प्रातःकाळी मौन धरी ॥ स्नान करोनि दर्शन करी ॥ फिरोनि उदरी न ये तो ॥४४॥

भैरवतीर्थी करोनि स्नान ॥ घेता कालभैरव दर्शन ॥ पुण्य जोडे काशीहून ॥ यवा आगळे बोलती ॥४५॥

कालभैरव क्षेत्राधिप ॥ देखता पुण्य जोडे अमूप ॥ दग्ध होय महापाप ॥ काय वर्णू ऋषी हो ॥४६॥

चक्रतीर्थ भैरवतीर्थ ॥ मध्ये असे हरिहरतीर्थ ॥ विशालाक्षी कृपा करित ॥ काय वर्णू ऋषी हो ॥४७॥

अष्टमी चतुर्दशी एकादशी ॥ सतिल करता स्नानासी ॥ विशालाक्षी हरिहरासी ॥ तिल बिल्वपत्रे पूजिता ॥४८॥

स्वर्गी राहे तो नर ॥ यावच्चंद्र दिवाकर ॥ ऐसे तीर्थ महाथोर ॥ काय वर्णू ऋषि हो ॥४९॥

अमा रविवारी धेनूसी ॥ देता महाकाल साक्षीसी ॥ मधुकुल्या क्षीरकुल्यासी ॥ भक्षिती पितर तयांचे ॥५०॥

सोमवारी श्रवण येता ॥ स्नान करोनि वस्त्रदाता ॥ त्रिशूलेश्वर तुष्ट होता ॥ सोमलोक मेळवी ॥५१॥

माघशुक्ल द्वादशीसि ॥ मालतीपुष्पे विष्णुसि ॥ पूजिता पावे लक्ष्मीसि ॥ ह्रषीकेशीप्रसादे ॥५२॥

महाशिवरात्री मध्यरात्रीसी ॥ पंचामृते विश्वेश्वरासी ॥ स्नान घालिता त्या नरासी ॥ कैलासवासी मुक्त करी ॥५३॥

कन्याराशीस येता गुरु ॥ बिल्वपत्रे विश्वेश्वरू ॥ पूजिता त्याने महाथोरू ॥ दान दिधले निश्चये ॥५४॥

स्कंद म्हणे ऋषींप्रति ॥ ऐशी तीर्थे अपरिमिती ॥ कृष्णेमाजी पाप हारिती ॥ भक्तजनांचे तात्काळ ॥५५॥

विश्वेश्वर दंडपाणी ॥ माधव कृष्णातटी राहुनी ॥ रक्षण करिती ब्रह्मयज्ञी ॥ भक्तजनांचे सर्वदा ॥५६॥

हा अध्याय वासरमणी ॥ उगवता जाय तम निरसुनी ॥ सत्यज्ञानस्वरूप होवोनि ॥ निरंजनी राहती ॥५७॥

पुढले अध्यायी कथा सुंदर ॥ रामतीर्थमहिमा थोर ॥ ऐकावा तो सपरिकर ॥ अंतर सावध करोनी ॥५८॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ तृप्ति पावाल तेणे अखंड ॥ दशमोऽध्याय वर्णिला ॥५९॥

*॥इति श्रीस्कंदपुराणे कृष्णामाहात्म्ये भैरवतीर्थवर्णनं नाम दशमोऽध्यायः ॥*
💥💥💥💥💥💥💥💥💥

Monday, 23 January 2017

स्वामींचा आशिर्वाद काव्यस्फूर्ती

1)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
 
खरच मला वाटते गगनात उडतच जावे।
वातावरणात स्वामिंचेच स्वरुप पहावे।
स्वामींना जवळ जाऊन निरखून बघावे।
चरणी तयांच्या थोडा वेळ बसावे।। १।।

नजरेत तयांच्या नजर मिसळून बघावे।
करुणेने मन भरुन तयातच विरुन जावे।
तेजस्वी मुखकमल न्याहाळत बसावे।
पाहून तयांना ध्यान मग्न होवून जावे।।२।।

ध्यानातही ब्रम्हांडाचे तेजोमय वलय दिसावे।
पहाता पहाता मी स्वतःलाच विसरुन जावे।
वलयाच्यामागे ब्रम्हांडनायकाचे रुप पहावे।
प्रकाशित रुप पाहूनी नयनांचे पारणे फिटावे।।३।।

नयनरम्य या संध्यासमयी नाम मुखे बोलावे।
नामस्मरणी मन लागूनी चित्त प्रफुल्लीत व्हावे।
कायावाचामने नित्य स्वामी स्वामी म्हणावे।
नाम शरीरातल्या धमण्यामध्ये सतत वसावे।।४।।

देऊन अन्न भुकेल्यांना तयात स्वामी पहावे।
इच्छा असे माझी दारातून कोणी ना विन्मुख जावे।
नको असू दे पैसा पण स्वामीधन साथ असावे।
अंती जीवनाच्या स्वामी चरणी विलीन होताना
स्वामींनी हसूनी जवळ करावे।।५।।

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

2)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

खेळ असे हा औट घटकेचा सारा।
आपण मांडतो संसाराचा पसारा।
पळतो मग त्यापाठी सैरावैरा।
हाती न असे आपुल्या आयुष्याची धारा।।१।।

मन भरकटते जाऊनी चहुबाजूला ।
कळे न जाऊ कुठे न माहित त्या दिशेला।
विचारांने पारखून जावे त्या बाजूला।
कुणाचे भय वाटे मना स्वामी असता आसरा।।2।।

जे कर्म करतो ते पाप पुण्यासोबत असे साथीला।
आयुष्य कसे जाई कळतसे ना कुणाला।
येईल तो सुदिन तुझ्याच जीवात वसला।
स्वामींची साथ असे सदैव तुजला।।3।।

हाक मारीता स्वामी दिसत आसपास।
का देसी जीवास इतका त्रास।
नामाची नित्य सवय लाव मुखास।
स्वामी करिती नित्य तुझ्या अंतरी वास।।4।।

निरपेक्ष प्रेम विनाअट क्षमा असे वंदनीय।
अन्नदान असे दानात दान अतुलनिय ।
पुण्य नसे यासारखे जगती अन्य।
साधनेतून मिळवून समृध्दी होई तू धन्य।।5।।

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

3)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

जेथे जातो तेथे
तू माझा सांगाती
चालविसी हाती
धरोनिया

तूच असे कर्ता
आणि करविता
तूच पुरविसी सर्व
मनीच्या ईच्छा

कृपा राहो सदैव अशीच
सर्वांवरी चाखूू दे सर्वांना
तुझिया नामातील
अविट गोडी

नामस्मरणी होता चित्त
एकरुप गळूनी जाई
चरणी मस्तक ठेवता
अहंभाव लयास

कोणी नसे मोठा
कोणी नसे छोटा
स्वामीं दयाळू मायबाप
असे सर्व भक्तांचा

सुचविले तुच मज
हे चारशब्द लिहाया
तुजलाच अर्पूनी मागते
आशिष मिळू दे सदा
लेकरांया

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

4)श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

स्वामीविण कोण आता
नच त्राता या जीवा।

मनी ईच्छा धरीता
मजकडून घेतील
करवूनी पारायणा।

मन स्थिर होता
श्री चरणी रत।

होतील मानसिक
कष्ट सुसह्य विघ्ने
जातील कोसो दूर।

पाठी पुढे उभा स्वामी
माझा मायबाप।

त्याच्याचरणी नतमस्तक
होऊनी सदा। स्मरता हृदयी
तयांना। कवटाळूनी घेई मज
कुशीत।

गुरुराया माझा स्वामी
प्राण माझा अंतर्यामी।


स्वामींवर ठेवता विश्वास
जगावेगळी अनुभूती
मिळेल सर्व भक्तांस।

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

5) श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

आपल्याकडे अंतरात असणारा स्वामी नामरुपी ठेवा मुखात आणून जर त्यावर विश्वास ठेवला ना तर या जगातील सर्व दुःखात सुध्दा आपल्याला सुखरुपी फुल उमलेल दिसेल.आणि कितीही अडचणी आल्या तरी नामाचे हे औषध त्यातून संभाळून नेईल.

नको रे मना तू व्यर्थ खंत करु
नको रे मना आसवे ओघाळू

का रे मना तू विचारात राही
स्वामींचा अनुभव घेऊन पाही

नाम बघ तुझ्या अंतरी विसावे
त्यातूनच तुझे भाग्य उजळावे

सद् विवेक बुध्दी जागीराहावी
नामातून स्वामी मूर्ती दिसावी

प्रश्नाचे उत्तर नामातच मिळावे
स्वत्वाला स्वामींत मिळवावे

ठेवता विश्वास सदा स्वामींवर
तेच करती तुमची नौका पार

स्वामीरुपी ठेवा असे सर्वांकडे
स्वामीरुप  दिसे मज चहूकडे

दोन हात जोडिते तव चरणी
सर्वांची सेवा घ्या गोड मानूनी

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

6) श्री स्वामी समर्थ

स्वामीचरणी ठेवा भाव
आपोआप भेटे देव

स्वामी नाम असे पवित्र
नामस्मरणे पालटतसे चित्र

स्वामीनाम मुखी ठेवा सकळ
उभा ठाके समोरी दिनदयाळ

मन होई शांत गाता त्रिपदी
आणि घोरकष्टोध्दरण स्तोत्र

सोडती शरीरा काम क्रोध
दूर पळती मनाच्या व्याधी

कशाचेही न भय मनी धरी
स्वामींना सदैव ठेवा अंतरी

टाळ,मृदुंग रंगले स्वामीभजनी
शरण जाता अश्रू येती नयनी

श्री स्वामी समर्थ

7)श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

जय जय स्वामी समर्थ गजरी
पाहिली दिनदयाळ अन्नपूर्णेश्वरी

धरी भक्तांवर कृपेची सावली
श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलीेे

स्वामीराजांचे सदा स्मरण होई
षडरिपु जाळिता गुरुभेट होई

नामाच्या घोषांने येई शांती शरीरी
देहभान हरपून जागे साधनाअंतरी

आई वडिलांचे असे ऋण मजवरी
याजन्मात गुरुसेवेची मिळे शिजोरी

मी स्वामींची स्वामी माझे मायबाप
साथ स्वामींची असता हर्ष अमाप

कविता स्वामींनी लिहून घेतली
त्यांचीच ही रचना त्यांनाच अर्पिली.

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

8) श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

मनी शंका कुशंका
उगीच का धरीता
नामस्मरण करावे
प्रेमाने सर्वदा

नित्य कर्मातूनी
सदा जपावे
सापडता
थोडा वेळ

व्यर्थ न जीवन
घालविता
स्वामी नाम
जपा सुंदर

श्रध्दा ठेवावी
नामावर सर्वदा
अंतरी स्मरावे
स्वामीवर

आठवा धृवाचा
नाम ध्यास
खेचून आणि
तो नारायणास

घ्या रे स्वामीनाम
करुनी तया वंदन
येता जाता स्मरता
होतील सर्व काम

मानसपूजा करुनी
आणावे मनी स्वामी
अनुभूती मिळे जीवनी
रत श्री स्वामी समर्थ नामी

ध्यानीमनी अंतर्यामी
श्री स्वामी शंकर
दिसे मज मुखावरी
बदलता भाव निरंतर

नामात असे भक्ती
जपता नित्य नियमी
भावना येऊन दाटती
खेचून आणती शक्ती

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

9) श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
स्वामीआई सदा सर्वदा आपल्या बरोबरच असते.ती आपल्या भक्ताला क्षणभरही एकट पडू देत नाही.फक्त तीच असण,सहाय्य करण हे प्रत्यक्षात न दिसता अनुभवाव लागत.आणि हे केवळ नामस्मरणाने,तिच्यावरील विश्वासाने सहज अनुभवता येत.फक्त मनःपूर्वक आणि श्रध्देने हाक मारली ना की उत्तर मिळतच.

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

संभ्रमात असताना मनी
अलगद फिरवून गेला
डोक्यावरुन मायेचा हात
स्पर्शाने स्वामीमाऊलीच्या
शहारून गेले अंतरंग
उत्तर मिळे त्याच क्षणी
नयनात दाटते पाणी
वाटे मज भाग्यवान या जगी
माझ्यासारखी मीच पामर
वाटे कुशीत शिरुन राहावे
असेच स्वामीआईच्या निरंतर
दृष्ट न लागावी तीच्या प्रेमाला
अशीच राहू दे कृपादृष्टी सर्वांवर

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

10) श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
मला सुचत ते लिहिते .ते मी कोण लिहिणारी ती माऊलीच अंतरात शिरुन लिहून घेते.कधी कधी मी एकटीच खूप रडते माऊलीजवळ बसून आपोआप उत्तर मिळून जाते.स्वामी माऊली जन्मोजन्मीची आई आहे माझी. खूप खूप ओळख असल्यासारख वाटत.वडाच्या पारंब्यांबरोबर दोस्ती असल्यासारख वाटत गूढ कळत नाही. मग असच काहितरी काव्य तिच्याच स्फुर्तीने सुचते आणि ते शब्दात उतरते.

स्वामीआईने सुचविलेले
काव्य तिलाच अर्पण.
मज पामराचे नाही हे
शब्द पायीची वहाण
पायीच बरी.कृपाकरी
एवढी साथ न कधी
सुटावी.दिनरात
स्मरणात राहावी
खूण तुझी.अहंकाराचा
न कधी व्हावा स्पर्श
कितीही झाला जरी
माझा उत्कर्ष.मुखातले
नाम सुटू नये कधी
अंती असू द्यावी
नित्य साथ संगती
यावे यावे गुरुवरा
स्विकारावे नमस्कारा
तुम्हाशिवाय न जगी
कोणी या लेकरा
अंतरातून मारी हाक
तूच माझी आई
आणि मीच तुझी
वेडी लेक.जन्माला
येऊनी केली पुन्हा
तुझ्याशीच जवळीक.

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

11)श्री स्वामी समर्थ

हरण्यातूनच माणूस
नेहमीच जिंकत असतो
घडलेल्या चुकांतूनच
खूप काही शिकत असतो

येणारा आजचा दिवस
जर असेल त्याचा
पण जो उद्या येईल
तो असेल माझाच

असाच भाव ठेऊन मनात
निरंतर मनाला सांगायच
आयुष्यात सत्याने पुढे जाऊन
जगाला जिंकून दाखवायच

रडून अश्रू ढाळून
स्वतःवरच का रागावायच
आयुष्यात सर्वच
का गमावून बसायच

फुकटचा सल्ला देऊन
असतात  फसवणारे
त्यातील चांगल वाईट
आपणच जाणून घ्यायच

येणार्या काळजीला
हसून सांगायच
सुंदर आहे जीवन मजेत
भरभरून जगायच

कोलमडून जाण्यापेक्षा
प्रत्येक क्षणाला जिंकायच
वादळातून होडी पार करण्याच
धैर्य भगवंताकडे मागायच.

प्रयत्नांना जोड द्यावी कष्टांची
ईच्छा धरायची  मनात
फिनिक्स पक्षासारखी राखेतून
जिवंत भरारी घ्यायची

धीटपणाने कष्टांच्या वाळूत
पाय भक्कम रोवून उभ राहायच
स्वामीकृपेने मिळणार्या विजयाला
दोन हात पसरुन हळूच कवेत घ्यायच

श्री स्वामी समर्थ

12)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

जेव्हा येईल आठव मनात
जीव ओतावा स्वामींरायात

प्रत्येक गोष्ट करावी सांगून
मनोमनी स्वामींशी बोलून

साठवावे स्वामीरुप नयनांत
जेे मनी वाटे ते अर्पावे स्वामींस

असे गुंतवावे मनास स्वामींचरणी
जसे भ्रमर गुंते फुलात मधुकारणी

देहाने करुनी पूजाआरती स्वामींची
मन मात्र फिरती करते चहूबाजूची

असे करता व्यर्थ तीे पूजाआरती
ज्यात देहमन एकचित्त न होती

एकचित्त होऊनी करीता मानसपूजा
पोहचूनी स्वामींस मिळे शांती काजा

रोजच्या नित्यकर्मी काढूनी थोडावेळ
गुरुचरणी नामरुपी अर्पावे  कमळ

लाभेल गुरुची करीता सद् भक्ती
कृपाप्रसादे मिळेल सद् विचारशक्ती

मिळे मानवजन्म न घालवी वाया
सत्कर्म करता उध्दरुनी जाईल काया

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

13)श्री स्वामी समर्थ

होते मन अती दुःखी
त्रासून जाई अंतःकरण

लागता मना गोष्ट काही
तेव्हा गळा येतो दाटून

हट्टी मना न पटता विचार
भावनांचा होतो कल्लोळ

विचारांचे होता द्वंद्व मनी
अहंकार तो फणा उभारी

आपले करती मनावर घाव
कुठे करावी सांगा तक्रार

असे दोन गोड शब्दांची आस
समजून घेण्या लागती सायास

अशावेळी आठवणी येती दाटून
आठवे मैत्रीचे दिलखुलास संभाषण

गेले दूर ते पारिवरिक हसरे क्षण
राहीली शाब्दिक चकमकीची खूण

अशा आठवणींना फुटता पाझर
अवचित अश्रू ओघळती गालावर

जगात कॉपी-पेस्टचा चाले बाजार
भरडून जाती लिहिणारे खरोखर

सत्याने जगणार्यास जे मागती आधार
अशांने मन होई स्वामीचरणी स्थिर

स्वामीनाम हाच एक असे माझा ध्यास
जाऊ दे सर्व मनातून शरण मी स्वामीपदास

श्री स्वामी समर्थ

14)श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

जोडले जे नाते स्वामींशी कायम
त्याला न गरज नाव देण्याची

न सांगता जुळणार्या नात्यांची
परिभाषा असे काही वेगळी

स्वामीमाऊलीचे नाते अतूट
होई दुःखी मन होता ताटातूट

मुखात नाम न आठवता रुप
कासाविस होई जीव हा खूप

जन्म हा असे पाण्याचा थेंब
वेळ दवडता सत्कर्म जाती लांब

स्मरा स्मरा रे स्वामी दत्तात्रय बोला
आनंद मिळून मिळे शांती जीवाला

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

15)श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
सिध्द करुनी मंत्र जपता, येई जीवनी अर्थ

कलियुग असे चालले ,दुर्जनांचे जाळे पसरे
सज्जनांना या आपत्तीतून, नामजपच तारे

विपरीत काळ असे ,होती कलह आणि वाद
कलीच पुरवी शक्ती ,स्वैराचार व भ्रष्टाचारास

मन कायम चंचल ,स्थिर न राही बुध्दी क्षणभर
अंतर्मनात सदा कलिचा, सुसाट असे वावर

काम,क्रोध,मद,मत्सर, रुपे फिरे शरीरभर
नित्यजीवनी सोडून सत्कर्म, प्रभाव अहंपणावर

अहंकाररुपी कली, मानवाच्या बसे मानगुटीवर
प्रत्येक कर्मा लावी ,तो मीपणाची  झालर

सदाचार पावूनी नष्ट, दुराचार फिरे घरभर
जप,पूजन,किर्तन,दान करण्या लागे आधार

यासर्वां दूर सारण्या नाम एकच असे चमत्कार
नामाच्या स्वाधीन करता कलीरुपी मी जाई दूर

स्वामीनाम रुपी साधनेचा,घेऊनी बघा हो ध्यास
पार करुनी या सागरा ,जन्म मरणाच्या फेर्यातून
सुटाल खास

सदा नाम ठेवता, ओठावर श्री स्वामी समर्थांचे
आठवून शेवटच्या क्षणी, सार्थक होईल जन्माचे

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हसत
खेळत नाम घेता पळून जाई कली अहं शोधार्थ

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर

16)श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर

स्वामी माझे चित्त
राहो सदा निर्मळ
मिळो परम आनंद
तव नामी रंगण्यात
           
                     दिसो माझे डोळा
                     सुंदर तुझे रूप
                     पाहता तुज नित्य
                     ठसूनी राही नयनात

तूच वससे ठायीठायी
प्रत्येक भक्ताच्या हृदयी
प्राणीमात्र वृक्ष वेली
चल अचल सृष्टीत

                     तूच असे देणारा
                     न मागता सर्व देई
                     तूच असे तारणारा
                     रक्षण करी संकटात

सत्ता तुझी सर्व जगती
लेकरावर राहो कृपादृष्टी
खंड न पडता उपासनेत
मन रमू दे तव चरणात

              धन्य झाले मी जीवनी
              भेटतसे मज रात्रंदिनी
              नित्य गुरुसेवेचा प्रसाद
              मिळावा जन्मजन्मांतरात

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर

17)श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

अशुभ गोष्टी शुभ होती खास
स्वामींवर ठेऊन पहा विश्वास

लागती नवग्रह न पाठीशी
काम क्रोध अर्पिता श्रीचरणांशी

संकटातून सुख घालते मिठी
स्वामींचा आशिष असता पाठी

काळवेळ न कदापी बाधती
स्वामीं पदकमली ठेवता प्रिती

पळती विघ्ने दाही दिशा
स्वामीसेवेची चढता नशा

तन मन धन एक करून
स्वामींगुरु चरणी अर्पावे मन

ठेवता शुध्द मन सर्वकाळी
सद्गुरुं राहती सदा जवळी

एक एक फुल गुंफून माळेत
नामी राहूनी स्वामींना ठेवी हृदयात

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर


18) श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

प्रसन्न वदने प्रसन्न होसी
निजभक्तांवर कृपा करसी

तुज चिंतता मंगल करसी
जगदंबे स्वामीमाऊली तू

कधी अंतराचा ठाव घेसी
समझत नसे या पामरासी

नमूनी मागते तव चरणासी
तव नामस्मरणी गति मिळू दे
या दिन शरणागतासी

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

19)श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

शरणागत मी तव पाया ।
धाव धाव घेई रे गुरुराया।

गुरुविण मन विसंबे न क्षणभरी।
करुणा भाकूनी आळवी निरंतरी।

करीत तव मनापासूनी सेवा चाकरी।
समजे न मज देवा चूक बरोबरी।

तूच करवूनी घेसी सेवा माऊलीची।
जिने बाळपणी वाढवले या जीवासी।

व्हावा न त्रास तीज या उतारवयासी।
स्थिर होऊ दे मन तिचे तव पदासी।

प्रारब्ध भोग कधी कुणा न टळले।
तुझ्या हातीच असे आयुष्याचे दोरे।

दिनदयाळा भक्तवत्सला दिनानाथा।
पावन करुनी जीवन या जीवा उध्दरा।

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

20)श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर

हे शंकरा मनी वसती करा
करुनी कृपादृष्टि दिनावरी
धाव धाव घेई झडकरी
सत्वर मायामोहबंधनाचा
पडो विसर

शंकर शंकर नाम शुभंकर
मनातून आले अलगद बाहेर
वाटे तुझ्यातच मी निरंतर
विलिन होऊन जाते पळभर

नाम शंकर मज आधार
हीच माझी खूण खरोखर
याजन्माची भेट आपुली
चांगल्या कर्मांची यादगार

हरीहर असती महाराज शंकर
वरुन दिसती एकदम कठोर
अंतरी लोण्याहून प्रेमळ शक्कर
भक्तावर त्यांची घारीची नजर

गिरनारी भेटती दत्त-शंकर
तेजाचा प्रकाश हा सभोवार
दिपून जाई मन होई उध्दार
साक्षीला असती कडेकपार

साद घाले मज गुरुशिखर
गुरुचरणा भेटाया आतूर
कृपा करावी स्वामी मजवर
आळविते तुज स्वामीशंकर

नमो नमो गुरु स्वामी मंगेशा
कर्ताकरविता तूच यतिवर
तुज अर्पिते कवनांचे भांडार
गोड मानूनी घ्यावे सत्वर
नतमस्तक मी तव चरणावर

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर

21)श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

साद घालत जा स्वतःला
                 हे  मना तू
बोलले काही कुणी तरी
                हसत राहा

तूच बोल तुझ्या बरोबर
             काय सांगावे
मिळेल  तुझिया प्रश्नाचे
             छानच उत्तर

खोलून अंतर्मनाचे व्दार
               शोधित जा
तुझ्यातील सुप्त गुणांचे
            पैलू अपरंपार

परिक्षाच ही असे एकूण
         जगताना जीवन
रोजचे नविन दिवसाला
          दाखवावे पेलून

आजचे  नसे  उद्या  काही
         चक्र फिरते हे असे
आयुष्याच्या खडतर क्षणी
          मजेत जगावे कसे

नित्य  नवे  जीवन  जगणे
        रोज काही वेगळेच
घडून गेलेली प्रत्येक गोष्ट
          तळमळीने बघणे

कानी पडती ते आवाज
         अंतरातील बोल
स्वामीनामात  बुडालेले
         जाऊनी सखोल

एकदाच अहं ला पारख
         मनातल्या मनात
सोडून  दे त्याला तिथेच
       मग जग आनंदात

सुंदर निळ्या आकाशात
            विहरत राहावे
स्वामीनाम सर्व हृदयात
            जाऊन पेरावे

कधी तरी  एक  दिवस
           येईल तो क्षण
स्वामी समर्थ म्हणताना
    प्राण जातील निघून

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

22)श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

देव नसतो रे बसलेला

मंदिराच्या गाभार्यात

तो तर असे वसलेला

दिनदुबळ्यांच्या मनात

मदत करता तुम्ही त्याला

हास्य उमटेल डोळ्यात

तिथेच दिसेल देव तुम्हाला

त्याच्या प्रसन्न झालेल्या चेहर्यात.

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

23)


श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

घाल घाल पिंगा वा-या।
स्वामींआईच्या दारात ।
मन मोग-याच्या सुवासाने ।
कर स्वामीसेवेची बरसात ||1||

मंद केसरी सुगंधाची।
लागता चाहूल हवेत।
स्वामींच्या आगमनाची ।
प्रत्यक्ष खूण पटे अंतरात||2||

आठव येता स्वामींआईची।
नयनात पाणी दाटून येत।
स्वामीनामाच्या गजरात।
मन धुंद होऊनी नाचत||3||

स्वामीं अस्तित्व दाखवूनी।
प्रचिती सदभक्तास देत।
प्रारब्धाचे भोग भोगण्या।
नामामृताचे अमृत पाजीत||4||

धन्य धन्य तो स्वामीभक्त।
जो सर्वस्व स्वामींना अर्पित।
स्वामींच्या ईच्छेला मानून।
आनंदाने आयुष्य जगत||5||

स्वामींनी सुचविलेल्या।
ह्या नामाच्या चार ओळी।
स्वामींना शरण जाऊन।
अर्पिते स्वामी पदकमलात||6||

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

24)

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

सुंदर विष्णूरुप स्वामींचे पाहीले
चित्त प्रफुल्लित जाहले

अंतरात स्वामीराय विसावले
गुरुरुपी नारायणा चित्ती ठसवले

ध्यानी मनी स्वप्नी नाम गुंफले
स्वामीकृपेत जीवन भिजले

भिऊ नको मी असे सदा पाठीशी
स्मितहास्य करुनी स्वामी वदले

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
वैशाली कुळकर्णी
25)

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

मार्ग नसे आणिक  संसारी
स्वामीविण न दिसे आसरा

भय चिंता कसली करता
स्वामीराज असता सोयरा

दुःख संकटी स्वामी माझा
सखा सोबती मित्र खरा

पार करवितो नौका देऊनी
स्वामीनामाचा प्रवास झरा

मुखाने स्वामीनाम घेता
स्वामींच दिसतील अंतरा

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
वैशाली कुळकर्णी

26)

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर

सरत चाललय आयुष्य
स्वामी नामाच्या सानिध्यात
भाग्यवान मी या संसारी
स्वामी नाम राही सदैव ओठात

तळ्यात आणि मळ्यात एक
असे नसते मज वागायचे
जे काही आहे ते स्वीकारुन
आनंदाने जीवन पार करायचे

स्वप्न सत्यात उतरावे मनाचे
न मागता सर्व काही मिळाले
स्वामींनी सेवेची संधी देऊन
अलगदपणे स्वतःमध्ये सामावले

कशाला पाहिजे वैचारिक व्दंव्द
स्वामींवर विश्वास हीच माझी जिद्द
शांतपणे करावी उपासना नित्याची
नकळत पूर्ण होती सेवा कर्मे रोजची

इच्छा आहे स्वामी माझी एकच
शक्ती दे मज इतकी भरपूर की
तू घेतलेल्या परिक्षेत सफल होऊन
तुझ्या कुशीत शिरायला येईल बळ

मी तू पण काढून घे पदरात चुका
मनात नसते तरी बोलत करतोस कसा
नको स्वामीराया आता पुरे झाले हाल
शांत कर जीवा नाम राहो मुखी सर्वकाळ

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर

27)

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

जिकडे पाहावे तिकडे
माझा स्वामीराया
उभा दिसे।
डोळे भरुन
स्वामीरायाला
बघत मी राहतसे।
तेजोमय रुप तुझे
दाही दिशानां
भरुन पसरतसे।
जिकडे पाहावे
तिकडे
सारखाच मज
दिसतसे।
लेकरांवर ठेऊनी माया
सदासन्निग्ध सर्वांच्या
अंतरी वसे।
स्वामी समर्था
मायबापा तुझ्या
भक्तित मन झाले
वेडेपिसे।
हात जोडूनी
मागते मागणे
एकदा तरी
तुझ्या तेजात
सामावून घ्यावे
ही मम अंतरीची
आस असे।

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

28)

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

शरीर रुपी
नावेतून
करु आत्म्याचा
प्रवास

क्षणाक्षणाला
घेत जाऊ
स्वामीनामाचा
ध्यास

शरीरातून हळूच
जाता अंतरात
प्राणशक्तीच्या
जाऊ दारात

ध्यान लावता
स्वामीनामाचे
प्रगट होई
स्वामीशक्ती

मन अर्पण
करु स्वामींना
नामाला बसवावे
श्वासामधी

श्वासातूनच
स्वामीनाम
होतसे स्थिर
अंतर्मनी

गुरु परब्रम्ह
तोच परमेश्वर
नामातच बांधूनी
ठेवावे शरीर

ऐक ही नामाची
कहाणी सुंदर
हाक मारिता
उभा जगदीश्वर

नामरुपी देह
नामातच ज्ञान
नाम मुरविता देही
लया जाई अज्ञान

सुंदर नश्वर देहात
प्राणच ईश्वर
ध्यानीमनी माझ्या
स्वामी प्राणेश्वर

जाऊ स्वामींच्या गावा
स्वामी नामात रंगून
सदा शरणागत राहून
धरु स्वामींचे चरण

स्वामी लाभता जीवा
होई आनंद परमानंद
स्वामी स्वामी म्हणूनी
घालिते लोटांगण

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
वैशाली कुळकर्णी

29)

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर

मावळताना रवी
फेकी एक दृष्टी
दिवस संपून मंदसंध्या
समयी होई मन कष्टी

होई सांजवेळी
रंगांची उधळण
वाटे जणू अबंर येई
पंचरंगी शाल पांघरुन

कलाकृती उभी करती
मेघ सर्व मिळूनी
प्राणी,पक्षी देवतांचे
चित्र रेखाटूनी

गुलाबी पिवळा मंद
प्रकाश पडे भूवरी
मनी होई चलबिचल
जीवनाचे मर्म कळे येथूनी

जाती पक्षी सांजसमयी
आपुल्या घरट्याकडे
आयुष्यातील खेळ खेळूनी
जायचे असते गुरुचरणांकडे

जीवनातील कर्म सारे असे
रवि उदय अस्तामध्ये
जाणून घेरे माणसा तूच
अनंताचे रहस्य ध्यानामध्ये

सोडू नको ध्यास तू
नामात राहण्याचा
बघ एक दिवस येईलच
स्वामीमय होऊन जगण्याचा

अनुभव हा असे माझा
शोधून न सापडणार
शब्दाशब्दातूनी मनाला
स्वामीच आतुरतेने भेटणार.

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर

--  वैशाली कुळकर्णी--
29)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

सद्गगुरुराया तुझ्या
प्रेमाचे पांघरुण
पांघरावेस या
पामरावर रात्रंदिन

नामातून होऊ दे
मन विचारशून्य
तूच एक आधार मज
संसारी न कोणी अन्य

नको दुजे काही
मज लाभो समाधान
अहंकाराच्या भोवर्यात
न सापडो जीवन

कडक शब्दांचे
चपराक देऊन
लचके तोडताना
न ठेवती भान

क्षमा करुनी तयांना
देई सत्य असत्याचे ज्ञान
सदा कर रे रक्षण
तुझ कवच घालून

एक एक पायरी
नामाची चढताना
न पडो रे विसर राहा
तू अंतरी सदा विराजमान

सद्बुध्दी देई मज
सदा नामात राहिन
दिन दुबळ्यात सर्वदा
तुलाच रे मी पाहीन

मनातले चार शब्द
तुझ्या कृपे उतरले पानावर
सुचित करणारा तूच
असे माझा परमेश्वर

भावसुमनांचे रिंगण
अर्पिते तुजलागी
गोड मानूनी घे रे
तुझेच शब्द सर्वकाही.

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

वैशाली कुळकर्णी

30)

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर

कष्टलो फार त्रास होई जीवाला।
पहाता मी मम स्वार्थ भावना।
होती मनाला असंख्य वेदना।
हे स्वामीराया सोडवी या बंधना।। 1।।

ओढ मज प्रपंचाची लागते।
नाश असे हे माहित असते।
तरी मनाला कधी कळेचना।
हे स्वामीराया सोडवी या बंधना।।2।।

तापदायक विचार मना जाळती।
राग लोभ अहंभाव जीव घेती।
मनास स्थिरता जराही मिळेना।
हे स्वामीराया सोडवी या बंधना।। 3 ।।

लोभ मोह माया सदा आठवे ।
त्यास पकडूनी ठेवणे आवडे।
तुझे नाम घेण्यास आठवेचना।
हे स्वामीराया सोडवी या बंधना।। 4 ।।

माय बाप बंधू बहिण नाती।
सर्वात तूची भरुनी राहसी।
नतमस्तक सदा तव चरणांसी।
हे स्वामीराया सोडवी या बंधना।। 5 ।।

म्हणवी चार लोकांत तुझा सेवक।
जाणून असशी तूज नलगे सांगत।
भक्ती शक्ती दे तुज असे मागत।
हे स्वामीराया सोडवी या बंधना।। 6 ।।

किती रे करावी मी उपासना।
तूच साथ देसी हे कळचेना।
का होतसे मनी संघर्ष भावना।
हे स्वामीराया सोडवी या बंधना।। 7 ।।

दुःख भोगले विषयात राहूनी।
मी कर्ता वृत्ती सदा रुजवूनी।
नको वाटे जीवा ही अहंभावना।
हे स्वामीराया सोडवी या बंधना।। 8।।

डोळे थकले तुझी वाट पाहता।
हे स्वामीनाथा जाणसी सर्वदा।
कधी येसी तू संसारभ्रम निवारण्या।
हे स्वामीराया सोडवी या बंधना।। 9।।

मायातीता तूच मनी डोकावीसी।
मोहजालात तू गुरफटूनी टाकसी।
कसे गुंतते मन हेच समझेचना।
हे स्वामीराया सोडवी या बंधना।। 10 ।।

जीवन नच पुरे होतसे तुज शिवाय।
साधाया स्वहीत नच कळे पर्याय।
आनंद न होता मना होती वेदना।
हे स्वामीराया सोडवी या बंधना।।11।।

तुच सुचविता मम असे रे धनी।
तू ज्याच्याकडे त्यास काय कमी।
तुज न देखता स्मरण सदा करे मनी।
हे स्वामीराया सोडवी या बंधना।।12।।

जगाचा असे नाशिवंत पसारा।
नटरंगी दुनियेत कुणाचा कोणीना।
दर्शन देऊन दे चरणी आसरा दिना।
हे स्वामीराया सोडवी या बंधना ।।13।।

मन कठोर तू कधी न करावे ।
मज अंती सर्वदा तूच दिसावे ।
काय करु मी पण धीर सोडीना।
हे स्वामीराया सोडवी या बंधना।।14।।

स्वामी शंकरा तव नाम आवडी।
स्वामीनामाची गोडी अविट लाभली।
प्रार्थना करता विचारात येई चेतना।
हे  स्वामीराया  सोडवी  या  बंधना।।15।।

थांब  थांब  रे  नकोच जाऊ दूर।
तुझे स्थान असे मनमंदिरी स्थिर।
एकच  ध्यास  तव  नामाचा जरूर।
हे स्वामीराया सोडवी या बंधना।।16।।

वाचवी आता या भवसागरातूनी।
तूच एक आधार जाणिले मनी।
नामातच तुझ्या मम श्वास राहिला अडकूनी।हे स्वामीराया सोडवी या बंधना।।17।।

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर

31)

श्री स्वामी समर्थ जय शंकर

आले घरी श्री शंकर बाबा
मायेचे कवच मिळाले जीवा

डोळ्यातून प्रेमाची साक्ष घडे
तुज शिवाय मज चैन न पडे

गुजगोष्टींना एक धार चढे
नकळत आसवांना वाट मिळे

धुवून जाता मनाचे कोपरे
त्यात स्वामीनामाची हवा भरे

नटविता महालक्ष्मी स्वरुपी
अद्भूत रुप बसविले हृदयी

ओटी भरुनी शक्ती स्वरुपाची
आशिष द्या दिनदुबळ्यासाठी

चारमिनार न ओढता येई वास
आजूबाजूला होतात भास

खिचडीची मेजवानी खास पुरवती सेवाव्रताची भूक

थोपवती विरोधी आक्रमणास
दाखवून देती स्वतःचा राग

वायू घालती लोटांगण चरणी
पाहूनी स्वामीरुप आले सदनी

घेऊनी सोबत गजाननबाबांस फोटो रुपे आगमन होई घरात

वर्ष कधी होई नकळे मनास
आठवती सर्व गोष्टी मनात

ओवाळीते नजर काढूनी
अर्पिते सर्व भूलचूक चरणी

शंकरगीता पारायण सेवा
घ्या गोड मानून या मंगलदिनी

धन्य जाहले जीवन लाड पुरवी येऊन प्रत्यक्ष नारायण

आणखी काय पाहिजे जीवा
आशिर्वादाचा हस्त सदा असावा.

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

वैशाली कुळकर्णी

32)


श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर

स्वामी शंकर नच वेगळे ।

भेट देती कुणासही नकळे।

आठव येता जीव कळवळे।

भाग्यवान ज्यांना हे कळे।

नजरेत दिव्य स्पंदन आगळे।

येता नयनातूनी अश्रू ओघळे।

माऊली तुजवीण कोणा वळे।

अंतरी मी सदा स्वामीशंकररुप पाहिले।

शंकर नामाचा महिमा गाती भक्तगण सारे।

संचाररुपी स्वामीशंकर रुप अवतरे।

त्याच्याचरणी नतमस्तक होती सगळे।

त्रिगुण रुपी ईश्वरा पाहाण्या हा जीव तळमळे।

भेटता शंकर बाबा ज्याची त्याला खूण मिळे।

श्री गुरुदेव दत्त  श्री स्वामी समर्थ जय शंकर

वैशाली कुळकर्णी

33)

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

घासून,तासून, तोलून, मापून|
उच्चारावा शब्द बोलण्यापूर्वी|
शब्दा शब्दागणिक स्वामी स्वामी|
म्हणावे पाउलपुढे टाकण्यापुर्वी ||

शब्द असती कातर तेची सुईदोरे |
बोला ते मोजून खमंग खमके|
भान देश,काळ व्यक्तीचे ठेवावे|
 उच्चारी स्वामी नाम उध्दरी मना रे||

सांगावे  खरे  बोलावे  बरे |
बोलण्यापूर्वी विचार करा रे |
पडू देवू नको मनावर चरे |
मनात येता असे विचार रे|
स्वामी नामाचा तू जप कर रे ||

वर्मावर कोणाच्या ठेवू नये बोट |
व्यंगावर  कधी हसू नये थेट|
जातपात धर्म काढू नये स्पष्ट |
स्वामीनाम जपता दूर होती कष्ट||

संभाषण करता थोडके समजणे|
थोडके समजावणे, मुद्देसूद बोलणे|
असावे सदा वाचाळ मधाप्रमाणे|
जगत  रहावे स्वामी नामाकारणे ||

विद्या, काम,भक्ती तळपते शब्दातुनी|
शब्द हा उत्पन्न व्हावा अनुभवानी|
शब्दामुळे दंगल,शब्दामुळे मंगल|
सावध राहून शब्द जंजाळातूनी |
स्वामी नाम जपावे अखंड जीवनी ||

शब्द बेतावे शास्त्राभ्यास करोनिया|
आपल्या जीभेवरी ताबा ठेवूनिया |
जगी सर्व सुखी असे जो प्राणीया|
वाणीतून उच्चारी शब्द जपूनिया |
त्याला मिळते मुक्ती स्वामी पदीया||

आचार विचार होती शुध्द सत्य|
अशक्य त्या गोष्टी होतात शक्य|
मोहक रुप ते स्वामींचे दिसे नित्य|
मन होवून धुंदीने गात होतसे धन्य|
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ||

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
वैशाली कुळकर्णी

34)

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

करिता स्वामींदत्ताचे ध्यान
मिळे चित्ताला नित्य शांती

जीव शिव होऊनी जाता एकरुप
कायावाचामन अनुभवे परमशांती

स्वामी हो गर्जूनी घालता साद
स्वामी ठायी उफाळून येई प्रिती

स्वामींच माझे असती ब्रम्हांडनायक
स्वामीनाम  घेता मिळे जीवनमुक्ती

तन मन माझे स्वामीमय होता
कळीकाळाची मज न वाटे भिती

बोलावूनी घेती स्वामी दर्शनासी स्वामीदत्त नामाशी करीता दोस्ती

दिन दुबळ्यांच्या देता घास मुखी
मन येई उचंबळून डोळे भाव टिपती

स्वामीशंकरदत्त माझे सर्व काही
शरण जाता नजर चरणी स्थिर होई

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

35)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

मी न माझी राहिले एक स्वप्न सत्य जाहले
डोळे भरुन पाहता स्वामी मलाच पाहून हसले

मनात सतत स्वामीनाम चक्र तीव्र गतीने चाले
मन स्वामी सेवेसाठी जनात ओढ घेऊ लागले

संसारी रमेना मन व्याकुळतेने काठोकाठ भरले
भुकेल्या जीवा घास देता मज स्वामी राम दिसले

मन छोटा काजवा होऊन उंच उंच गगनी उडाले
प्रकाश स्वामी नामाचा देण्या जनात चमचमले

मन स्वामींच्या कानीचा डूल होऊनी डोलले
श्री स्वामी समर्थ नामात जीवन जोरात चालले

स्वामींच्या गळ्यातील माळेचा मुकुट मणी झाले
गळी शोभूनी स्वामीनामसेवेत बुडूनी साक्षी झाले

मज दिन दुबळ्यात स्वामीच दिसती वसलेले
गरजूनां मदत कराया भाग्य स्वामीनी दिधले

स्वामी गुरुमाउली अचानक पुढे उभे ठाकले
काही न समजता मन आनंदे अश्रूंसह बरसले

स्वामी चरणी नतमस्तक होऊनी मी धन्य झाले
समर्पूनी तुझे तुलाच चारीधाम मज इथे लाभले

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

@वैशाली कुळकर्णी

36)

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

रात्रीच्या या गर्भातून
उगवते सुंदर पहाट
स्वामी नामवेडातून
उभरते स्वामीभक्ती अफाट।

वळणावळणाचा घाट
सोबतीला सरळ वाट
प्रपंची परमार्थ साधणे
कसोटी असते खास।

कलेने वाढे जेव्हा चंद्रबिंब
तेव्हा पुनवेला चमके पूर्णचंद्र
भक्तीने चंदन उगाळता
पसरे जनीमनी स्वामीगंध।

भरती ओहोटी यातून
सागर निघतो ढवळून
त्याचाच दिसतो परिणाम
माणसाच्या मनामनातून।

लांब झुकलेले क्षितिजाशी
म्हणून ते आकाश  असते
क्षितिजा अलिकडे पलिकडे
नाम काठोकाठ भरुन उरते।

प्रेम आसवांनी जोडले जाते
क्षणोक्षणी जीवन रंग बदलते
सुख दुःखात सदैव साथीला
स्वामींशी केलेली मैत्री असते।

यशापयशाच्या चढणीवर
घालता स्वामीना साद
आयुष्याच्या देवघेवीतून
मिळे चरणी शांती सहवास।

सुचलेले चार शब्द
विरुन जातात क्षणात
कवितेची माला अर्पिते
स्वामी घ्याहो पदरात।

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

®वैशाली कुळकर्णी

37)

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

मन आहे आरसा
हे तू जाणून घे
विचारांना हसत
नामाच्या ओटीत घे

किती आहेत गोष्टी
पारख स्वतःला जरा
नको फिरवू नजर
स्वामी घेतील खबर

कशाला आलो
या सुंदर जगती
का वागतो असे
असता स्वामी सोबती

मी माझे सतत करत
स्वतःत गुंतून वाढे मीपण
आयुष्याचे क्षण न क्षण
व्यर्थ स्वामीनामाविना आपण

इथेच कमवून पैसा
इथेच सोडून जायचा
गुंतून त्यात न पडता
ध्यास घ्यावा स्वामीसेवेचा

मिळत जाते सुख
मनासारखे जगून
पण दुःखातच मिळे
स्वामी नामाची ऊब

आज तुजकडे आहे
उद्या जाई दुजीकडे
हेच ते जीवाचे सत्य
स्वामी माझे हेच खरे

दिलेले शरीर असे धड
कोणाच्या उपयोगी पड
दिन दुबळ्यात राहूनी
घट्ट करी स्वामींची पकड

नको म्हणू कधी नाही
समोर येणार्या घास देई
मनी समाधान भरूनी राही
चित्त स्वामीमय होई

देह नसे हा शाश्वत
कधीतरी जाणार
साथीला शेवटी
स्वामी नामच येणार

स्वामी तुमचेच शब्द
तुम्हांलाच अर्पण
स्वामीमय होऊन
राहो माझे जीवन

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

®वैशाली कुळकर्णी

38)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

स्वामी समर्था तू
असे माझा त्राता
सांभाळ या तुज
लेकराला आता।

घडूनी गेल्या गोष्टी
मज अजाणता
विचारात न राही
रे मज स्थिरता।

शब्दाच्या जंजाळात
असे गूढ जटीलता
गुंतूनी मन वेडावते
लिहिण्याकरीता।

मनात वसे स्वामी
ओढ अंतर्मनाची
नाही मज खोड
कोणा दुखावण्याची।

मान यश किर्ती
नको रे मज सर्वदा
तुझिया सेवेचे मज
वेड लागे अनेकदा।

माझे मन ओढ
घेई तुझिया नामी
आस आणि ध्यास
तव चरण धामी।

मनी चिंतनी स्वामीराम
त्यावीना नसे दुजे ध्यान
स्वामी नामाच्या विचारात
स्वतःला टाकी बुडवून।

नको रे मला येथे काही
विसावा तुझ्या चरणी पाही
किती सांभाळी तू आई
चुक माझी पदरात घेई।

नाही मनी असे आकस
कोणा बद्दलचा  त्रास
सदैव राहो स्वच्छ मनात
तुज चरणी येण्याची आस।

माफी द्यावी स्वामी आई
मजकडून जाहलेल्या चुकांची
परत घडणार न असे काही
याची काळजी मी घेई।

आता इतुकेच ध्येय उरले
स्वामी नामातच राहावे
सदा सर्वदा स्वामी सेवेत
राहूनी जीवन सार्थकी लावावे।

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

® वैशाली कुळकर्णी

39)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

जय जय स्वामी समर्थ गजरी
पाहिली दिनदयाळ अन्नपूर्णेश्वरी

धरी भक्तांवर कृपेची सावली
श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलीेे

स्वामीराजांचे सदा स्मरण होई
षडरिपु जाळिता गुरुभेट होई

नामाच्या घोषांने येई शांती शरीरी
देहभान हरपून जागे साधनाअंतरी

आई वडिलांचे असे ऋण मजवरी
या जन्मात गुरुसेवेची मिळे शिजोरी

मी स्वामींची स्वामी माझे मायबाप
साथ स्वामींची असता हर्ष अमाप

कविता स्वामींनी लिहून घेतली
त्यांचीच ही रचना त्यांनाच अर्पिली.

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
वैशाली कुळकर्णी

40)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

मी आणि तुम्ही नच वेगळे
माझे मन मी तुम्हालाच वाहिले
तुमचे माझे नाते जगावेगळेे
तुमच्या नामाने मज वेड लावले

अनोखेे क्षण असती भारलेले
नामाच्या अनुबंधाने व्यापलेले
नकळत मनभर विखुरलेले
आतल्याआत तुमच्यात मिसळलेले

स्वप्नांच्या नगरीत जाऊन आलेले
रात्रीच्या गर्भातील नामात भिनलेले
काळोखात विचारांची मीठी सोडलेले
उगवत्या सूर्याबरोबर स्वामीमय झालेले

मनातले भाव अश्रू होऊन ओघळले
आठवणींच्या ओझ्याखाली राहिले
मनाच्या वेदनाना स्वामीनामात बुडवले
हळव्या मनाला आधार स्वामीच झाले

साथ तुमची निरंतर पाहून मन सुखावले
तुमचे माझे हे भेद कायमचे शांत झाले
शरण जाऊन स्वामींना नतमस्तक झाले
मीपणाच्या द्वंदाला स्वामीनामाने उध्दरले।

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

©वैशाली कुळकर्णी
41)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

येऊ देत आयुष्यात अडचणी अमाप
लागू दे विचारांची रांगच रांग खूप

पण हे मना एकचित्त सोडू नको
स्वामींनाम जपण्याचे विसरु नको

पुरवून स्वामीनामांवरच्या प्रेमाला
हात दे तू दिन गरीब जीवाला

कोणत्याही रुपात स्वामी धाव घेतील
त्रास सहन करण्यास तुला बळ देतील

जे घडावे अस त्यावेळी वाटत असते
स्वामीपरिक्षेत त्याच्या विरुध्द घडते.

स्वामीनामाचा करुन बघता प्रवास
तेच घडवते मनीच्या गोष्टी खास

मान राखता मोठ्यांचा सर्वदा
नामातून स्वामी हाक ऐकती सदा

गोड नाम मुखात ठेवत जपूनी मन
स्वामीसेवेत अर्पावे सदा तनमन

अनुभवातूनच शिकावयास मिळत असते
हळूच विचारी मनच स्वामींशी एकरुप होते

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
वैशाली कुळकर्णी
42)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

तूच आहेस स्वामीराया माझ्या
मनामनातील स्पंदनांचा विश्वास।

तूझाच असतो नित्य दोन
श्वासांतील अंतरामध्ये वास।

तूच ओळखतोस मनातील
भावनांच्या वर्तुळाचा व्यास।

तुझाच विचार मनाला देतो
जगण्यासाठीचा उल्हास।

तूच स्वामीराया सखासोबती
जो देतो अचूक सल्ला या जीवास।

तुझ्याशीच भांडून करते मनमोकळ
तूच देतोस प्रश्नाचे उत्तर विनासायास।

सर्वांच्या मनामनात फिरुन स्वतःतील
आत्म्याचा चमत्कार दाखवतोस खास।

तूच आहेस माझा परमेश्वर ज्याच्या
नामात रमता विसर पडे या पामरास।

जन्मोजन्मींची पापे सरली तरच
भेटते स्वामीमाऊली सदभक्तांस।

विनम्रतेने शरणागत मी परमपित्याला
अर्पिते या मनातील भावसुमनास।

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
वैशाली कुळकर्णी
43)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

नामस्मरण सदा असे कल्याणकारक
नित्यनेम ठेवूनी सकाळ,दुपार,संध्याकाळ
नामस्मरण करावे स्वामींस आठवूनी।।१।।

सुखात,दुःखात ,उद्वेग,चिंता व आनंद,
वादातही नामस्मरणास कधी न जावे विसरुनी।।२।।

ताकद,वैभव,सत्ता अनेक गोष्टी असता
अत्युच्च यश मिळे तरी नाम न द्यावे सोडूनी।।३।।

बोलता,चालता,खाता,पिता,काम करता
अनेकविध भोग भोगिता नाम  यावे आतूनी।।४।।

असे नामस्मरणास वेळोवेळी घ्यावे
सद्गगुरुचरणी  विनम्रभावे शरण जावे अंतरातूनी।।५।।

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

@वैशाली कुळकर्णी.

44)
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर

तुझिया कृपेची बरसात ।
होऊ दे नित्य शिरावरी।
हे स्वामी समर्था शंकरा।
मजवरी अशीच कृपा करी।
हे स्वामीराया छत्र धरी सर्वांवरी।।१।।

दिसती तव चरण नित्य
श्वासात वसे श्रीस्वामीसमर्थ
गुरु नामाविण जीणे व्यर्थ
सदा नामी चित्त स्थिर करी
हे स्वामीराया छत्र धरी सर्वांवरी।।२।।

मनात आणिता उचलूनी नेशी।
कोण्या जन्माची पुण्याई अशी।
तूच असे मज साथी सोबती।
रंगती दिशा स्वामीनाम गजरी।
हे स्वामीराया छत्र धरी सर्वांवरी।।३।।

काय मागावे मागणे तुजपाशी
देसी सर्व न मागता या पामरासी
झोळी सदासर्वदा नाम भरुनी वाही
घुमतसे स्वामीशंकर नाम अंतरी
हे स्वामीराया छत्र धरी सर्वांवरी।।४।।

कष्ट न पडती कधी नसे त्रास
स्वामीशंकर नामाची धरता कास
उभे राहती स्वामीशंकर रुपात
खेचूनी नेती आपुल्या मंदिरी
हे स्वामीराया छत्र धरी सर्वांवरी।।५।।

दुःखातूनच सुखानंद मिळवून देसी
स्वतःच्या अस्तित्वाची देसी प्रचिती
प्रारब्ध भोग संपवण्यासी मार्ग दाविसी
नतमस्तक मी सदा गुरुचरणांवरी
हे स्वामीराया छत्र धरी सर्वांवरी।।६।।

तूच स्फूर्ती देशी शब्द लिहिण्यास।
शब्दा शब्दातून असे तुझाच वास।
सुगंधित तव नामाचा येई सुवास।
गुरुराया तुझेच तुज अर्पण पदांवरी।
हे स्वामीराया छत्र धरी सर्वांवरी।।७।।

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर

@ वैशाली कुळकर्णी

45)श्री स्वामी समर्थ

श्रीहरी विठ्ठल जयहरी विठ्ठल
गजर घुमला आसमंती
पंढरीकडे निघाला वारकरी
षडरिपू वाहण्या हरीचरणी

चंद्रभागा तीरी विठूची पंढरी
वारीच्या वारी करुनी माऊली
आनंद वेगे गाऊनी अभंगवाणी
आसुसली भेटण्या भक्ता विठाई

श्री स्वामी समर्थ

46)श्री स्वामी समर्थ

स्वामींरुप अवतरले
आज आजोळी
फुले पाने वेलींवर
स्वामीं परिवाराच्या
सदस्यांच्या सेवेतूनी।
सुगंधित मातीच्या
कणा कणांतून
साद घालिते अवनी।
सजली धरा हिरवाकच
शालू भरजरी नेसूनी।
स्वागत कराया झाडांची
रांग आली सरसावून
लालमातीत घेण्या स्वतःला बांधूनी।
नेटाने जगून फळेफुले बहरुन
सुशोभित स्वामीं वास्तू करायचे
घेतले मनी।
स्वामीं घेती वृक्षलतेसह
सुगंधित आजोळ मठाचा
पाया सजवूनी।
नजरेसमोर दिसते सुंदर
फळाफुलांनी सजलेली
आजोळ मठातील स्वामींची
मूर्ती हसत असेल मनोमनी।
एक ध्यास एक आस हाती
घेतलेले सेवाव्रत आणा हो
स्वामीं लवकरच जुळवूनी।
करवून घ्यावो निरपेक्ष
आईवडिलांची सेवा 
सर्वांच्या हातूनी।

श्री स्वामी समर्थ

47)श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

नामरुपे साधता भक्ती
मिळे आकलन शक्ती
विश्वास ठेवता चित्ती
सद्गुरू ईच्छा पुरविती।

मम एकच आस हृदयी
सद्गुरूरुप मज दावी
पाहाण्या आर्त झाले मन
मनोमनी श्री दत्तध्यान।

ओठांवर सदा असे नाम
गुरुचरणी मन झाले लीन
धावपाव रे स्वामीं गिरनारी
भेटव रे मज लवकर श्रीहरी

नमूनी आज सद्गुरू शंकरा
आस माझी पुरी करा
तवचरणी देऊन थारा
या जीवा आता उध्दरा।

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

48)श्री स्वामी समर्थ

पेटवून हृदयात दिप
चेतवून भक्ती रंग
स्वामींना ठेऊनी मनात
आणूया भजनात रंग।।1।।

सदा इथे नामगंधात
जाते रंगून सांजवात
न जावा कधी लयास
तुझाच रे नाम संग।।2।।

दूर जवळ तीर्थक्षेत्रात
वाटतसे हरी भेटत
एकदाच अंतरंगी बघून
पाहे मन करुनी भंग।।3।।

नामाच्या संथ लयीत
हरीहर करी सोबत
अलगद भरुन टाक
सभोवार स्वामीरंग।।4।।

गुरुरुप कधी कळेल
जेव्हा मीपण जळेल
बघ तरी आता खरेच
करुनिया संतसंग।।5।।

अंतरीचा प्रत्येक श्वास
करता नामासंगे प्रवास
झापड मनावरची उठेल
येता वरी अभंगतरंग।।6।।

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीं समर्थ


49)श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

स्वामीशंकरदत्त गुरुवरा।
तूच असे कर्ता करविता।
दाता देवविता सर्वदा।
माझा सखासोबती मित्रही।।

सदोदित नामाची गोडी।
लावितसे तूच मम अंतरी।
पाहूनी तव रुपे अगणित।
स्थिर होई मम चित्तही।।

श्रीपादवल्लभा स्वामींराया।
भुरळ पाडे मानसभक्ती।
मुखी येता सुंदर तव मंत्र।
हृदयीं भरुन राहे मोदही।।

शरणागता अभय तू देसी।
करुणामय माझी माय तू।
आर्ततेने आळविता तुज।
पावन होई आत्मरुपही।।

श्रीपाद राजम् तव शरणम्।
स्वामीं समर्था तव शरणम्।
दत्ता अवधूता येई धावून।
तव चरणी लीन हे मनही।।

कुठे दडलास तरीही आता।
किर्तनरंगी रंगून धाव घेसी।
शोधणे तुज व्यर्थ पटे मनी।
चराचरात तूच भरुन राही।।

तुझेमाझे झाले सर्व परके।
काळजीची धून सदा ऐकून।
पूर्णपणे विटून जाता हे मन।
नामाचे बळ देऊन सांभाळीही।।
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

वैशाली कुळकर्णी

50)श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

स्वामींदत्तरुपी गुरुवरा
तूच असे करविता
दाता देवविता सर्व
माझा सखा मित्रही।।1।।

सदोदित तुझे नाम
तूच आणि मम अंतरी
पाहूनी रुपे अगणित
स्थिर होई मम चित्तही।।2।।

श्रीपादवल्लभा स्वामींराया
भुरळ पाडे मानसभक्ती
मुखी येता सुंदर तव मंत्र
हृदयीं भरुन राहे मोदही।।3।।

शरणागता अभय तू देसी
करुणामय माझी माय तू
आर्ततेने आळविता तुज
पावन होई आत्मरुपही।।3।।

श्रीपाद राजम् तव शरणम्
स्वामीं समर्था तव शरणम्
दत्ता अवधूता येई धावून
तव चरणी लीन हे मनही।।4।।

कुठे दडलास तरीही आता
किर्तनरंगी रंगून धाव घेसी
शोधणे तुज व्यर्थ पटे मनी
चराचरात तूच भरुन राही।।5।।

तुझेमाझे झाले सर्व परके
काळजीची धून सदा ऐकून
पूर्णपणे विटून जाता हे मन
नामाचे बळ देऊन सांभाळीही।।6।।

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
वैशाली कुळकर्णी 😊:

51)श्री स्वामी समर्थ

नामासंगे एक होऊया
सर्व जग विसरुन भान
तालसुरात गाऊया रे।

नामात स्वामींना पाहूया
जीवन स्वामीनामी लावूया रे।

सर्व सुखे असती मिथ्या
नामाची भूक बांधी नात्या रे।

जीवाला वेड लागता नामाचे
कुणीही नसता अंती नामच
साथीला येते रे।

अंतकरण एकच सर्वदा
पुकारे श्री स्वामीं समर्थ
गर्जूनी आवाज आसमंती
भिनवा रे।

एकताल लयीत गाऊ रे
श्री स्वामी समर्थ जय
जय स्वामीं समर्थ जपा रे।

ध्यानी मनी स्वामीं शंकर
नाम गुणगान त्यास स्वामीं
नामाची लागे तहान रे।

शेवट येता जीवनाचा कोणी
नसे आधाराला स्वामीं शंकर
येती सोबतीला रे।

एकच स्वामींशक्ती मनीची
उध्दराया प्रेमाने ये धावून
घाबर्या मनाला त्याचीच
मिळे सोबत जाण रे।

मना सर्व सुखांना कवटाळलेस
तरी स्वामीं नामस्मरणाला
कधीच विसरू नकोस रे।

श्री स्वामी समर्थ